Total Pageviews

Saturday, 12 August 2017

शोपियान: अतिरेक्यांशी चकमक; २ जवान शहीद महाराष्ट्रातील एका जवानाचा समावेश. सुमेध गवई (अकोला) असं जवानाचं नाव.


7 दक्षिण काश्मीर भागातल्या शोपियान जिल्ह्यात काल रात्रीपासून संरक्षण दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. एका कॅप्टनसह अन्य तीनजण या चकमकीत जखमी झाल्याचं वृत्त आहे. सैन्यानेही तोडीस तोड प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. चकमक अद्याप सुरूच आहे. शोपियान जिल्ह्यातल्या झैनापोरा भागात अवनीरा गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच सैन्याने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सैन्यदलाने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पण या चकमकीत ५ सैनिक जखमी झाले. त्यांना लष्कराच्या ९२ तळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोन जवान शहीद झाले. जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोघे शहीद झाले आहेत. सुमेध गवई असे शहीद जवानाचे नाव असून ते अकोल्यातील लोणाग्रा गावचे रहिवासी आहेत. गवई यांच्या वीर मरणाची बातमी समजताच लोणाग्रा गावात शोककळा पसरली आहे. शोपिया गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याच्या वतीने शोध मोहीम राबवण्यात येत होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. भारतीय दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पण दहशतवाद्यांनी अंदाधुंदपणे केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले. सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते, असे सांगण्यात आले. स्वातंत्र्याची किंमत अनुराधा प्रभुदेसाई | ‘‘मी एकदम मस्त आहे. फक्त माझ्या डोक्याला मोठी जखम झाली आहे, माझा उजवा हात प्लॅस्टरमध्ये आहे. माझ्या पोटावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि माझा डावा पाय मिसिंग आहे, कारण आपल्या शेजारच्या देशातील मित्रांनी बॉर्डरवर पेरून ठेवलेल्या भूसुरुंगावर माझा पाय पडला आणि माझ्या डोळ्यादेखत माझा पाय हवेत उडाला..’’ जोरजोरात हसत कॅप्टन शौर्य म्हणाला, ‘‘बाकी मी फिट आहे मॅम. काळजी नको. पण एक विनंती आहे. माझ्या बडीसाठी प्रार्थना करा. कारण त्याचे दोन्ही डोळे गेले आहेत.’’ कॅप्टन शौर्यच्या या उद्गारातच सैनिकांचं सारं आयुष्यच समोर येतं. आपल्या देशवासीयांसाठी लढणाऱ्या, प्रसंगी आयुष्य वेचणाऱ्या या सैनिकांना आपण जाणून घ्यायला हवं आणि त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याच्या किमतीचं भान आपल्याला आहे का हेही स्वत:ला विचारायला हवं.. भारतीय स्वांतत्र्य दिनाला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने.. कॅलेंडरमधील ती फक्त एक तारीख, २८ सप्टेंबर, पण प्रोफेसर नय्यर यांच्यासाठी त्याचं खूप महत्त्व होतं. बरोबर ३ वर्षांपूर्वी याच दिवशी मी त्यांना भेटले होते. ‘‘आज अनुज ३९ वर्षांचा झाला असता..’’ त्यांच्या या उद्गाराने कारगिल युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या, महावीर चक्राने सन्मानित झालेल्या अनुजच्या आयुष्यात डोकवायची संधी मिळाली.. पहिल्याच वाक्याने त्यांचे डोळे पाणावलेले दिसले.. ‘‘सर, आम्ही ‘लक्ष्य फाऊंडेशन’तर्फे कारगिल युद्धातील वीरांवर पुस्तक तयार करीत आहोत. कॅप्टन अनुजवरही लिहायचं आहे. म्हणून तुम्हाला भेटायला आले.’’ त्यांनी ‘हो’ म्हटलं आणि बोलू लागले, पण प्रोफेसर माझ्याशी नव्हे जणू स्वत:शीच संवाद साधत होते.. ‘‘त्याची एन. आय. एफ. डी., बी. आय. टी. एस आणि आणखी तीन शाळांसाठी निवड झाली होती. अतिशय हुशार होता तो, पण त्यानं एन. डी. ए.ला जायचं निश्चित केलं. अगदी लहानपणापासून तो धाडसी आणि बेडर होता. मारामाऱ्या करायचा, खेळात नंबर वन, शूटिंग खूप आवडायचं आणि मुळात तो खूप द्वाड होता. इतका की एकदा त्याच्या शिक्षिकेनं त्याच्या खोडय़ांना वैतागून नोटीस बोर्डवर लिहिलं होतं, ‘आय वॉन्ट अनुज डेड ऑर अलाइव्ह’ मग त्यानं माफी वगैरे मागितली, पण तो हुशारही तितकाच होता म्हणून त्यांचा लाडकाही होता. त्याचे सगळे गुण हे सैनिक बनण्यासाठीच योग्य होते.’’ एक दीर्घ श्वास घेऊन ते भूतकाळाची कवाडं उघडू लागले.. ‘‘कॅप्टन विक्रम बात्रा आणि कॅप्टन अनुज हे बडी होते. जानते हो बडी किसे कहते है? ’’ ‘‘हा. हा. मानो दो दिल मगर एक जान.’’ मी उत्तरले. ‘‘वाह क्या बात कही! कारगिलमध्ये दोघांचे टेन्ट युद्धभूमीवर बाजू बाजूला होते. दोघेही शेर होते. हातात हात घालून सैन्यात गेले आणि स्वर्गातही! युद्धभूमीवरच त्यांना वीरमरण आलं. तुला माहितीच आहे ना २५ वर्षांच्या कॅप्टन विक्रमला मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ तर २४ वर्षांंच्या अनुजला ‘महावीर चक्र’ने सन्मानीत केलं गेलं ते. और सुनना चाहते हो बडी के बारेमें? कारगिल युद्धभूमी.. असाच एक अनुजचा ‘१७ जाट’चा बडी होता. अनुज आणि त्याचे सैनिक वीरता आणि पुरुषार्थाचा परमोच्च बिंदू गाठत होते. अनुजने वाटेतील तीन बंकर उद्ध्वस्त करून शत्रूला जेरीस आणलं होतं. आता चौथा बंकर. तो उद्ध्वस्त झाला की मोहीम फत्ते! पण अंधारात दडलेला एक बंकर त्यांच्या नजरेतून सुटला.. ते पुढे निघाले. आणि शत्रूने डाव साधला. त्यांना प्रत्युत्तर द्यायला निघालेल्या अनुजच्या छातीत.. बहुतेक शत्रूच्या त्या गोळ्यांवर त्याचे आणि त्याच्या टीमचेच नाव होते. पहाटे ५.३० वाजता हे घडलं. या घटनेनं चवताळून उठलेल्या अनुजच्या त्या बडीनं ६.३० ला शत्रूवर जोरदार हल्ला करून अनुजच्या शहादतचा बदला घेतला. सगळेच शेर तिथे एकत्र आलेले होते..’’ मी मध्ये काही बोलायचा प्रयत्न केला, पण प्रोफेसर त्यांच्याच विश्वात होते..

No comments:

Post a Comment