Total Pageviews

Sunday, 25 March 2012

जिथे पोलिसांची हद्द संपतेकानून के हात लंबे होते है!. असे म्हटले जात असले तरी अनेक भागात पोलिसांचे हात गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचत नसल्याने चोरी, हाणामा-या आणि लुटमारी करण्यासाठी त्यांना जणू मोकळे रान मिळत आहे.मुंबई- ‘कानून के हात लंबे होते है!. असे म्हटले जात असले तरी अनेक भागात पोलिसांचे हात गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचत नसल्याने चोरी, हाणामा-या आणि लुटमारी करण्यासाठी त्यांना जणू मोकळे रान मिळत आहे. मुंबईत पोलिस ठाण्यांच्या हद्दी निश्चित करून दिल्याने ज्यांच्या हद्दीत गुन्हा घडतो, तेच पोलिस ठाणे फिर्यादीची तक्रार नोंदवून घेतात. हद्दीमुळे मुंबई पोलिसांना काही सीमारेषा आखून दिल्याने दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीमधील भागांत लुटमारीचे प्रकार वाढल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पश्मि रेल्वेस्थानकातील माटुंगा रोड परिसराचा एक भाग सध्या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येतो. त्यामुळे माटुंगा रोड रेल्वेस्थानक ते संत विश्वेश्वरय्या उड्डाणपूल (टी. एच. कटारिया मार्ग) जोडणा-या पादचारी पुलावर प्रवाशांना स्थानिक रहिवाशांना हेरून लुटण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. पाच ते सात जणांची टोळी या भागात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.हा पादचारी पूल ज्या ठिकाणी उड्डाणपुलाला जोडला जातो त्याचा डावीकडील भाग माहीम पोलिस ठाण्याकडे तर उजवीकडील भाग शाहूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. टी. एच. कटारिया मार्गाचा डावीकडील भाग शिवाजी पार्क पोलिस ठाण्याकडे उजवीकडील भाग माहीम पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोडतो. पण हे पादचारी पूल माटुंगा स्थानक उड्डाणपुलांना जोडणारे असल्याने त्याचा काही भाग शिवाजी पार्क माहीम पोलिस ठाण्याच्या हद्दीत विभागला जातो.या
पादचारी पुलाचे खांब सेनापती बापट मार्गावरील पदपथावर असल्याने प्रत्यक्षात शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही जागा असल्याचे वरवर दिसून आले आहे. असे असले तरी शिवाजी पार्कच्या नोंदीवर हे ठिकाणच कुठे दिसून येत नाही. त्यामुळे या पादचारी पुलावर लूटमार करणा-या टोळीचे सध्या चांगलेच फावले असून, हद्दीमुळे पोलिसांचे हाततिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हा भाग रेल्वेच्या हद्दीत मोडत असून या पादचारी पुलावर लुटून ही टोळी पुन्हा रेल्वेच्या हद्दीत निघून जात असल्याचे शिवाजी पार्क पोलिसांचे म्हणणे आहे.पादचा-यांनो सावधान!माटुंगा येथील पादचारी पुलावरून जाणाऱ्या एकटय़ा-दुकटय़ा प्रवाशाला हेरून या टोळीतील एक जण त्याच्या पायात पाय अडकवतो. त्यानंतर पायावर पाय ठेवला म्हणून त्या व्यक्तीशी तो वाद घालतो. हे सर्व सुरू असताना त्याचे दोन साथीदार त्याच्या मदतीला येऊन ते देखील प्रवाशाजवळ हुज्जत घालण्यास सुरुवात करतात. त्याचवेळी आणखी दोघे तिघे साथीदार प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल खिशातील पैसे घेऊन ही टोळी पसार होतेस्त्रियांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य सहाव्या स्थानावर मुंबई - महाराष्ट्रात 2010 मध्ये महिलांवरील 15 हजार 737 अत्याचारांची नोंद करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक अत्याचारांची नोंद आंध्र प्रदेश येथे 27 हजार 244 करण्यात आली आहे. तर बालकांवरील अत्याचार राज्यात 3 हजार 264 नोंदविण्यात आले आहेत. बालकांवरील सर्वाधिक अत्याचार मध्यप्रदेश येथे 4 हजार 912 नोंदविण्यात आले आहेत.
राज्यातील महिला आणि बालकांवरील वाढते अत्याचार ही राज्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात "भारतातील राज्यांचे निवडक सामाजिक आर्थिक निर्देशक"मध्ये संबधित आकडेवारी सादर करण्यात आली आहे. बालकांच्या अत्याचारात महाराष्ट्र राज्य देशभरात दुसऱ्या स्थानावर आहे. केवळ विकासाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या महाराष्ट्रातील बालकांवरील अत्याचार हा प्रमुख सामाजिक प्रश्‍न ठरला आहे. झारखंड येथे 3 हजार 630, उत्तरप्रदेश येथे 2 हजार 332, बिहारमध्ये 1 हजार 843 अत्याचार नोंदविण्यात आले आहे.
बालकांवरील सर्वाधिक कमी अत्याचारांची 10 अत्याचारांची नोंद नागालॅंड येथे करण्यात आली आहे. या नोंदीनुसार आजच्या घडीला बिहार आणि उत्तरप्रदेशपेक्षा महाराष्ट्रात बालकांना अत्याचारांना जास्त प्रमाणात सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. अर्थात महाराष्ट्रात पोलिस ठाण्यात आलेला गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या मानाने चांगले असले तरी देशात बालकांवरील अत्याचारात तिसरे स्थान ही भूषणावह बाब निश्‍चित नाही.
स्त्रियांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य सहाव्या स्थानावर आहे. पश्‍चिम बंगालमध्ये 26 हजार 125, उत्तरप्रदेशात 20 हजार 169, राजस्थानात 18 हजार 182 , मध्यप्रदेशात 16 हजार 468 अत्याचारांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी बदनाम असलेल्या दिल्लीत केवळ 4 हजार 518 अत्याचारांची नोंद करण्यात आली आहे. असे असले तरी पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमूळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

No comments:

Post a Comment