Total Pageviews

Tuesday, 6 March 2012

अपहरणाच्या भीतिपोटी हिंदूंचे बलूचिस्तानमधून पलायनइस्लामाबाद, मार्च
पाकिस्तान हिंदू च्या बलूचिस्तान प्रांतात गेल्या दोन महिन्यांत तब्बल २३ हिंदूचे अपहरण करण्यात आले असून यामुळे भयभीत झालेल्या अल्पसंख्यक हिंदूधर्मीयांनी पाकिस्तानच्या इतर भागात पलायन करण्यास सुरुवात केली आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.बलूचिस्तान प्रांतात खंडणीसाठी अपहरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे बलूचिस्तानचे गृहसचिव नसीबुल्ला बझाई यांनी सांगितले. एकट्या क्वेटा विभागात गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७० जणांचे अपहरण करण्यात आले होते. ७० पैकी ५३ जणांची सुटका करण्यात यश मिळाले असले तरी उर्वरित जणांचा अजूनही काहीही थांगपत्ता नाही, असे बझाई यांनी डॉन वाहिनीशी बोलताना सांगितले. हिंदू समुदायाच्या २३ जणांचे अपहरण करण्यात आले होते. अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी अपहरणविरोधी दलांना तैनात करण्यात आले असले तरी भयभीत झाल्यामुळे हिंदू पाकच्या इतर प्रांतांमध्ये स्थलांतर करत आहे हे त्यांनी मान्य केले. पाकिस्तानच्या बलूचिस्तान आणि सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे वास्तव्य आहे
पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर वाढते अत्याचार पाकिस्तानात
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात चार हिंदू डॉक्टरांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. शिकारपूरनजीकच्या चक टाऊन परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये हे ह्त्याकांड करण्यात आलं. या घटनेत तीन हिंदू डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाली. अर्थात पाकिस्तानात हिंदूंच्या या नरकयातना काही नवीन नाहीत. मात्र या नरकयातना कधी थांबणार ? याचंही उत्तर कोणाकडे नाही. संपूर्ण पाकिस्तानातच हिंदू समाजाला टार्गेट केलं जात आहे. चक टाऊन परिसरात असलेले पन्नास हजार हिंदू आणि पाकिस्तानातल्या विविध भागात असलेले हिंदू दहशतीखाली जगत आहेत. अर्थात माझ्यासारख्या मुंबईत बसलेल्या एका पत्रकाराला त्या विषयी काय माहिती आहे ? असा प्रश्न कोणत्याही सेक्युलर किंवा अभ्यासू व्यक्तीला पडणं सहाजिक आहे. चार हिंदू डॉक्टरांची हत्या झाल्याची बातमी सगळ्यांनाच माहिती झाली आहे. अर्थात वृत्तपत्रात आल्यामुळं ती माहित झाली आहे.मागील आठवड्यातही शंभर हिंदू तरूणांनी धर्मांतर करून ते मुस्लिम झाल्याची एक बातमी मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार मशिदीच्या इमामने या तरूणांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय धर्मांतर केल्याचा दावा केलाय. अहो इमामसाहेब मात्र पाकिस्तानात तर सोडाच पण कधी हिंदूस्थानातही कधी कोणत्या शंभर मुस्लिम तरूणांनी स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी कधी कोणी वाचलेली नाही. अगदी सेक्युलरसुद्धा हे मान्य करतील. पाकिस्तानात भरदिवसा हिंदू तरूणींना पळवून नेऊन त्यांच्या बरोबर निकाह लावले जात आहेत. हिंदू तरूणींची ही विटंबना तिथं खुलेआम सुरू आहे. ही सगळी माहिती कोणत्याही वाचकाला pakistanhindupost.blogspot.com/ वर वाचता येईल.

अल्पसंख्याक समाजावरील वाढत्या अत्याचारांबाबत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी चिंता व्यक्त केली असून सर्व धर्माना समान स्थान देण्याच्या महम्मद अली जिना यांच्या तत्त्वाला ही मूठमाती असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले पाकिस्तान हा मुस्लिमांचा देश असला तरी तेथे सर्वच धर्म आणि वांशिक गट शांततेने सौहार्दाने नांदतील, असे जिना यांचे स्वप्न होते. मात्र द्वेषाच्या तत्त्वज्ञानाने या तत्त्वाचा तसेच भट्टींसारख्या समाजसेवकाचा बळी घेतला आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक विशेषत: हिंदू मुलींचे अपहरण, सक्तीने धर्मातर आणि सक्तीने विवाह करण्याचे प्रकार वाढत असून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल यांनी त्याबाबत चिंता व्यक्त करीत पाकिस्तानचे जनक जीना यांच्या तत्त्वांशी ही फारकत असल्याची टीका केली आहे.सिंधच्या दक्षिणेकडील घोटकी जिल्ह्य़ात रिंकल कुमारी या १९ वर्षीय तरुणीच्या अपहरण आणि सक्तीच्या धर्मातराची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून लाहोर प्रेस क्लबबाहेर सर्वच अल्पसंख्याक समुदायांनी त्याविरोधात गुरुवारी जोरदार निदर्शने केली. पाकिस्तान पार्लमेंटमधील सदस्य अब्दुल हक ऊर्फ मियाँ मिठ्ठू याच्या मुलाने हे अपहरण केल्याचा आरोप आहे. या निदर्शनात या मुलीच्या समस्त आप्तांनीही भाग घेतला. आपल्यालाही धमकावले जात असून आपण लाहोरमधील गुरुद्वारात आश्रय घेतला आहे, असे तिच्या पालकांनी सांगितले.मुलीची लेखी जबानी दुर्लक्षित करून निकाल अपहरणकर्त्यांच्यावतीने देण्यासाठी खासदार हक यांनी न्यायालयावरही दडपण आणल्याचा रिंकलच्या नातेवाईकांचा आरोप आहे. रिंकल दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली असून आपल्याला जबरदस्तीने पळवून नेऊन आपल्या इच्छेविरुद्ध आपले धर्मातर केले गेल्याचे तिने लेखी जबानीत नमूद केले आहे.रिंकलचे वडील नंदलाल हे योरलुंदमधील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. ते म्हणाले, गेल्या शुक्रवारी अब्दुल हकचा मुलगा मियाँ अस्लम आणि त्याचा मित्र नवीद शाह या दोघांनी माझ्या घरात घुसून रिंकलचे अपहरण केले. सुरुवातीला पोलिसांनी तक्रारही नोंदवून घ्यायला नकार दिला होता मात्र तिच्या नातेवाईकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर न्यायदंडाधिकारी हसन अली कलवार यांच्यासमोर रिंकल आणि नवीद शाह यांना हजर करण्यात आले तेव्हा आपल्याला धर्मातर मान्य नसून पालकांसोबतच राहायचे आहे, असे तिने सांगितले. मात्र न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला महिला सुधारगृहात पाठविले तर नवीदला एक दिवसांची कोठडी दिली. त्यानंतर सोमवारी रिंकलला पुन्हा न्यायालयात आणले गेले पण तिच्या पालकांना कळविले गेले नाही. न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला तात्काळ हकच्या माणसांकडे सुपूर्द केले. रिंकलच्या पालकांना रोखण्यासाठी न्यायालयाबाहेर शेकडो सशस्त्र गुंडही हजर होते. या निकालाविरोधात तक्रार केल्यास तुमची हत्या करू, अशा धमक्या मिळाल्याने मी सिंध सोडून पळालो आहे, असे नंदलाल यांनी पत्रकारांना सांगितले.मानवी हक्क आयोगाकडून दखल
रिंकलच्या अपहरण सक्तीच्या धर्मातराची पाकिस्तानच्या मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून सरकारने तात्काळ या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, असा आदेश दिला आहे. रिंकल ही पाकिस्तान पीपल्स पार्टीचा खासदार हक याच्या तावडीत आहे, याकडेही आयोगाने लक्ष वेधले आहे. २५ फेब्रुवारीला रिंकलने न्यायालयात आपल्याला पालकांकडेच जायचे असून धर्मातर मान्य नाही, असे सांगितले होते. त्यानंतर २७ तारखेला न्यायालयात हिंदूंना प्रवेश नाकारून तिला हकच्या ताब्यात देण्यात आले, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. ‘मला माझ्या घरी जायचे आहे, असे त्या मुलीचे म्हणणे होते आणि तिचा सक्तीने विवाह झाला असताना, ‘नवऱ्याचे घर हेच मुलीचे घर ठरते म्हणून मी तिला सासरी पाठवत आहे, असा निकाल न्यायाधीशांनी दिला, याबाबत आयोगाने चीड व्यक्त केली आहे. अपहरण आणि सक्तीच्या धर्मातराचे प्रकार वाढत असल्याबद्दल आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.झरदारी यांचे आदेश
आयोगाच्या आदेशानंतर रविवारी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी सिंध सरकारला या अपहरणाबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले. हा तपास पारदर्शक तसेच वेगाने व्हावा तसेच दोषी कितीही मोठा असो त्याचे दडपण येऊ देता तात्काळ कारवाई करावी, असे त्यांनी बजावले आहे.ख्रिस्ती महिलेची धिंड
इस्लामविरोधी मते मांडल्याबद्दल पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील सियालकोट जिल्ह्य़ातील कोट मीरठ गावात जमावाने सीमा बीवी या ख्रिस्ती महिलेची धिंड काढली. जमावाने तिला तिच्या घरातून खेचून बाहेर आणले आणि तिचे मुंडण केले. त्यानंतर तिची धिंड काढली गेली. हा प्रकार २६ फेब्रुवारीला झाला असून तेव्हापासून सीमी बीवी तिच्या कुटुंबीयांनी भीतीने गावच सोडले आहे. पोलिसांनी २६ जणांना अटक केली आहे

No comments:

Post a Comment