SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Thursday, 31 August 2017
चिनी मालावर बहिष्काराचे सगळ्यात ठोस कारण हे आहे की, चीनची भारतभूमीवर वक्रदृष्टी आहे. चीन सगळीकडून भारताची कोंडी करतो आहे, अतिरेकी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करतो आहे. चीन मालाच्या निर्यातीतून भारताकडून जो नफा कमावतो तो भारतविरोधी कारवाया करण्यात उपयोगात आणतो. काही व्यापारी संघटनांनी या अभियानाला पाठिंबा दिला, हे एक शुभचिन्ह आहे. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका सर्व वयोगटातील नागरिकांची आहे.
Sunday, 27 August 2017
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार आपल्या राज्यात एक मिनी पाकिस्तान व अफगानिस्तान निर्माण करण्याचा अघोरी प्रयत्न करीत आहेत
Saturday, 26 August 2017
कुणी ‘वंदे मातरम्’ म्हणायला तयार नाही, कुणी हिंदीच्या विरोधात लढाई करायला उभे राहिले आहेत. ‘‘इंग्रजी व इतर परदेशी भाषा चालतील, पण हिंदी नको’’ अशी मानसिकता दक्षिणेतील राज्यांची बनली आहे. हे घातक आहे,
लव्ह जिहाद' म्हणजे काय ? महा त भा 2
ईशान्य भारत ते चिनी समुद्र-दिनेश कानजी
NARCO TERROR IN GOA- राज्याची किनारपट्टी हे अमली पदार्थ व्यवहारांचे केंद्र बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे
J&K: 8 Security Personnel Martyred, 2 Terrorists Killed in Ongoing Gun Battle in PulwamaLया जवानांमध्ये साताऱ्याचे सुपुत्र रवींद्र धनावडे यांचाही समावेश आहे. -LADY COURAGEOUS – A true anecdote…. By Maj Gen Raj Mehta (Retd)
Friday, 25 August 2017
फुटीरवाद्यांची दुर्बुद्धी!‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने पाकिस्तानशी चीनने वाढवलेली दोस्ती हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिलेला आहे. चिन्यांच्या विश्वासार्हतेला 1962 मध्ये गेलेला तडा आजही कायमच आहे. चीनकडून पाकिस्तानचा वापर एक ‘आर्थिक गुलाम’ म्हणून होत आहे. विकासाचे गाजर दाखवून, मोठ्या आर्थिक मदतीच्या बुरख्याखाली चीनने पाकिस्तानला पूर्णपणे कह्यात घेतले आहे.
Monday, 21 August 2017
विघटनवादी गिलानी!
Sunday, 20 August 2017
‘लव्ह जिहाद’ हा विषय वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत येतो. केरळमधील अशाच एका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या विषयाची वस्तुस्थिती नेमकेपणाने सांगणारा हा लेख.---सुनील लोंढे-लव्ह जिहाद’ थांबण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे करणे आवश्यक आहे.
चिनी अगरबत्ती व धूप-कापरापासून सावधान!-गणेश पुराणिक
‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते.
Friday, 18 August 2017
शोधा, ओळखा आणि हाकला!-४० हजार रोहिंग्या मुस्लिम आपल्या देशात अवैध रीत्या घुसल्याची माहिती
Wednesday, 16 August 2017
WATCH ME LIVE ON TV CHANNEL ZEE 24 TAS 9PM- 10 PM 16 AUG 2017 - REPEAT TELECAST 0930 AM- 1030 AM 17 August- KASHMIR PROXY WAR
Tuesday, 15 August 2017
https://www.youtube.com/watch?v=5X7pdOBaM5w-दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त राजकिय पुढार्यांचे शुभेच्छा संदेश ऐकतो आणि वाचतो. मात्र हा संदेश आहे एक माजी सेनाधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी “मराठीसृष्टी” वेब पोर्टलवरुन दिलेला. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील शेकडो लेख वाचण्यासाठी मराठीसृष्टी (http://www.marathisrushti.com) वेब पोर्टलला भेट द्या-स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी सेनाधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी दिलेला संदेश.
Former IAF Chief Arrested 09 Dec 2016-The Air Force was called in only to evaluate the helicopters offered. The specifications were set by the GoI, the specifications were changed by the GoI, the trials and evaluation were carried out by the IAF, after the accused had retired. At what point of the entire fracas was the accused in a position to influence the trial, evaluation, the purchase decision or the contract? Once again, the big fish have digested and burped. Someone else is in the net.
Please don’t worship our soldiers (Published in New Indian Express 14 August 2017) Aditi Hingu
Monday, 14 August 2017
NEW BOOK BY BRIG HEMANT MAHAJAN- India’s Coastal Security, Challenges, Concerns & Way Ahead”
Saturday, 12 August 2017
स्वातंत्र्यदिन, काश्मिरी जनता आणि दहशतवाद…! August 13, 2017 0
काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्वावस ठेवावा. त्यांचे संरक्षण करण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पृष्ठभूमीवर अतिरेक्यांनी दिलेल्या धमकीला भीक न घालता, काश्मिरी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये बिनधास्त सहभागी व्हावे अन् धमकी देणार्याभ अतिरेक्यांना सडेतोड उत्तर द्यावे! काश्मिरी जनता जोपर्यंत स्वत:ला भारताचा अविभाज्य घटक मानत नाही तोपर्यंत त्यांची सर्वांगीण प्रगती केवळ अशक्य आहे…
मंगळवारी, १५ ऑगस्टला देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. संपूर्ण देश त्यासाठी सज्ज आहे. दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिल्यानंतर आणि असंख्य क्रांतिकारकांनी हसतहसत स्वत:ला फासावर चढविल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. देश स्वतंत्र व्हावा यासाठी अगदी सामान्यातल्या सामान्य नागरिकांपासून तर महात्मा गांधींपर्यंत अनेकांनी आपापल्या परीने योगदान दिल्यानेच आज आम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची संधी मिळत आहे. असे असले तरी भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरखोर्यारत स्वातंत्र्यदिन साजरा होऊच नये यासाठी अतिरेकी संघटनांकडून धमक्या मिळू लागल्या आहेत. काश्मीरमधल्या शाळांतील मुलांनी आणि शिक्षकांनी १५ ऑगस्टच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देणारी पत्रके शाळांच्या भिंतींवर अतिरेक्यांकडून चिकटवण्यात आली आहेत. खोर्याीतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर दहशतवादाचे सावट आहे. परंतु, भारतीय सुरक्षा दलाचे जवान, काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या जिवाचे संरक्षण करण्यासाठी खोर्याेत सज्ज आहेत. नागरिकांनी अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बिनधास्त सहभागी व्हावे, असे आवाहन भारत सरकारनेही केले, हे योग्यच झाले.
गेल्या वर्षीपासून काश्मिरात दहशतवाद पुन्हा फोफावू लागला असताना, भारत सरकारने कणखर भूमिका घेत दहशतवाद निखंदून काढण्यासाठी लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग देशहितासाठी करीत लष्कराचे शूर जवान दररोज अतिरेक्यांना टिपत आहेत. दोनशेपेक्षा जास्त सशस्त्र अतिरेक्यांची ओळख पटवत त्यातले अर्धे यमसदनी पाठवून, खोर्याअतील दहशतवाद समाप्त करताना अर्धी लढाई सुरक्षा दलांनी जिंकली आहे. उरलेली लढाई सरकारही स्वत:च्या पातळीवर लढत आहे. गिलानी, मीरवाईज उमर फारूक आणि यासिन मलिकसारखे जे फुटीरतावादी नेते आहेत, जे भारताचे मीठ खाऊन पाकिस्तानची पाठराखण करतात, त्यांची दुकानदारी बंद करण्याचा वज्रनिर्धार सरकारने केला आहे. त्यातूनच गिलानी गटाचे सात लोक सध्या तुरुंगात धाडण्यात आले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
गेल्या वर्षी लष्कराने बुरहान वानी या कुख्यात अतिरेक्याला टिपले होते. त्यानंतर सबजार अहमद भट याला टिपले होते. आत्ता गेल्याच आठवड्यात लष्कराने अबु दुजाना या खतरनाक अतिरेक्याला मारले. त्यानंतर कालपरवाच मुसा गटाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात लष्कर यशस्वी झाले. दररोज दोन ते तीन अतिरेक्यांना हुडकून मारण्यात लष्कराला जे यश मिळत आहे ते पाहता, अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे आणि त्यातूनच त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शाळकरी मुलांनी सहभागी होऊ नये अशी धमकी दिली, हे स्पष्ट आहे. भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली असताना आणि सुरक्षा दलाचे जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करीत असताना, काश्मिरी जनतेने अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता स्वातंत्र्यदिन धुमधडाक्यात साजरा करायला हवा.
आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की, काश्मिरी जनता जोपर्यंत स्वत:ला भारताचा अविभाज्य घटक मानत नाही तोपर्यंत त्यांची सर्वांगीण प्रगती केवळ अशक्य आहे. भारतीय लष्कर जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमध्ये दाखल झाले होते, तेव्हा ते काश्मिरी जनतेच्या रक्षणासाठीच, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. जर आपण अजूनही दहशतवाद्यांनाच आश्रय देणार असू, तर शांतता अन् स्थैर्य कधीच लाभणार नाही अन् आर्थिक प्रगती तर शक्यच होणार नाही, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. कट्टरपंथी विचार कधीच प्रगतीकडे नेत नाहीत, ते विनाशाचेच कारण ठरतात, हे लक्षात घेऊन काश्मिरी जनतेने स्वयंनिर्णय घेतला तरच त्यांचे कल्याण होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. काश्मिरी तरुणांनी आयएसआय आणि फुटीरतावाद्यांच्या कचाट्यातून स्वत:ला सोडवावे आणि उत्तम आयुष्य जगण्याचा मार्ग मोकळा करावा.
आज काश्मीरमध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, ती त्या प्रदेशाला कुठे घेऊन जाणार, हे येणारा काळच सांगेल. पण, काश्मीरमधल्या लोकांची वृत्ती बदलली नाही तर ते आत्मनाश करून घेणार, यात शंका नाही! काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्यापासून आजपर्यंत तिथे कधीही शांतता नांदली नाही. नांदू दिली गेली नाही. बोटावर मोजण्याएवढ्या काही स्वार्थी लोकांनी तिथल्या शांतताप्रिय नागरिकांना भडकवले आणि आपल्या पोळ्या शेकण्याचा उद्योग केला. आजही तो घाणेरडा उद्योग सुरूच आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या चिथावणीवरून काश्मिरी तरुण भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर दगड फेकत आहेत, त्यांना शिवीगाळ करीत आहेत, त्यांचा अपमान करीत आहेत. अतिरेक्यांशी लढणार्यार आमच्या जवानांच्या मार्गात ते आडवे येत आहेत. तिथले तरुण पाकच्या चिथावणीला बळी पडत असेच वागत राहिले, तर त्यांच्या सत्यानाशाला कारणीभूत तेच ठरणार आहेत!
काश्मीरचे काय होणार याची चिंता सगळ्यांनाच वाटत असली, तरी केंद्रातील मोदी सरकार काश्मीरचा प्रश्न योग्य रीतीने हाताळत आहे आणि त्याबाबत सामान्य जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. जेवढी चिंता आपल्याला आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक चिंता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकार्यांणना आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याकडे वाकड्या नजरेने पाहणार्यायला धडा शिकविण्याची ताकद आमच्या सेनादलात आहे, याविषयी आम्ही खात्री बाळगली पाहिजे. आज काश्मिरात जी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेत सरकारने निश्चिआतपणे उपाय योजले असणार, यात शंका नाही. योजलेले उपाय गोपनीय ठेवणे आवश्यक नसते तर ते सरकारने जनतेला सांगितलेच असते. आपण निवडून दिलेले सरकार असल्याने त्यावर विश्वारस ठेवत सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत हे खरे असले तरी सगळे दहशतवादी मुसलमानच आहेत, हे दुर्दैवाने खरे आहे. काश्मीर भारतात विलीन झाल्यापासून भारत सरकारने कधीही काश्मीरला सापत्न वागणूक दिली नाही. मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याच्या मार्गातही सरकारने कधी बाधा आणली नाही. त्यांच्या धार्मिक मान्यताही कधी फेटाळून लावल्या नाहीत. एखादे सरकार तुम्हाला जर तुमच्या धर्मातील रीतिरिवाजानुसार वर्तन करण्याची अनुमती देत आहे, तर मग त्या सरकारच्या विरुद्ध आवाज उठविण्याचे कारण काय? जे सरकार तुम्हाला धर्माचरणाचे संपूर्ण स्वातंत्र्य देते त्या सरकारविरुद्ध लढाई लढणे इस्लामला खरे तर मान्य नाही. इस्लाममध्ये ही बाब निषिद्ध मानली जाते.
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता असताना भारताच्या जवानांवर दगडफेक होत नाही, असे मानले जाते. बहुतांशी ते खरेही आहे. पण, नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता जाताच तिथे दगडही फेकले जातात, हिंसाचारही वाढतो, भारताविरुद्ध जनमानस पेटून उठते, हे कसे काय? सत्ता गमावलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तर फुटीरवाद्यांना चिथावणी देत नाहीत ना? तेच तर त्यांना आर्थिक रसद पुरवत नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्ने उपस्थित होतात. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर जे संस्कार झाले आहेत, त्या संस्कारांमुळेही कदाचित त्यांची नॅशनल कॉन्फरन्स फुटीरतावाद्यांना चिथावणी देत असेल. त्यांचे वडील शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी जे संस्कार दिले, ते लक्षात ठेवूनच फारूक यांची वाटचाल सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी कुपवाडात झालेल्या चकमकीचा मुसलमानांना बदनाम करण्याशी काय संबंध आहे? काहीच नाही. सीमेपलीकडून पाकिस्तानप्रशिक्षित अतिरेकी काश्मिरात घुसतात, आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात, त्यात आमचे शूर जवान शहीद होतात अन् हे अतिरेकीही मरतात. आता चकमक करणारे आणि मरणारे अतिरेकी हे मुसलमान आहेत, हा काय सुरक्षा दलाचा दोष आहे का? त्या चकमकीची चर्चा करणार्यां चा दोष आहे का? अजीबात नाही. मग, फारूक अब्दुल्ला यांनी चकमकीच्या चर्चेचा संबंध मुसलमानांच्या बदनामीशी जोडण्याचे कारण काय? कारण आहे त्यांचे अतिशय संकुचित, घाणेरडे, जातीयवादी राजकारण.
काश्मीरखोर्या त आज जेवढे नेते आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत, ते सगळे या आंदोलनाला ‘इस्लामिक’ असे संबोधत आहेत. पण, खरे पाहता या आंदोलनाचा इस्लामशी काहीएक संबंध नाही. गनिमी कावा आणि कटकारस्थान करून लढाई लढणेही इस्लामच्या तत्त्वात बसत नाही. असे असतानाही काश्मिरातील नेते गनिमी काव्याने आणि कटकारस्थान करून भारतीय लष्करासोबत लढताना दिसतात. ही बाब इस्लामच्या विरुद्ध आहे, असे इस्लामला मानणारे अनेक विद्वान सांगतात. आज काश्मिरी तरुणांना भारतीय लष्कराविरुद्ध चिथावण्यात आले आहे. हे तरुण दगड फेकून स्वत:चा जीव धोक्यात घालताहेत. मात्र, यांच्या जिवावर काश्मिरी नेते आपल्या पोळ्या शेकून मजा मारत आहेत. काश्मिरात अशांतता, अस्थिरता असल्याने मुलं शाळेत जात नाहीत, तरुण कॉलेजात जात नाहीत, त्यांचे शिक्षण अर्धवट होत आहे. दुसरीकडे मात्र चिथावणी देणार्याल फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांची मुले उच्चशिक्षित होऊन तिकडेच राहात आहेत अन् रग्गड कमाईही करीत आहेत. फुटीरतावादी सगळे नेते भारत सरकारकडून विविध सोईसवलतीही घेत आहेत अन् भारताविरुद्ध लढाईही पुकारत आहेत. या नेत्यांचे ऐकणे सोडले नाही तर तिथल्या तरुणाईचे भविष्य अंधकारमय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. फुटीरतावादी नेते आपल्याच लोकांचे जीवन बरबाद करीत आहेत, हे तिथल्या लोकांनी ओळखले पाहिजे.
काश्मिरी लोकांनी जरा भूतकाळात डोकावून पाहिले तर त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडेल, दुसरे काही नाही! ज्या अंधार्यां गल्लीला अंतच दिसत नाही अशा गल्लीत फुटीरतावादी नेते काश्मिरी तरुणाईला ढकलत आहेत. फुटीरतावाद्यांमध्येही दोन गट आहेत. एकाला असे वाटते की, काश्मीर स्वतंत्र झाले पाहिजे अन् दुसर्याफला असे वाटते की, पाकिस्तानात विलीन झाले पाहिजे. आज काश्मीरकडे जो पर्याय शिल्लक आहे तो भारत किंवा पाकिस्तान नव्हे, तर यश व अपयश हाच आहे. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर काश्मिरी जनता अपयशी ठरल्याचेच दिसते आहे.
काश्मिरी जनतेच्या कल्याणासाठी भारत सरकारने सर्व प्रकारचे उपाय केलेत, प्रचंड आर्थिक मदत केली, सुरक्षा पुरविली. असे असतानाही तिथली जनता दरिद्री, अस्थिर जीवन जगत आहे, हे दुर्दैवीच होय. आज जगात जेवढे मुसलमान आहेत, त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त प्रगती कुणाची झाली असेल तर ती भारतातल्या मुसलमानांची झाली आहे! भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या देशात प्रत्येकाला आपल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार आचरण करता येते. तसे स्वातंत्र्य आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी देशांचा विचार केला, तर सर्वाधिक श्रीमंत मुसलमान हे भारतात आहेत. ही बाब तमाम मुस्लिमांनी लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करण्यापूर्वी काश्मिरी तरुणांनी हजारदा विचार केला पाहिजे. पाकिस्तान हा भारतासोबतच स्वतंत्र होऊनही दिवाळखोर का आहे, याचा विचार केला तर काश्मिरींना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. अमेरिकेने फेकलेल्या तुकड्यांवर पाकिस्तान आणखी किती दिवस गुजराण करणार आहे? एकाच वेळी स्वतंत्र झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत आज किती अंतर आहे आणि ते का आहे, हेही काश्मिरी नागरिकांनी लक्षात घ्यावे, म्हणजे परिस्थितीचा आणखी चांगला अंदाज त्यांना येईल
Subscribe to:
Posts (Atom)