SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Tuesday, 8 August 2017
पश्चिम बंगालमधील वाढत्या दंगली- जुनैद, मोहम्मद इखलाख, रोहित वेमुला यांच्या हत्येवरून दिवस-रात्र कोकलणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर मात्र चूप बसला. पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात आतापर्यंत छोटे-मोठे ४० सांप्रदायिक दंगे झालेत. पण दूरवाहिन्यांवर त्याबाबत कधी चर्चा झाली नाही
नुकताच जुलै २०१७ मध्ये पं. बंगालमधील चोवीस परगणा जिल्ह्यातील बादुरिया येथे सांप्रदायिक हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. कारण होते अकरावीत शिकणार्या एका मुलानेे मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांसंबंधी फेसबुकवर टाकलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टचे. ही पोस्ट कोणी टाकली याचा शोध घेऊन त्या मुलावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्याऐवजी दंगा भडकविण्यासाठी सतत उत्सुक असणार्या व दंगा भडकविण्यासाठी सतत काहीना काही निमित्त शोधणार्या धर्मांध मुस्लिमांना असा मार्ग कसा पसंत पडणार? पं. बंगालमधील चोवीस परगणा जिल्ह्यातील मुस्लिमांच्या भावनांचा असा उद्रेक झाला. त्यांनी हिंदूवर हल्ले करून त्यांची घरे जाळावयास सुरुवात केली. शेकडो घरे व दुकानांची प्रचंड नासधूस करण्यात आली. बासिरहाट येथील कार्तिक घोष या ६५ वर्षीय वृद्धास मुस्लिम जमावाने ठार केले. यातही अजून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा सांप्रदायिक दंगलीच्या वेळी पं. बंगालमध्ये हिंदूंचा वाली कोणीच नसतो. ना शासन, ना पोलिस खाते. धर्मांध मुस्लिमांचे समाधान झाले की मगच दंगल शांत होते.
पण ही काही पं. बंगालमधील पहिलीच सांप्रदायिक दंगल नाही. पं. बंगालला सांप्रदायिक दंगलींची मोठी परंपरा लाभली आहे. पं. बंगालमधील सर्वात भीषण दंगल १६ ऑगस्ट १९४६ ला झाली होती. पं. बंगालमधील मुस्लिम लीगचे अत्यंत धर्मांध नेते सुहरावर्दी यांचे समर्थन लाभलेल्या या दंगलीत ५०१६ जणांची हत्या झाली होती. नंतर नौखालीतही भीषण दंगल झाली. यात हिंदूंच्या जीवित व मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले होते.
ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात या सांप्रदायिक दंगलींना पायबंद बसेल, अशी आशा होती. पण ती सपशेल फोल ठरली. पं. बंगालमध्ये सत्तेवर कायम राहायचे आहे, या लालसेने ममतांना पछाडले असल्यामुळे त्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाची सर्वोच्च पातळी गाठली. त्यामुळे तेथील धर्मांध मुस्लिमांना सांप्रदायिक दंगलीसाठी, देशद्रोही कृत्ये करण्यासाठी जणू रान मोकळे मिळाले आहे. पं. बंगालमधील चोवीस परगणा जिल्ह्यात मुस्लिमांची लोकसंख्या ६२ टक्के आहे. येथे फेब्रुवारी २०१३ मध्ये एका इमामाजवळचे झाडे अकरा लाख लुटून त्यांचा खून करण्यात आला. पण हे घृणित कृत्य कोणी केले हे समजण्याच्या आधीच मुस्लिमांनी दंगल सुरू केली. २०० हिंदूंची घरे जाळण्यात अथवा लुटण्यात आली. या जिल्ह्यातील अनेक गावातील जवळपास २०० हिंदू आपले गाव सोडून अन्यत्र सुरक्षित स्थळी गेले. हिंदूंची अनेक मंदिरे सुद्धा पाडण्यात आली. जाने. २०१५ मध्ये २४ परगणा जिल्ह्यातीलच मंदिर बाजार, डायमंड हार्बर पोलिस ठाणे या परिसरात दंगा भडकविण्यात आला. येथील मुस्लिम जनसंख्या ५६ टक्के आहे. विशेष म्हणजे या दंग्याचे नेतृत्व पं. बंगालच्या अल्पसंख्यक विभागाचे राज्यमंत्री गियासुद्दीन गोल्ला करीत होते म्हणे. मशिदीवरच्या लाऊडस्पिकरवरून सर्व मुस्लिमांनी दंग्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत होते. मुस्लिमांनी हिंदूंची अनेक घरे, दुकाने फोडली, लुटली. जाळून टाकली. या दंगलीत पोलिसांना दंगलग्रस्त भागात जाण्यापासून रोखण्यात आले. काही पोलिसांनी हिंदूंनाच झोडपून काढले. हिंदूंनी दोन्हीकडूनही मार खाल्ला.
२०१५ मध्येच कालियागंज ब्लॉकमधील नादिया, जुरानपूर भागात दंगे करण्यात आले. विशेष म्हणजे या भागात मुस्लिम २५ टक्के म्हणजे अल्पसंख्य असूनही येथे दंग्याला सुरुवात मुस्लिमांनीच केली. या भागात दरवर्षी भरविण्यात येणार्या धर्मराज मेळाव्यात सामील झालेले हिंदू एका मशिदीसमोरून वापस येत होते. त्याचवेळी मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात ४ जण मृत्यू पावले व ८ जण जखमी झाले. पण यात ना पोलिसांनी हस्तक्षेप केला ना कोणत्याही वृत्तपत्राने अथवा वाहिनीने ही बातमी प्रकाशित करण्याची हिंमत केली. या दंगलीबाबत सर्व प्रसारमाध्यमे मूग गिळून चूप बसली होती.
कमलेश तिवारी नावाच्या एका तरुणाने फेसबुकवर मुस्लिम धर्माबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे ३ जाने. २०१६ ला हजारो मुस्लिांनी एकत्र येऊन हिंदूवर हल्ले करण्यास सुरुवात केली. यात बांगला देशातून आलेल्या बांगला देशीय मुस्लिम घुसखोरांचा समावेश होता. मुस्लिम घुसखोरांमुळे येथील जनसंख्या ८९ टक्के झाली आहे. मुस्लिम नेत्यांच्या भडकाऊ भाषणामुळे मुस्लिम जास्तच भडकले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला. बीएसएफच्या अनेक वाहनांसह इतरही अनेक वाहने जाळून टाकली. पोलिस स्टेशनवरही हल्ला करून ३० पोलिस कर्मचार्यांनी जखमी केले. हिंदूंची अनेक वाहने, दुकाने, पेटवून दिली. चीड आणणारी बाब म्हणजे काहींनी हिंदू स्त्रियांचे शारीरिक शोषणही केले. कमलेश तिवारीला ताब्यात देण्याची किंवा त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती. विशेष म्हणजे या भीषण दंगलीबाबत ममता बॅनर्जींनी चुप्पी साधून निष्क्रिय राहणे पसंत केले.
२०१६ मध्ये तर पं. बंगालमध्ये अनेक सांप्रदायिक दंगे झाले. मार्च २०१६ मध्ये बीरभूम जिल्ह्यातील इलम बाजार येथे पै. मोहम्मद यांचेबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे निमित्त होऊन दंगा भडकविण्यात आला. तर ऑक्टो. २०१६ मध्ये २४ पटगणा जिल्ह्यातील हाजीनगर व हलिसहर येथे दुर्गामहोत्सव व मुहर्रम सण एकत्र येऊन त्या दरम्यान झालेल्या एका छोट्या भांडणामुळे दंगलीला सुरुवात झाली. यात हिंदूंची अनेक घरे, दुकाने व गाड्या जाळण्यात आल्या. ११ व १२ ऑक्टो. २०१६ मध्ये पं. बंगालात १२ ठिकाणी दुर्गा विसर्जनाची मिरवणूक व मोहर्रमचा जुलूस यावरून दंगली भडकल्या होत्या. यात मुस्लिमांनी दुर्गा उत्सवाचे अनेक मंडप जाळले, अनेक दुर्गामूर्तींची तोडफोड करून त्या रस्त्यावर फेकल्या.
२०१६ मध्येच कोलकातापासून १६५ कि. मी. दूर असणार्या करवा शहरात एका शनिमंदिरात गाईचे मास फेकून दंगा भडकविण्यात आला. पण या घटनेचा एफआयआर नोंदवून घेण्यात पोलिसांनी नकार दिला. त्याचवर्षी हावडा जिल्ह्यातील धुलागड येथे तर मुस्लिमांनी जाणीवपूर्वक दंगा करण्यासाठी मोहम्मद पैगंबरांचा जन्म दिवस १२ डिसें. २०१६ रोजी येत असताना त्या दिवशी मिरवणूक न काढता ती हिंदूंच्या १३ डिसेंबर रोजी साजरा होणार्या माघ पौर्णिमेच्या दिवशी, त्या उत्सवाला गालबोट लावण्यासाठी काढली. हिंदूंच्या पूजापाठात मुस्लिमांच्या मिरवणुकीतील लाऊड स्पीकरच्या कर्णकर्कश आवाजामुळे व्यत्यय येत होता. तरीही काही हिंदूंनी मिरवणुकी काढल्या. मुस्लिमांना लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. दंगेखोर मुस्लिमांना दंगा भडकविण्यासाठी असेच काही कारण हवे होते. हिंदूंच्या या साध्या विनंतीवरूनही मुस्लिम भडकले आणि त्यांनी हिंदूवर सरळ हल्लाबोल केला. सतत चार दिवस हा दंगा सुरू होता. यात हिंदूंची शेकडो घरे व दुकाने जाळण्यात आली. यासाठी काही ठिकाणी देशी बॉम्बचाही वापर करण्यात आला. या दंगलीत १५० जणांचे जीव गेले. हजारो हिंदूंनी आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित स्थळी पळ काढला. ममतांना या दंगली संबंधी काही पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांच्यावर गैरजमानती खटले दाखल करण्यात आले. जुनैद, मोहम्मद इखलाख, रोहित वेमुला यांच्या हत्येवरून दिवस-रात्र कोकलणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर मात्र चूप बसला. पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात आतापर्यंत छोटे-मोठे ४० सांप्रदायिक दंगे झालेत. पण दूरवाहिन्यांवर त्याबाबत कधी चर्चा झाली नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment