बुरहान वानीपासून सुरू झालेले हे सत्र आज खोर्या त टिपल्या गेलेल्या लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानापर्यंत येऊन ठेपले. अबूच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरोधात निर्णायक मोहीम उघडलेल्या भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यातील काकापोरामध्ये सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या कारवाईत दुजानासह अन्य दोन दहशतवादीही मारले गेले. काकापोरा येथील एका घरात दुजाना आपल्या दोन-तीन साथीदारांसोबत लपला असल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने, जिथं दहशतवादी लपले आहेत, त्या घरालाच स्फोटकांनी उडवून दिलं! अशा रीतीने खोर्या तील आणखी तीन दहशतवादी जवानांच्या रडारवर आले. सरकारने लष्कराचे हात बांधून ठेवले असते, तर ही कारवाई करता आली नसती. कुठल्या अतिरेक्याच्या खात्म्यानंतर खोर्याचत हिंसाचार उफाळतो म्हणून लष्कराने पावले नसती टाकली, तर जनतेच्या मनात दहशत पसरविणारा अबू दुजाना भारतीय लष्कराच्या रडारवर आला नसता आणि त्याने आणखी मोठी दहशतवाद्यांची फौज उभी करून, ती भारताविरुद्ध उभी केली असती. विघटनवादी नेते नाराज होतात असा विचार केला असता, तर लष्कराच्या हाती हे यश आले नसते. खरे तर भारतीय लष्कर मोठी कारवाई करीत नाही, असा भ्रम पसरल्याने अतिरेक्यांचे फावत होते. ते जास्तीच उन्मादी कृत्ये करण्यास पुढे येत होते. राज्यात सत्तेवर असलेल्या एका घटक पक्षाचे आणि सध्या विरोधी पक्षात असलेल्या कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचेही विघटनवाद्यांना समर्थन आहेच. ते नाकारले जाऊच शकत नाही! पण, या सार्याय शक्तींचा विरोध झुगारून भारतीय लष्कर, गृहमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या खुल्या ढीलचा योग्य प्रकारे उपयोग करीत आहेत. बुरहान वानी असो की अबू दुजाना, ही पाकिस्तानात बसलेल्या हाफिज सैद, सलाहउद्दिन, दाऊद इब्राहिम आदींच्या हातातील प्यादी आहेत.
पाकिस्तानातून जसे आदेश येतील, त्या तालावर नाचणार्या या कठपुतळ्या आहेत; आणि या कठपुतळ्यांना आर्थिक मदत करणार्याण काही फुटीरवादी नेत्यांना अटक करून लष्कराने त्यांच्यादेखील मुसक्या बांधल्या आहेत. सात फुटीरवादी नेत्यांना अटक करून, त्यांना चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले आहे. शहीद उल इस्लाम या नेत्याकडे काश्मीर खोर्यादतील मोस्ट वॉण्टेड अतिरेक्यांची यादी सापडली. त्याच्यावर, खोर्यातत दहशतवाद वाढवण्यासाठी पाकिस्तानी एजन्सींकडून पैसा स्वीकारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तयार केलेली ही यादी शहीद उल इस्लामकडे कशी आली, याचादेखील सध्या तपास सुरू आहे. तो जम्मू-काश्मीर पोलिसांचा खबर्याल होता काय? याची तपासणी सुरू आहे. काश्मिरात सक्रिय असलेल्या १५८ अतिरेक्यांची यादी जम्मू-काश्मीर पोलिसांनी तयार केली होती. त्यांची नावेदेखील शाहीद इस्लामजवळ उपलब्ध झाली आहेत. हा सारा प्रकार चीड आणणारा आहे. आपली सुरक्षायंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करते आणि त्यांच्या योजना अतिरेक्यांच्या किंवा फुटीरवाद्यांच्या हाती लागतात, हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रकार आहे. आपल्यापैकीच काही जण अतिरेक्यांना मिळालेले असल्याशिवाय अशा गुप्त याद्या जाहीर होण्याची शक्यता नाही.
अशा घरभेद्यांना शोधून काढून त्यांना नेस्तनाबूत करण्याचीदेखील गरज आहे. यासाठी शिवाजी महाराजांसारखा ‘गनिमीकावा’ केला जायला हवा. सरकारने
भारतीय लष्कराला दिलेल्या मोकळिकीचा हळूहळू असर दिसू लागला आहे. गेल्या ३-४ वर्षांच्या तुलनेत यंदा लष्कराने तुलनेने कितीतरी अधिक अतिरेक्यांना पाणी पाजले आहे. यंदाच्या वर्षात जुलै महिन्यापर्यंत लष्कराने ९२ अतिरेक्यांना यमसदनी पाठविले आहे. २०१६ या वर्षाशी तुलना करता, हा आकडा याच काळात गेल्या वर्षी ७९ होता. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात २०१२ आणि २०१३ मध्ये अनुक्रमे वर्षभरात हा आकडा ७२ आणि ६७ च्या आसपास होता. लष्कराने केवळ अतिरेक्यांचा खात्मा करण्याचीच मोहीम हाती घेतलेली नाही, तर खोर्या तील लोकांना मानसिक आधार देण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
सुदूर गावात नैसर्गिक आपत्तींच्या वेळी गरीब लोकांना दूध पुरवणे, पाणी उपलब्ध करून देणे, आजारपणात औषधांची व्यवस्था करणे, हिंसाचारग्रस्त भागात मुलांच्या शिक्षणाची सोय करणे… अशी अनेक कामे लष्कराच्या तुकड्यांमार्फत सुरू आहेत. आम्ही येथे तुमच्यावर हुकुमत गाजावायला नाही, तर आपल्या मदतीसाठी आलो आहोत, असा विश्वाचस हळूहळू जागवला जात आहे. खोर्या तील सार्याअच समाजबांधवांचा आझादीला पाठिंबा असल्याचा जो लोकांमध्ये गैरसमज पसरलेला आहे, तो दूर करण्याचे प्रयत्न स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू आहेत. काश्मीरचा इतिहास, या क्षेत्राचे भौगोलिक आणि धोरणात्मक महत्त्व, या भागाची संस्कृती, येथील आध्यात्मिक चळवळी, तेथील पर्यटन, नृत्य, संगीत, कलाकुसर… आदी सार्यांौचा अभ्यास करणारी एक मोठी टीम देशभरात उभी होत आहे. जम्मू-काश्मीरला अतिरेक्यांच्या आणि विघटनवाद्यांच्या भरोशावर सोडले आहे, असे कुणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानानं आत्मसमर्पण करावं यासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी त्याची अगदी लहान मुलासारखी समजूत काढली होती, पण तो शेवटपर्यंत तयार झाला नाही आणि अखेर जवानांना त्याचा 'खेळ खल्लास' करावा लागला, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाला मिळाली आहे. अबू दुजाना आणि लष्करी अधिकाऱ्यांमधील शेवटचं संभाषण टाइम्सच्या हाती लागलंय. एखाद्या कट्टर दहशतवाद्यालाही भारतीय लष्कर शेवटची संधी देण्याचा प्रयत्न करतं, हे या संभाषणातून प्रकर्षाने जाणवतं.
एका काश्मिरी नागरिकाच्या मदतीने लष्करी अधिकाऱ्यांनी अबू दुजानाशी फोनवरून संवाद साधला. आपण आता घेरले गेलोय, याची पूर्ण कल्पना अबू दुजानाला आल्याचं जाणवतं. या टेपमध्ये तो शांतपणे बोलतोय, पण त्याची मुजोरी कायम आहे. त्याच्या पहिल्याच प्रश्नावरून ते लक्षात येतं.
अबू दुजानाः 'क्या हाल है? मैंने कहा, क्या हाल है?'
अधिकारीः 'हमारा हाल छोड़ दुजाना, तू सरेंडर क्यों नहीं कर देता। तेरी इस लड़की से शादी हुई है और तू जो इसके साथ कर रहा है वह ठीक नहीं है।'
पाकिस्तानी यंत्रणांनी तुला प्यादं म्हणून वापरलं आणि आज तू काश्मिरी जनतेसाठी त्रासाचं कारण ठरतोय, याची जाणीवही लष्करी अधिकाऱ्यांनी अबू दुजानाला करून दिली. पण, त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
अबू दुजानाः 'हम निकले थे शहीद होने, मैं क्या करूं। जिसको गेम खेलना है खेले, कभी हम आगे, कभी आप। आज आपने पकड़ लिया, मुबारक हो आपको। जिसको जो करना है कर लो। मैं सरेंडर नहीं कर सकता। जो मेरी किस्मत में लिखा है वही होगा। अल्लाह वही करेगा, ठीक है।'
तेव्हा, अधिकाऱ्यांनी त्याला आई-वडिलांचा विचार करायला सांगितलं. पाकमधून घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांना आम्ही मारू इच्छित नाही. कुणाला नुकसान पोहोचावं अशी अल्लाचीही इच्छा नाही. अल्ला सगळ्यांसाठी समानच आहे, असंही अधिकाऱ्यांनी त्याला समजावलं. तरीही तो आपल्या मतांवर कायम होता.
अबू दुजानाः 'मां-बाप तो उस दिन मर गए जिस दिन मैं उनको छोड़कर आया। अगर अल्लाह मेरे और तुम्हारे लिए एक जैसा है तो आओ, घर के भीतर मुझसे मुलाकात करो।'
पाकिस्तानी यंत्रणांनी माझा वापर करून घेतला, आता सगळा 'खेळ' माझ्या लक्षात आलाय, असंही दुजाना या संभाषणात म्हणतो. त्यानंतर, काश्मिरी जनतेला त्रास न देण्याचं आवाहन अधिकारी करतात, त्याला शरण येण्याची विनंतीही करतात, पण त्याच्याकडून काहीच उत्तर येत नाही
No comments:
Post a Comment