Total Pageviews

Wednesday, 7 March 2012

जागतिक महिला दिवस आणी सैन्यदलांतिल महिला :काही प्रश्‍न आजही अनुत्तरितच पहिली महिला "जवान': ८ मे ला महिला दिवस आहे.सशस्त्र दलात पण महिला महत्वाची जवाबदारी निभावत आहे.सैन्यदलांचे शौर्य मुख्यत्वे दणकट पुरुषी मनोवृत्ती शरीराशी संबंधित असल्याचे मानले जाते. पण दोन मुलांची आईसुद्धा या शौर्यात पुरुषांच्या बरोबरीने उभी राहू शकते, हे भारतीय सैन्यात दाखल झालेल्या पहिल्या महिलेने दाखवून दिले आहे. शारीरिक क्षमता चाचणीत पुरुष सहकाऱ्यांपेक्षा अधिक सक्षम कामगिरी करत 35 वर्षीय सप्पर शांती टिग्गा प्रादेशिक सेनेच्या (टेरिटोरियल आर्मी- टीए) "969 रेल्वे अभियंता रेजिमेन्ट'मध्ये दाखल झाल्या. लष्करात पहिली महिला सैनिक होण्याचा मान ३५ वर्षीय सापेर शांती टिग्गा हिने पटकाविला आहे. महिलांसाठी रेल्वे रेजिमेन्ट लष्करातील प्रवेश कधीचाच खुला झाला. पण, त्यातही अधिकारी स्तरावरच महिलांची नियुक्ती होत होती. अधिकारीपदाखाली कोणीही महिला नव्हती. आता हे क्षेत्रही महिलांच्या आवाक्यातच आले असून याचा श्रीगणेशा टिग्गा हिने केला आहे. सशस्त्र दलात महिलांना युद्ध भूमीवर जाणार्‍या विभागातच नियुक्त केले जाते. पण, टिग्गा हिने आपल्या कौशल्याने सुमारे १२ लाखांच्या संख्येत जवान असलेल्या सशक्त संरक्षण दलात पहिली महिला जवान म्हणवून घेण्याचा मान पटकाविला आहे. तिने यासाठीच्या सर्व शारीरिक चाचण्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्या. एवढेच नव्हे तर आपल्या पुरुष सहकार्‍यांनाही तिने मागे टाकले.प्रशिक्षण शिबिरात तिने सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कारही पटकाविला. शिखाने घडविला इतिहास भारतीय सेनादलांत महिलांचा प्रवेश प्रथम झाला तो वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून सेनादलात १९६८ साली दाखल झालेल्या पुनीता अरोरा या लेफ्टनंट जनरल आणि नौदलाच्या व्हाइस अ‍ॅडमिरल या मानाच्या पदापर्यंत पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. भारतीय वायुदलातही महिला वैमानिक दाखल झाल्या खऱ्या पण असे असले तरी महिलांचा समावेश हा अधिकारी पदापर्यंतच अधिकांश राहिला. थेट रणांगणावर महिलांची नियुक्ती भारतात आजवर झाली नव्हती.पुरुषप्रधान सेवेत शिखाने गेल्या इतिहास घडविला. एएफएमसीमधील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून लष्करी सेवेत प्रवेश करण्यासाठी झालेल्या संचलनात (पासिंग आउट परेड)स्वोर्ड ऑफ ऑनर'( मानाची तलवार धारण करण्याचा मान )मानाची तलवार धारण करण्याचा मान तिला मिळाला. वडील संतोषकुमार अवस्थी होते कनिष्ठ अधिकारी (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर)! त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे शिखा एक पायरी पुढे जाऊनसवाई ठरली. स्वोर्ड
"
ऑफ ऑनर' मिळवणारी पहिली महिला अनेक आर्मी ऑफिसर्सच्या एमबीए केलेल्या मुलींनी लष्करात प्रवेश करण्यासाठी कॉर्पोरेटचं मायाजाळ दूर सारलं आहे. अशा अनेक मुली आज चेन्नईच्या ट्रेनिंग ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.कॅप्टन टी. . दिव्या ही कॅडेट चेन्नई इथल्या अधिकारी प्रशिक्षण केंद्रात या वर्षी "स्वोर्ड ऑफ ऑनर' मिळवणारी पहिली महिला ठरली आहे.इथे शारीरिक उपक्रमांपासून परीक्षांपर्यंत आणि आधुनिक युद्ध प्रशिक्षणापर्यंत सर्व कॅडेट्‌स हे प्रत्येक प्रसंग युद्धातला मानूनच लढतात. पण पुरुष पुरुषांबरोबर लढतात, तर स्त्रियांना प्रशिक्षण देणाऱ्या स्त्रियाच असतात. प्रत्यक्ष लढण्याच्या वेळी अशी काही विभागणी नसणार नक्कीच.
महिला हेलिकॉप्टर पायलट स्नेहा शेखावत आणि तिची सहकारी तेजश्री पाटील या दोघी फ्लाइंग ऑफिसर्स हेलिकॉप्टर पायलट आहेत. उंच उडण्याचं त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. वाहतुकीसाठी वापरल्या जाणारी हेलिकॉप्टर्स आणि विमानं चालवणाऱ्या, संख्येने छोट्या पण निग्रही महिलांच्या गटाचं त्या प्रतिनिधित्व करतात. तेजश्रीच्या मतानुसार जम्मू-कश्‍मीरसारख्या किंवा जिथे चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणांहून जखमी सैनिकांना परत आणण्याचं काम हे खूप नैतिक समाधान देणारं आहे.1999 साली कारगिल युद्धादरम्यान प्रसिद्ध झालेलं गुंजन सक्‍सेना या महिला फ्लाइंग ऑफिसरचं छायाचित्र आजही सर्वांच्या स्मरणात आहे. तिच्या "चिता" हेलिकॉप्टरने शत्रूच्या हद्दीत प्रवेश करून आपल्या जखमी जवानांना परत आणण्याचं धैर्य दाखवलं होतं. हवाई दलाच्या पहिल्या बॅचमधील या महिलेने 10 वर्षांनंतर सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं, ''मला फायटर प्लेन चालवायला नक्कीच आवडलं असतं, पण शत्रूच्या प्रदेशात सापडलो तर काय, ही भीतीही वाटली होती." ही भीती खरं तर प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याच्या मनात असते. काही प्रश्‍न प्रत्यक्ष युद्धात महिलांचा सहभाग" हे अजूनही पूर्ण झालेलं स्वप्न आहे. पुरुषांपेक्षा महिला कमजोर असतात ,पण त्या , बौद्धिक मानसिकदृष्ट्याही युद्धासाठी सक्षम आहेत. किंबहुना शिस्तपालन सहकाऱ्यांशी सौहार्दाने वागणं, परिपक्वता या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस असल्याचं दिसलं आहे. भारतीय सैन्यात 90 टक्के जवान हे पुरुषप्रधान ग्रामीण भागातून येतात. ग्रामीण भागात आजही पुरुषप्रधान संस्कृती आहे. ""महिला लष्करात, युद्धभूमीवर दाखल होण्यासाठी फक्त महिलांनाच प्रशिक्षणाची गरज आहे असे नव्हे. तर त्यांना दलात सामील करून घेण्यासाठी पुरुषांचीही बरीच तयारी करून घ्यावी लागणार आहे.'' सध्या केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये सीमा सुरक्षा दलासह एकूण 11 हजार 412 महिला आहेत. हा आकडा एकूण सैन्याच्या 1.5 टक्का आहे. लष्करात 4,101 महिला आहेत, मात्र त्या सहायक विभागांमध्ये म्हणजे सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञ, दारूगोळा . पुरत्याच सीमित आहेत. भारतीय नौदलात 252 महिला आहेत, मात्र तिथेही त्यांची जहाजांवर आणि पाणबुडीवर नियुक्ती होत नाही. वायुदलात 872 महिला काम करतात. इथे युद्धक्षेत्र सोडलं तर त्यांना इतर सर्व विभागांत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. संरक्षणाची जबाबदारी सर्वोत्तम खांद्यावरच काही प्रश्‍न आजही अनुत्तरितच आहेत. पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र त्यांनी जिंकलंय का? त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा सन्मान मिळतोय का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःला काय म्हणवून घ्यायला आवडेल? एक अधिकारी, महिला अधिकारी, की निव्वळ सैनिक? 1000 महिला पंजाब आणि पश्‍चिम बंगाल इथल्या सीमेवर तैनात आहेत. महिला म्हणून काही सवलतीही मिळतात. उदाहरणार्थ, पुरुषांना 3.2 किमीचं अंतर धावण्यास 13 मिनिटांचा कालावधी दिला जातो, तर महिलांसाठी तो निकष 17 मिनिटं आहे. कामावर दाखल झाल्यावरही त्यांना काही सवलती असतात. प्रत्यक्षात सीमेवर त्या गस्त घालतात, पण फक्त दिवसा. त्यांच्या कामाची वेळही सहा तासांचीच असते. पुरुषांना मात्र या सवलती नाहीत. त्यांच्या अधिकाऱ्यांपुढे महिलां भरतीने नवे प्रश्‍न निर्माण केले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी असल्याने अनेकदा आपल्या हाताखाली महिला घेण्यास अधिकारी काचकूच करतात. विशेषतः जेव्हा महिलांवर एखादी अवघड जबाबदारी सोपवायची वेळ येते, तेव्हा हे अधिकारी अधिकच सावधगिरी बाळगतात. अनेकांच्या म्हणण्याचा कल हा देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही सर्वोत्तम खांद्यावरतीच असायला हवी. मग तो पुरुषाचा असो वा स्त्रीचा. TELE-020-26851783, MOB 09096701253,

No comments:

Post a Comment