Total Pageviews

Thursday, 10 August 2017

आझाद मैदानात झालेल्या हिंसक दंगलीला पाच वर्ष पूर्ण झाली. या प्रकरणी चार्जशिटही दाखल झाली पण मुख्य आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरतोय. मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा असं त्याचं नाव आहे. पाच वर्ष झाली तरीही पोलिसांना त्याच्या विरोधात पुरावे सापडत नाही म्हणून त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये. मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा, 11 ऑगस्ट 2012 च्या आझाद मैदान दंगलीतला आरोपी क्रमांक 7. पाच वर्ष होऊन गेली तरीही अद्याप मोकाट आहे. आझाद मैदानातली दंगल हा हल्ला होता पोलिसांवर, हा हल्ला होता माध्यमांवर.-पाच वर्षांपूर्वी ११ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर रझा अकादमीने मुस्लिम मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन करून जो धुडगूस घातला त्याचे नंतर नेमके काय झाले? त्यात जे पोलिस जखमी झाले, ज्या महिला पोलिसांवर हात टाकण्याचे दु:साहस करण्यात आले त्यांचे काय झाले? ज्यांनी हे सर्व केले त्यांना कोणती शिक्षा झाली? दंगलीत भाग घेणारे सर्व पकडले गेले का? त्यांना शिक्षा झाली का? हे आणि असे अनेक प्रश्‍न अद्याप अनुत्तरीतच आहेत…-सोमनाथ देविदास देशमाने


११ ऑगस्ट २०१२, मुंबई! 12 आॅगस्ट : आझाद मैदानात झालेल्या हिंसक दंगलीला पाच वर्ष पूर्ण झाली. या प्रकरणी चार्जशिटही दाखल झाली पण मुख्य आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरतोय. मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा असं त्याचं नाव आहे. पाच वर्ष झाली तरीही पोलिसांना त्याच्या विरोधात पुरावे सापडत नाही म्हणून त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये. मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा, 11 ऑगस्ट 2012 च्या आझाद मैदान दंगलीतला आरोपी क्रमांक 7. पाच वर्ष होऊन गेली तरीही अद्याप मोकाट आहे. आझाद मैदानातली दंगल हा हल्ला होता पोलिसांवर, हा हल्ला होता माध्यमांवर. मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निघालेल्या या मोर्चाचं रुपांतर बघता बघता दंगलीत झालं. बंगाली बाबा या प्रकरणी आरोपी आहे, चार्जशिटमधून त्यानं स्वत:चं नाव काढून घेण्याचा त्यानं अतोनात प्रयत्न केला. नाव तर अजूनही आहे, पण त्याच्यावर कारवाई मात्र अजूनही होत नाहीये. कारण पोलिसांना त्याच्या विरोधात अजून काही पुरावे मिळाले नाहीत. या दंगलीत 2.75 कोटींचं नुकसान झालं, 4017 लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 1000 जास्त लोकांचे जबाब नोंदवले गेले. प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. शेवटी चार्जशिटमध्ये 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारच्या मालमत्तेचं झालेलं नुकसान अजूनही रझा अकादमीनं भरुन दिलेलं नाही. आलेला मोर्चा पोलिसांना नीट हाताळता आला नाही असा आरोप पोलिसांवर केला गेलाय.जनतेची स्मरणशक्ती अशक्त असते असे म्हणतात, पण सर्वांचीच अशक्त असते असे नव्हे… गोधरा विसरून जे केवळ गुजरात दंगलींचे अद्याप भांडवल करीत आहेत, ते बुद्धिजीवी विचारजंत कोठे आहेत? जी प्रसारमाध्यमे, आंग्लाळलेले बुद्धिवंत, नसलेला भगवा आतंकवाद म्हणून कंठशोष करीत असतात ती या रानटी धर्मांध आतंकवादावर तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प का बसली आहेत? रेल्वेत जागा पकडण्याच्या पोरांच्या भांडणात जुनेद नावाचा मुस्लिम तरुण मारला गेला, तर त्या घटनेला हिंदू-मुस्लिम धार्मिक कलहाचा विखारी रंग देऊन ‘नॉट इन माय नेम’ म्हणत सार्‍या जगभर भारताची बदनामी करणारे तथाकथित बुद्धिवादी रझा अकादमीच्या देशद्रोही गुंडगिरीबद्दल आजतागायत चकार शब्द बोलले नाहीत. पानसरे, दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्या हत्येचे हिंदुत्ववाद्यांवर बेछूट आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे तथाकथित सेक्युलर, पुरोगामी, वामपंथी वगैरे मंडळी या अकादमीविषयी का बोलत नाहीत? गेल्या पाच वर्षांत यांच्या शोध-पत्रकारितेला रझा अकादमीची सविस्तर माहिती मिळविता आली नाही की मिळवायची नव्हती? या दंगलीपूर्वी ६ दिवस आधी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे त्या अकादमीमध्ये का गेले होते? जाण्यापूर्वी त्यांना ६ वर्षांपूर्वी भिवंडी दंगलीत गांगुर्डे आणि जगताप या दोन पोलिसांचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करणारी हीच अकादमी होय, अशी माहिती मिळाली नव्हती काय? की ती मिळूनही ते गेले होते? पोलिसांवर हात टाकणे, त्यांना मारून टाकणे व स्त्री पोलिसांची विटंबना करणे यातून कायद्याच्या रक्षणकर्त्यावर आपण हल्ला केला तरी आपले काहीच बिघडत नाही, हा संदेश पोचत नाही काय? ‘खल निग्रहणाय’ असे बिरूद मिरविणार्‍या पोलिस दलातील लोकांवर या सर्व गोष्टींचा काय परिणाम होत असेल? अमर जवान स्मारक तोडणार्‍या तरुणांच्या मुद्रेवरील आसुरी आनंद आजही आठवत असेल. ते स्मारक म्हणजे कोण्या एका धर्मियांचे धार्मिक स्थळ नव्हते, तरी ते घाव आणि लाथा घालून तोडण्यात आले. यामागची मानसिकता लक्षात घ्या. जवानांचे स्मारक हा राष्ट्रीय मानबिंदू असतो. तो तोडणे म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केल्यासारखे आहे. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे आहे. असे करायला धजावणे हाच देशद्रोह आहे. अशा या देशद्रोह्यांना लगोलग शिक्षा व्हायला हवी. मतांचे राजकारण करू पाहणार्‍यांना त्याचे काय? अमर जवान स्मारकाच्या नासधुसीनंतर एकातरी मुस्लिम संस्थेने निषेध व्यक्त केला का? कोणतीही मुस्लिम संस्था ते स्मारक पूर्ववत करण्यासाठी पुढे का आली नाही? यात कोण्या धर्माचा प्रश्‍न नव्हता, तर देशाच्या अस्मितेला ठोकर मारणार्‍यांचा प्रश्‍न होता. या धुडगुसानंतर रझा अकादमीकडून नुकसान भरपाई वसूल करून त्यांच्यावर बंदी का घातली गेली नाही? बजरंग दल, सनातन संस्था, विश्‍व हिंदू परिषद आदींचा जातीयवादी संस्था म्हणून सतत उल्लेख करणार्‍या प्रसारमाध्यमांचा रझा अकादमीला जातीयवादी असे म्हणताना घसा का बसतो? पोलिसांची वाहने जाळली जातात, प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅनला आग लावली जाते, सामान्य जनतेला मारहाण होते, तरीही प्रशासन सुस्त राहते, याला काय म्हणावे? दंगेखोर विशिष्ट समाजाचे म्हणून त्यांना अटक करण्यात येणार नसेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे कठीण आहे. त्यातून रमझानचा महिना म्हणून सबुरीने घ्या, असे सांगणार्‍यांना एकच विचारावेसे वाटते की, कांचीच्या शंकराचार्यांना ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अटक करण्यात आली होती, त्याचे काय? मुळात रझा अकादमी आणि अन्य मुस्लिम संघटनांना आझाद मैदानावर निदर्शने व मेळावा घेणे याला अनुमती कशी देण्यात आली, हा प्रश्‍न आहे. अण्णा हजारेंना उपोषणासाठी अनुमती नाकारली जाते आणि आसाम व म्यानमारमध्ये मुसलमानांची गळचेपी होत असल्याच्या निषेधार्थ मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्यास अनुमती दिली जाते, हे अनाकलनीय आहे! याच संघटनांनी या पूर्वी, इराकवर अमेरिकेने हल्ला केला त्याच्या निषेधार्थ निदर्शने करून महापालिकेच्या मुख्यालयावर आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर दगडफेक केली होती, हा पूर्वेतिहास विसरला गेला की दृष्टिआड करण्यात आला? आझाद मैदानावरील सभेत प्रक्षोभक भाषणे करून आसाम व म्यानमारमधील मुसलमानांच्या खोट्या करुण कहाण्या सांगून ‘इस्लाम खतरे में’चा आव आणला गेला. यामुळे समूह चिथावला गेला. केवळ निदर्शने असती तर जमावातील तरुणांकडे हॉकी स्टिक्स, धारदार लोखंडी नखे लावलेल्या लाठ्या, लोखंडी रॉड व दगड हे सर्व साहित्य कोठून आले? जमाव हिंसक का झाला? चिथावणीखोर भाषणे कोणी केली? याची उत्तरे कशी मिळणार…? या हिंसक जमावाने अमर जवान स्मारक तोडले, तसे करणे म्हणजे देशाचा अपमान असतो, हे त्यांना कोणी सांगितले नाही का? की ते माहिती असल्यामुळे जाणीवपूर्वक तसे करण्यात आले? आपले काय बिघडणार आहे, ही गुर्मी यामागे होती का? पोलिसांना मारहाण हीसुद्धा ठरवून व त्यांचे मानसिक धैर्य खच्चीकरणासाठीच झाली का? कारण वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ५२ पोलिस जखमी झाले. महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याइतके धारिष्ट्य कसे झाले? वानगीदाखल जखमींची माहिती- हनुमान दरेकर(इन्स्पेक्टर)- हे सर्वात पहिले लक्ष्य बनले. जमावाला सुव्यवस्था राखा, अशी विनंती करीत असतानाच डोक्यात हॉकीचा फटका बसला, त्यांचे पिस्तूल व काडतुसे पळविण्यात आली. बाळासाहेब जगताप (असि. इन्स्पेक्टर) जमावाला आवरत होते, विनंती करीत होते इतक्यात डोक्यात डावीकडून रॉडचा प्रहार झाला. प्रकाश पाटील (कॉन्स्टेबल) जमावाकडून होणार्‍या दगडफेकीत जखमी. अरुण साठे (कॉन्स्टेबल) डोक्यावर रॉडचा फटका बसून जबर जखमी. हणमंत माने (कॉन्स्टेबल) हे रेल्वेस्थानकावर कर्तव्य बजावत होते, तिथे लोखंडी शस्त्र लावलेल्या लाठीने फटका मारण्यात आला. रक्तबंबाळ झाले. तेजश्री आठवले (कॉन्स्टेबल) जमाव अनावर झालेला पाहून यांना अन्य तीन स्त्री सहकार्‍यांसह रायट कंट्रोल पोलिस वाहनात बसविण्यात आले. जमावातील लोकांनी बाहेरून वाहनावर फटके मारले, वाहन गदगदा हलवले. मोठ्या शिताफीने त्यांना बाहेर काढण्यात आले. दगडफेकीत डावा घोटा जायबंदी… पोलिसांच्या ३ गाड्या जाळण्यात आल्या. ४९ बेस्ट बसेसची मोडतोड करण्यात आली. वृत्तवाहिन्यांच्या ३ ओबी व्हॅन जाळल्या गेल्या. अनेक वाहने पेटवून देण्यात आली. सर्वसामान्य जनता भयभीत झाली होती. सर्वत्र हैदोस चालू होता… विविध वाहिन्यांवरून पोपटपंची करणारे मानवाधिकारवाले कोठे तोंड घालून बसले होते न कळे…! या सर्व हैदोसाचा निषेध एकाही मुस्लिम संघटनेने का केला नाही? सर्वधर्मसमभाव हा एकमार्गी असतो काय? एवढे होऊन धुडगूस घालणार्‍या संघटनांविरुद्ध सरकारने काय कारवाई केली? याचे उत्तर कधी मिळेल? अमर जवान स्मारक तोडून देशाच्या अस्मितेवर घाला घालणार्‍या व त्यांना तसे करायला उद्युक्त करणार्‍या देशद्रोह्यांना शिक्षा कधी होणार? सरकार बदलले तरी हे प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत…

No comments:

Post a Comment