ममतांचा ‘मिनी पाकिस्तान!’
August 28, 2017019
Share on Facebook Tweet on Twitter
अग्रलेख
पाकिस्तानात हिंदू आणि अन्य अल्पसंख्य लोकांवर किती अनन्वित अत्याचार करण्यात आले, हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. हिंदू मुलींशी बळजबरीने विवाह करून त्यांना मुस्लिम बनविण्यात आले. हिंदूंच्या हत्या केल्या, त्यांची घरे जाळली. आता पाकिस्तानात केवळ दोन टक्के हिंदूच राहिले आहेत. बहुतेक हिंदू हे सिंध प्रांतात आहेत. हा संदर्भ देण्याचे कारण हे की, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार आपल्या राज्यात एक मिनी पाकिस्तान व अफगानिस्तान निर्माण करण्याचा अघोरी प्रयत्न करीत आहेत. प. बंगालमध्ये प्रामुख्याने बांगलादेशी मुसलमान आणि म्यानमारमधून आलेले रोहिंग्या घुसखोर मोठ्या प्रमाणात शिरले आहेत आणि त्यांना ममतांचे पूर्ण संरक्षण प्राप्त आहे. सध्या रोहिंग्या मुुस्लिमांचा प्रश्न भारताला भेडसावत आहे. सुमारे ४० हजार रोहिंग्या घुसखोर भारतात राहात आहेत. त्यापैकी बहुतेक प. बंगालमध्ये आहेत. मागे बांगलादेशी घुसखोरांना हुसकावण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर, एकाही मुस्लिम घुसखोराला हात लावून पाहा, अशी धमकी ममतांनी दिली होती. आता तीच भूमिका त्या रोहिंग्या घुसखोरांबाबत घेतली आहे. त्याचे कारण म्हणजे आपल्या देशात घुसखोरांच्या भरवशावर राजकारण खेळण्याचा नवा प्रघात. त्याची कटु फळे आपण आसामात भोगली आहेत आणि तिथल्या विद्यार्थी आणि युवकांनी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभारले होते. सर्वोच्च न्यायालयानेही सर्व घुसखोरांना आसामातून परत पाठवावे, असा निर्णय दिला होता. पण, तत्कालीन कॉंग्रेस सरकारने तो मानला नाही. आज सुमारे ३० विधानसभा जागांवर मुस्लिम घुसखोरांचे प्राबल्य आहे. याच घुसखोरांच्या आधारावर आजपर्यंत तेथे कॉंग्रेसने राज्य केले. तसेच काहीसे कटकारस्थान प. बंगालमध्येही सुरू असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. मुस्लिमांचे लांगूलचालन करून त्यांना केवळ राजकारणासाठी वापरणे आणि त्यांना मुख्य प्रवाहापासून रोखणे हा खेळ आपल्या देशात कॉंग्रेसने सुरू केला. त्याची किती मोठी किंमत या पक्षाला चुकवावी लागली, हे त्यांनी अनुभवले आहे. ममतांना याची कल्पना नसेल, असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. पण, त्यांना गर्व झाला आहे. आपल्या दादागिरीच्या भरवशावर आपण राज्यात काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. त्यासाठी त्या हिंदूंची सातत्याने उपेक्षा करीत आहेत आणि मुसलमानांना झुकते माप देत आहेत. ममतांनी नुकताच एक फतवा काढला आहे. यंदाच्या वर्षी मोहर्रमच्या दिवशी त्यांनी दुर्गा विसर्जनावर बंदी घातली आहे. आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार दसर्यालाच दुर्गा पूजा विसर्जन होत आले आहे. पण, यंदा मोहर्रमुमळे त्यांनी या परंपरांना छेद देत, केवळ मुस्लिमांना खुश करण्यासाठी दुर्गा विसर्जन मोहर्रमच्या दिवशी करू नये, असा आदेशच काढला आहे. या निर्णयामुळे हिंदूंच्या धार्मिक कार्यात हस्तक्षेप केल्यामुळे स्वाभाविकपणे हिंदू दुखावला गेला आहे. समस्त हिंदू समाजाने या निर्णयाचा विरोध केला आहे. साधारणत: सोळाव्या शतकापासून दुर्गोत्सवाचा हा सण प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि सर्व पूर्वोत्तर राज्यात अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. आता तो संपूर्ण भारतात साजरा केला जातो. क्रूर राक्षस महिषासुराचा वध करून दुर्गामातेने विजय प्राप्त करण्याचा हा दिवस. विजयादशमी आणि नवरात्री या नावानेही तो ओळखला जातो. पण, मूळ पूजेचा भाव एकच. दुर्गामातेच्या मूर्तीची धार्मिक रीतिरिवाजाने प्रतिष्ठापना करणे आणि नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम करणे, असा हा उत्सव आहे. पश्चिम बंगालमधील हा सर्वात मोठा सण. या नऊ दिवसांत संपूर्ण राज्यात उत्साहाला अक्षरश: उधाण आलेले असते. अशा या सणात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जींनी केला आहे. विजयादशमीला अजून वेळ आहे. काही हिंदू संघटना न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहेत. मागे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या सभेला असनसोल महापालिकेने परवानगी नाकारली होती. या महापालिकेत तृणमूलचे बहुमत आहे. याच महापालिकेच्या हद्दीत ब्रिगेड ग्राऊंड आहे, जेथे डॉ. मोहनजींचा संसद मेळावा हेाणार होता. महापालिकेच्या या निर्णयाला संघाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. कोर्टाने ममतांना चपराक लावताना, सभेत कोणतीही आडकाठी आणू नये, असा सज्जड दम भरला होता. तसेच हिंदूंनाही या राज्यात राहण्याचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाही अधिकार आहे, अशा शब्दांत ममतांना खडसावले होते. तीन वर्षांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सभेलाही ममतांनी परवानगी नाकारली होती. तेव्हाही उच्च न्यायालयाने रॅली होईल, असा निर्णय दिला होता. विरोधकांना आपल्या राज्यात थारा मिळू नये, यासाठी ममतांची ही दादागिरी सुरू आहे. यासाठी त्यांनी गुंड पोसले आहेत आणि ते भाजपा, कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांवर खुलेआम हल्ले करीत आहेत. पण, त्यांचे काहीच ऐकले जात नाही. कारण, संपूर्ण प्रशासन आणि पोलिस यांच्यावर त्या दबाव टाकत असतात. तेथे तर बलात्कार झालेल्या महिलेची तक्रारही नोंदवून घेतली जात नाही. ‘मां, माटी आणि मानुष’ असा नारा देणार्या ममता आता मां या शब्दाला विसरल्या आहेत. त्यांना जेवढे बाहेरून घुसखोर येतील ते हवे आहेत. या घुसखोरांनी राज्यात उच्छाद मांडला आहे. प. बंगालच्या सर्व सीमावर्ती भागात घुसखोरी करून तिथल्या शेतकर्यांच्या जमिनी बळकावल्या. त्यावर अफीमची शेती ते करीत आहेत. सोबतच बांगलादेशातून मोठ्या संख्येने बनावट नोटा, मादक द्रव्ये आणि शस्त्रांची तस्करी करणार्यांना ममतांनी मोकळे रान दिले आहे. प्रामुख्याने मालदा जिल्ह्यात अफीमची सर्वाधिक शेती केली जाते. अफीमवर प्रक्रिया करून नंतर हेरॉईन व अन्य मादक द्रव्ये बनविली जातात. ती पुन्हा प्रक्रिया होऊन भारतात येतात. अफीमपासून मिळणार्या पैशातून हे लोक शस्त्रे खरेदी करतात आणि बांगलादेशी बंडखोरांना व आयएसआयला पाठवितात. हा भाग कालीचक ब्लॉक-३ मध्ये मोडतो. यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर शिरलेले नाहीत, तर ते बंडखोर आहेत. सुमारे दोनशे शस्त्रधारी या अफीमच्या शेतांभोवती सतत पहारा देत असतात. त्यामुळे तेथे दोन-चार पोलिसही जाण्याची हिंमत करीत नाहीत. त्यासाठी दोन-तीनशे पोलिसांचा सशस्त्र फौजफाटाच न्यावा लागतो. या संपूर्ण ब्लॉकमध्ये येणारा भाग हा अतिरेकी आणि अवैध कारवायांचे केंद्र झाला आहे. असा हा सारा नंगा नाच ममता उघड डोळ्यांनी पाहता आहेत. आता सीमा सुरक्षा दलाने अफीमची शेती उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे. ममतांच्या अवैध कारवायांना लगाम घालण्यासाठी केंद्राने कडक पावले उचलण्याची गरज आहे. तसेच हिंदूंच्या मानबिंदूंना धक्का लावण्याचे नीच कृत्य करणार्या ममतांना आता पश्चिम बंगालमधील हिंदूंनीच हाकलण्याची गरज आहे
No comments:
Post a Comment