Total Pageviews

Monday, 16 March 2020

दिल्लीला इस्लामाबाद बनविण्याचे कारस्थान-उमेश उपाध्याय -तरुण भारत


दिल्लीत शाहीनबागेत धरणे-आंदोलन सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात दिल्लीने खूप काही सहन केले आहे. शेवटी शाहीनबागेत सडकेवर बसलेल्या लोकांचा हेतू काय आहे? त्यांना काय हवे आहे? दिल्लीने अशाप्रकारचे धरणे आंदोलन आधी कधीही पाहिले नव्हते. परंतु, पाकिस्तानात असे आंदोलन सामान्य बाब आहे. तिथे सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी कट्‌टर जिहादी तत्त्व अशा प्रकारे धरणे आंदोलन करत आले आहेत.
तहरीक-ए-लब्बैक नावाच्या संघटनेने 2018 मध्ये धरणे देऊन पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला ठप्प केले होते. 2017 मध्येही या संघटनेने विमानतळ आणि रावळिंपडीला जाणारा इस्लामाबाद एक्सप्रेस वे व मुर्री रोड जाम केला होता. दोन्ही धरण्यांनंतर तत्कालीन पाकिस्तानच्या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. एकदा तर केंद्रीय मंत्र्यालाही हटविण्यात आले होते. या लोकांच्या पाठीशी पाकिस्तानी लष्कर असल्याचे सांगतात. तहरीक-ए-लब्बैकची पद्धत काही लोक आता हिंदुस्थानात वापरू बघत आहेत. इस्लामाबाद आणि दिल्लीतील दोन्ही धरणे-आंदोलने विधिसम्मत स्थापित सरकारांच्या विरुद्ध असणे, ही यांच्यातील समानता आहे. पाकिस्तानात नवाझ शरीफ सरकारच्या विरुद्ध आंदोलन झाले आणि इकडे भारताच्या संसदेद्वारा प्रदीर्घ चर्चेनंतर बहुमताने पारित एका कायद्याला बदलविण्यासाठी विरोध होत आहे. दिल्ली आणि इस्लामाबादचे धरणे-आंदोलन, आपल्या मागण्या बळजबरीने मान्य करण्याची रणनीती आहे. हे सरळसरळ ब्लॅकमेिंलग आहे. ‘आम्हाला जे हवे तसे करा’ आणि ‘तसे झाले नाही तर’ आम्ही जनजीवन ठप्प करून टाकू. सरकारला गुडघे टेकवायला भाग पाडू. म्हणजे, कायद्याद्वारा स्थापित व्यवस्थेला मानणार नाही, वेळ पडली तर हिंसेवरही उतरू. असा एकूण पवित्रा आहे.
शाहीनबागच्या धरणे-आंदोलनाचा थेट संबंध दिल्लीत गेल्या आठवड्यात झालेल्या व्यापक हिंसाचाराशी आहे. ईशान्य दिल्लीत शाहीनबागप्रमाणेच काही लोक धरणे-आंदोलनावर बसू इच्छित होते. त्यांनी महिलांना पुढे केले. जेव्हा त्यांना उठविण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी हिंसा सुरू केली. शाहीनबागचे धरणे-आंदोलन आणि ईशान्य दिल्लीतील दंगलीच्या मागे मूळ विचार एकच आहे की, आमचे म्हणणे माना नाही तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ. उद्देश एकच, ब्लॅकमेिंलग! विचार एकच; फक्त पद्धतीत फरक.
पाकिस्तानात निर्वाचित सरकारला अस्थिर करण्याचे काम तिथले लष्करच करते, हे जाहीर आहे. परंतु, हिंदुस्थानात या ब्लॅकमेिंलगच्या मागे कोणत्या शक्ती काम करीत आहेत? लोकांनी नाकारलेले अतिवामपंथी आणि कट्‌टर जिहादी इस्लामी, या ब्लॅकमेिंलगच्या मागे दिसतील. हिंदुस्थानात दोघेही स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि जाणता-अजाणता, स्वत:च्या अस्तित्वासाठी खटपट करत असलेली कॉंग्रेस यांना साथ देत आहे. सीएएच्या मुद्यावर डाव्यांना वाटले की मुसलमानांच सहजपणे भडकविता येऊ शकते. इस्लामी कट्‌टरपंथींसोबत या डाव्यांनी एक नवी रणनीती तयार केली आणि ती म्हणजे धरणे-आंदोलनाच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगची.
इस्लामी कट्‌टरपंथीयांना लोकांचे समर्थन मिळण्याला भारत काही पाकिस्तान नाही. म्हणून धरणे-ब्लॅकमेिंलगसाठी या कट्‌टरपंथींनी संविधानाला हत्यार म्हणून निवडले. कारण, आंदोलन संविधानाच्या परिघात दिसेल, तरच या ब्लॅकमेिंलगला सर्वसामान्यांचे समर्थन मिळू शकते. ब्लॅकमेिंलगला तिरंग्याच्या आवरणात गुंडाळून लोकांसमोर पेश केले गेले. संविधान आणि तिरंग्याप्रति असलेल्या भारतीयांच्या श्रद्धेमुळे देशवासीयांना सहज भडकविता येऊ शकते. संविधान आणि तिरंगा या इस्लामी आणि डाव्या अतिरेक्यांसाठी स्वत:चे अंतिम लक्ष्य प्राप्त करण्याचे केवळ एक साधन आहे. त्यांचे अंतिम लक्ष्य तर संविधानाला नाकारून भारताचे तुकडे करणे हेच आहे.
‘जिन्नावाली आझादी’चे नारे देखील शाहीनबागेच्या मंचावरून अनेकदा आलेत. ‘तेरा मेरा रिश्ता क्या, ला इलाहा इलल्लाह’ किंवा ‘पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इलल्लाह’ हे नारे भारतात देण्याचा हेतू काय? ते तर भारताच्या फाळणीचे आहेत. खरेतर, शांतिपूर्ण ब्लॅकमेिंलगच्या बुरख्याआड धरणे-आंदोलनात अनेक संकेत नजरेत येऊ लागले होते. डाव्यांचा कार्यकर्ता आणि शाहीनबाग आंदोलनाचा एक आयोजक शरजील इमानने जोशात येऊन, ईशान्य भागाला भारतापासून तोडण्याची आपली योजना उघड करून टाकली. तिकडे मुल्लांचा राजकीय पक्ष- मजलिस-ए-एत्तेहादुल-मुसलमीनचा नेता वारिस पठाणने 100 कोटी हिंदूंना ‘बघून घेण्याची’ जाहीर धमकी दिली. कुणी हिंदूंवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली, तर कुणी वेचून वेचून हिंदूंना मारण्याची गोष्ट केली. कपटी परंतु शांतिपूर्ण ब्लॅकमेलिंगच्या चोर दरवाज्यातून निघालेल्या या ठिणग्यांनीच खरे तर दिल्लीला पेटविले आहे. शाहीनबागनंतर जाफराबाद, मस्तफाबाद, चांद बाग आणि कुठे कुठे न जाणे हा प्रयोग वापरण्यात येऊ लागला.
हे ब्लॅकमेिंलग फळत नाही बघून, उपद्रवींनी दिल्लीला आगीत लोटले. शांतिपूर्ण ब्लॅकमेिंलगची पद्धत अगदी साफ आहे. महिलांच्या आड लपा, संविधानाच्या शपथा घ्या, तिरंग्याला फडकवा, आंबेडकर आणि गांधींसमोर मेणबत्त्या पेटवा, सर्व काही संविधानाच्या परिघात होत आहे, असे लोकांना वाटावे ते सर्व काही करा. परंतु, आपण काय करत आहोत, ते त्यांना माहीत आहे. ते लाखो लोकांचे आयुष्य नरक बनवीत आहेत. देशाला राजकीय अस्थिरतेचा बळी बनवत आहे. त्याला आर्थिक दृष्टीने कमकुवत बनवत आहेत. या काळात या लोकांनी देशाच्या न्यायव्यवस्थेतील डावपेचांचाही चांगलाच वापर केला. सर्वोच्च न्यायालय देखील यांच्या जाळ्यात आले.
 सार्‍या देशालाच ओलिस बनविण्याइतपत ही विझत चाललेली अतिवामपंथी विचारधारा इतकी बळकट कशी काय झाली? आधी नागरिकता कायद्यावर अफवा पसरवून त्यांनी सामान्य मुसलमानाला भडकविले आणि जिहादी इस्लामींसोबत युती केली. मोदीविरोधी मीडियातील एक मोठा वर्ग आणि विरोधी पक्ष यांच्यासोबत आले. सीएएवर एक खोटे मत तयार केले गेले आणि त्यात लोक वाहवत गेले. सामान्य भारतीय मुसलमानाने जाणले पाहिजे की अतिवामपंथी आणि कट्‌टर मुल्ला हे दोघेही त्यांचे हितिंचतक नाहीत. कट्‌टर मुल्ला त्याला गजवा-ए-हिंदीचे स्वप्न दाखवितात आणि अतिवामपंथी या भारतविरोधी स्वप्नाला संविधानाची खोळ घालतात, ब्लॅकमेिंलगला वैचारिक पाठबळ देतात. मुसलमानांनी जाणून असावे की, हा देश त्यांचा आहे. ते आधीही भारतीय आहेत आणि नंतरही भारतीय आहेत. त्यांना आता आपले मौन सोडावे लागेल. अतिवामपंथी आणि इस्लामी कट्‌टरपंथींना त्यांची लायकी दाखवावी लागेल. त्यांना सांगावे लागेल की, ते काही खरीदले जाणारे गुलाम नाहीत. सर्वात आधी मुसलमानांना या ब्लॅकमेलर्सच्या तावडीतून सुटावे लागेल. जर मुसलमान यांच्या तावडीतून बाहेर आले तर देश आपोआपच बाहेर येईल.
तिकडे सरकारलाही लक्षात ठेवावे लागेल की, दिल्ली दंगलीच्या वेळी झाले तसे त्यांनी झोपून राहायला नको. हा काही सामान्य कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, उलट एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे. भारतात कायद्याचे राज्य आहे. संविधान नागरिकांना विरोध करण्याचा अधिकार तर देतो, परंतु हा अधिकार अमर्यादित नाही. कुणी कुठेही झेंडा आणि दंडा गाडून विरोध करू शकत नाही. हा विरोध संसद आणि विधानसभेत होऊ शकतो, न्यायालयात होऊ शकतो. परंतु, रस्ते आणि सार्वजनिक स्थळांवर अशी अराजकता संविधान आणि कायद्याला मान्य नाही. शाहीनबागवाले आणि दंगलखोरांना दिल्लीला इस्लामाबाद बनविण्याच्या कारस्थानात यशस्वी होऊ दिले जाऊ शकत नाही

No comments:

Post a Comment