एकामागून एक हुर्रियत नेत्यांच्या भानगडी चव्हाट्यावर येऊ लागल्या आणि त्याचवेळी घातपाती व जिहादींना हुडकून त्यांना प्रत्यक्ष संपवण्याची मोहीम आखली गेली. त्याचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. गेल्या सात महिन्यांत शंभराहून अधिक घातपाती मारले गेले आहेत आणि त्यांना उजळमाथ्याने मदत करणार्याद हुर्रियत व अन्य लोकांचे मुखवटे गळून पडत आहेत. साहजिकच, आजवर त्यांना पाठीशी घालण्याचे छुपे काम करणार्यां ना बिळातून बाहेर पडण्याखेरीज गत्यंतर उरलेले नाही.
हुर्रियतच्या नेत्यांची धरपकड आणि एकाहून एक खतरनाक जिहादींच्या मारल्या जाण्याने काश्मीरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. कारण, यातले घातपाती जिहादी, हुर्रियत व राजकारणी यांच्यातली छुपी आघाडी उघड झाली आहे. त्यांच्यातले आर्थिक व राजकीय संबंध चव्हाट्यावर येत आहेत. तसे झाले नसते, तर अब्दुल्ला व मुफ्ती खानदानाने एकसुरात समान रडगाणे गायले नसते. सीमापार पाकव्याप्त काश्मिरातून होणारा व्यापार, हा पाकिस्तानातून पैसे आणण्याचा एक छुपा मार्ग होता आणि अशाच पैशांच्या आधारावर इथे सामान्य तरुण व मुलांना भारतविरोधी कारवायांमध्ये प्यादी, मोहरे म्हणून वापरले जात होते. दिसायला हे घातपाती पाकिस्तानी होते; पण त्यांना आवश्यक असलेली रसद व मदत पुरवण्याची महत्त्वाची जबाबदारी हुर्रियत पार पाडत होते. अधिक राजकीय निवडणुका लढवून प्रशासन आपल्या कब्जात राखणारे मुफ्ती व अब्दुला, अशा सर्वांना पाठीशी घालायला सरकारी यंत्रणा दुबळी ठेवण्याची जबाबदारी पार पाडत होते. प्रथमच या प्रस्थापित दहशतवादी व्यवस्थेला सुरुंग लागला आहे. म्हणूनच भाजप विरोधातले अब्दुल्ला व भाजपचे सहकारी म्हणून काम करणारे मुफ्ती असे दोन्ही गट समान शब्दांत बोलू लागले आहेत. सत्तेचे व अधिकाराचे लाभ उठवण्यासाठी भारताच्या यंत्रणेचा उपयोग हे राजकारणी करीत होते आणि त्यांच्याच आश्रयाने हुर्रियत पाकप्रणीत जिहादसाठी जनतेला चिथावण्या देण्याचे पाप राजरोस करीत होते. गेल्या सहा, आठ महिन्यांत त्यालाच सुरुंग लावण्यात भारत सरकार व सेनादलाने यश मिळवले आहे. साहजिकच, आता कारवाईचा रोख थेट आपल्यावर येताना दिसल्यावर मुफ्ती व अब्दुल्लान यांच्या नाकातोंडात पाणी गेले असून, त्यांनी 370 चा मुद्दा पोतडीतून बाहेर काढला आहे.
तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा
– भारतीय लष्कराचे मोठे यश
– मोबाईलने बजावली महत्त्वाची भूमिका
श्रीनगर, १ ऑगस्ट
सुरक्षा दल आणि पोलिसांवरील भीषण हल्ल्यांचा सूत्रधार असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजाना आणि त्याच्या खास साथीदाराचा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज मंगळवारी सकाळी एका भीषण चकमकीत खात्मा केला. ही चकमक सुरू असताना स्थानिक तरुणांनी जवानांवर दगडफेक केली. पण, त्याला न जुमानता जवानांनी आपली कामगिरी फत्ते केली.
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अबू दुजाना व त्याचा साथीदार अरिफ लिलहारी लपला असल्याचे त्याच्या मोबाईल फोनवरून स्पष्ट झाले. त्याचा शोध घेण्यासाठी लष्करी व निमलष्करी जवान आणि पोलिसांनी सोमवारी सायंकाळीच जबरदस्त मोहीम हाती घेतली. हाकरीपुरा भागात तो असल्याचे रडारवर दिसून आले. हे दोघेही एका रिकाम्या आणि पडक्या घरात लपले होते, अशी माहिती लष्करी अधिकार्या ने दिली.
जवानांनी या परिसराला वेढा दिला आणि रात्रभर पूर्णपणे सतर्क राहून अतिरेक्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. आपण जवानांच्या वेढ्यात आहोत, याची जाणीवही त्यांना नव्हती. आज सकाळी जवानांना पाहताच अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला असता जवानांनीही प्रत्युत्तर दिले. जवानांनी रॉकेट लॉन्चरचा वापर करून त्याचे घरही उडविले. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.
गेल्या काही दिवसांपासून जवान व पोलिसांनी दुजानाच्या मोबाईल फोनला आपल्या रडारवर घेतले होते. तो वारंवार ठिकाण बदलवीत असल्याचे यात दिसून आले. काही वेळा तो जवानांच्या जाळ्यातही अडकला होता. पण, स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे तो स्वत:ला वाचविण्यात यशस्वी ठरला होता. अशाच एका वेढ्यातून स्वत:चा बचाव करताना त्याचा मोबाईल फोन एका गाडीत राहिला. त्या मोबाईलमुळे लष्कराला त्याच्या संपर्क आणि काही ठिकाणांची माहिती मिळाली. सोमवारी सायंकाळी तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता. जवानांना त्याची माहिती मिळाली आणि त्या घराला चहूबाजूंनी वेढा दिला, असे अधिकार्याचने सांगितले.
१० लाखांचे बक्षीस होते
अबू दुजाना हा तोयबाचा वरिष्ठ कमांडर होता. अनेक आत्मघाती हल्ल्याचा तो सूत्रधार होता. त्याला जिवंत पकडण्यासाठी अधिकार्यांकनी त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. सीआरपीएफ १८२ व १८३ बटालियन, ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीच्या पथकाने ही कारवाई केली.
शंभरावर अतिरेकी ठार
काश्मीर खोर्याीत लष्कराने ऑपरेशन ऑलआऊट हाती घेतले आहे. याअंतर्गत लष्करी जवानांनी दहशतवाद्यांची यादी तयार केली. याच अनुषंगाने जवानांनी खोर्या त अनेक ठिकाणी मोहीम राबविल्या असून, या अंतर्गत आतापर्यंत शंभरावर अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
कोण आहे अबु दुजाना
२०१३ मध्ये जवानांनी अबू कासिमचा खात्मा केल्यानंतर अबू दुजानाला कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय राहिलेल्या दुजानाचा उल्लेख उधमपूर हल्ल्यात जिवंत पडकडण्यात आलेला दहशतवादी नावेदनेही घेतले होते. अबू दुजाना गुलाम काश्मीरमधील गिलगिट बालटिस्तान येथील रहिवासी होता.
इंटरनेट सेवा बंद
दरम्यान, अबूच्या खात्म्यानंतर खोर्याात काही ठिकाणी नागरिकांनी जवानांवर दगडफेक सुरू केली असून, अफवा पसरणार नाही आणि स्थिती चिघळणार नाही, याची दखल घेताना प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे.
काश्मिरी तरुणी होत्या त्रस्त!
भारतीय सुरक्षा दलाने खात्मा केलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा अतिशय क्रूर चेहरा समोर आला आहे. तो वासनांध होता. काश्मिरी मुलींच्या मागे लागायचा, त्यांना त्रास द्यायचा. कुणाच्याही घरात घुसायचा आणि घरातील तरुणींची छेड काढायचा. त्यामुळे काश्मिरी तरुणींसाठी तो खूपच धोकादायक ठरला होता.
तो तोयबाच्या ए-प्लस श्रेणीतील दहशतवादी होता. भारतीय लष्कराच्या मोस्ट वॉण्टेड यादीत त्याचा समावेश होता. दुजाना काश्मिरात आला तेव्हापासूनच तो मुलींच्या मागे लागला होता. कुणाच्याही घरात तो घुसायचा आणि मुलींचा विनयभंग व अत्याचार करायचा.
दहशतवादावर आणखी एक घाला!
सरकारने जम्मू-काश्मीरचा विषय आता जास्तीच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. आजवर खोर्याचतील विघटनवादी कारवायांबाबत सरकार तेवढे गंभीर नव्हते असे नाही; पण आज ना उद्या तेथील आझादीचे नारे बंद होतील, शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले टाकली जातील, असा केंद्राचा होरा होता. पण, कोट्यवधींची केंद्रीय मदत, सतत झुकते माप देऊनही ज्या वेळी येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेरच जात असल्याचे लष्कराला निदर्शनास आले, त्या वेळी फौजा सावध झाल्या आणि त्यांनी, सरकारने दिलेल्या अधिकारांचा वापर करून एकेका ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवाद्याला टिपून मारायला प्रारंभ केला. दहशतवाद्यांना टिपून मारले तर खोर्याततील जनमानस संतप्त होते, विद्यार्थी रस्त्यावर येतात आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करतात. त्यांची विरोधाची ही पहिली पायरी असते. पण, लष्कर स्वस्थ बसून राहिले तरी खोर्याचतील दहशतवाद कमी होण्याचे नावच घेत नव्हता. अखेर जम्मू-काश्मीर पोलिसांना विश्वालसात घेऊन भारतीय लष्कराने मोहीम आखली आणि अतिरेक्यांचे कंबरडे मोडण्यास प्रारंभ झाला. याच मोहिमेंतर्गत गेल्या काही दिवसांमध्ये लष्करच्या टॉप मोस्ट अतिरेक्यांचा खात्मा केला जात आहे.
बुरहान वानीपासून सुरू झालेले हे सत्र आज खोर्याात टिपल्या गेलेल्या लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानापर्यंत येऊन ठेपले. अबूच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरोधात निर्णायक मोहीम उघडलेल्या भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यातील काकापोरामध्ये सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या कारवाईत दुजानासह अन्य दोन दहशतवादीही मारले गेले. काकापोरा येथील एका घरात दुजाना आपल्या दोन-तीन साथीदारांसोबत लपला असल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने, जिथं दहशतवादी लपले आहेत, त्या घरालाच स्फोटकांनी उडवून दिलं! अशा रीतीने खोर्या तील आणखी तीन दहशतवादी जवानांच्या रडारवर आले. सरकारने लष्कराचे हात बांधून ठेवले असते, तर ही कारवाई करता आली नसती. कुठल्या अतिरेक्याच्या खात्म्यानंतर खोर्याचत हिंसाचार उफाळतो म्हणून लष्कराने पावले नसती टाकली, तर जनतेच्या मनात दहशत पसरविणारा अबू दुजाना भारतीय लष्कराच्या रडारवर आला नसता आणि त्याने आणखी मोठी दहशतवाद्यांची फौज उभी करून, ती भारताविरुद्ध उभी केली असती. विघटनवादी नेते नाराज होतात असा विचार केला असता, तर लष्कराच्या हाती हे यश आले नसते. खरे तर भारतीय लष्कर मोठी कारवाई करीत नाही, असा भ्रम पसरल्याने अतिरेक्यांचे फावत होते. ते जास्तीच उन्मादी कृत्ये करण्यास पुढे येत होते. राज्यात सत्तेवर असलेल्या एका घटक पक्षाचे आणि सध्या विरोधी पक्षात असलेल्या कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचेही विघटनवाद्यांना समर्थन आहेच. ते नाकारले जाऊच शकत नाही! पण, या सार्याय शक्तींचा विरोध झुगारून भारतीय लष्कर, गृहमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या खुल्या ढीलचा योग्य प्रकारे उपयोग करीत आहेत. बुरहान वानी असो की अबू दुजाना, ही पाकिस्तानात बसलेल्या हाफिज सैद, सलाहउद्दिन, दाऊद इब्राहिम आदींच्या हातातील प्यादी आहेत.
पाकिस्तानातून जसे आदेश येतील, त्या तालावर नाचणार्या या कठपुतळ्या आहेत; आणि या कठपुतळ्यांना आर्थिक मदत करणार्याण काही फुटीरवादी नेत्यांना अटक करून लष्कराने त्यांच्यादेखील मुसक्या बांधल्या आहेत. सात फुटीरवादी नेत्यांना अटक करून, त्यांना चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले आहे. शहीद उल इस्लाम या नेत्याकडे काश्मीर खोर्यादतील मोस्ट वॉण्टेड अतिरेक्यांची यादी सापडली. त्याच्यावर, खोर्यातत दहशतवाद वाढवण्यासाठी पाकिस्तानी एजन्सींकडून पैसा स्वीकारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तयार केलेली ही यादी शहीद उल इस्लामकडे कशी आली, याचादेखील सध्या तपास सुरू आहे. तो जम्मू-काश्मीर पोलिसांचा खबर्याल होता काय? याची तपासणी सुरू आहे. काश्मिरात सक्रिय असलेल्या १५८ अतिरेक्यांची यादी जम्मू-काश्मीर पोलिसांनी तयार केली होती. त्यांची नावेदेखील शाहीद इस्लामजवळ उपलब्ध झाली आहेत. हा सारा प्रकार चीड आणणारा आहे. आपली सुरक्षायंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करते आणि त्यांच्या योजना अतिरेक्यांच्या किंवा फुटीरवाद्यांच्या हाती लागतात, हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रकार आहे. आपल्यापैकीच काही जण अतिरेक्यांना मिळालेले असल्याशिवाय अशा गुप्त याद्या जाहीर होण्याची शक्यता नाही.
अशा घरभेद्यांना शोधून काढून त्यांना नेस्तनाबूत करण्याचीदेखील गरज आहे. यासाठी शिवाजी महाराजांसारखा ‘गनिमीकावा’ केला जायला हवा. सरकारने
भारतीय लष्कराला दिलेल्या मोकळिकीचा हळूहळू असर दिसू लागला आहे. गेल्या ३-४ वर्षांच्या तुलनेत यंदा लष्कराने तुलनेने कितीतरी अधिक अतिरेक्यांना पाणी पाजले आहे. यंदाच्या वर्षात जुलै महिन्यापर्यंत लष्कराने ९२ अतिरेक्यांना यमसदनी पाठविले आहे. २०१६ या वर्षाशी तुलना करता, हा आकडा याच काळात गेल्या वर्षी ७९ होता. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात २०१२ आणि २०१३ मध्ये अनुक्रमे वर्षभरात हा आकडा ७२ आणि ६७ च्या आसपास होता. लष्कराने केवळ अतिरेक्यांचा खात्मा करण्याचीच मोहीम हाती घेतलेली नाही, तर खोर्याकतील लोकांना मानसिक आधार देण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
No comments:
Post a Comment