Total Pageviews

Wednesday 7 March 2012

पोळी दान करा, होळी लहान करा अर्चना राणे

 
होळी लहान करा.. पोळी दान करा.. वृक्षतोड करू नका.. नैसर्गिक रंग वापरा.. फुगे मारू नका.. होळी जवळ आली की असे विविध संदेश पर्यावरणस्नेही देतात. मात्र आजही याकडे दुर्लक्ष करून होळीसाठी सर्रास वृक्षतोड केली जाते, रासायनिक रंग वापरले जातात. पर्यावरणाची ही हानी थांबवण्यासाठी काही पर्यावरणस्नेही संस्था उपक्रम राबवतात...
दिवसेंदिवस उग्र होत जाणा-या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपले सणही निसर्गास अनुरूप व्हावेत, यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. होळी व रंगपंचमी हे सणही त्याला अपवाद नाहीत. पर्यावरण दक्षता मंचची पर्यावरण शाळा, सृष्टिज्ञान, न्यास अशा पर्यावरणस्नेही संस्था दरवर्षी पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याकरता नैसर्गिक रंग तयार करण्याच्या कार्यशाळा घेतात, तसंच होळीसाठी वृक्षतोड करू नका, असे आवाहन करणारे उपक्रम राबवतात. गेल्या वर्षीपासून मात्र अशा उपक्रमांची संख्या कमी झालेली दिसते.
 याबाबत सृष्टिज्ञान संस्थेचे प्रसाद शिंदे यांनी सांगितले की, ‘यंदा केवळ 10 शाळांमधील विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे करायचे, याची माहिती दिली. एखाद्या शाळेने संपर्क साधला तर त्यांनाही तसे प्रशिक्षण देऊ. आपण नैसर्गिक रंग बनवण्यास विद्यार्थ्यांना सांगायचे आणि विद्यार्थी नैसर्गिक रंग घेऊन रासायनिक
रंगांचा वापर करणा-यांबरोबर खेळणार त्यांनाही तेच रंग वापरावेसे वाटणार. पर्यावरणस्नेही सणही संकल्पनाच अजूनही लोकांना पटलेली दिसत नाही.
 
पर्यावरण दक्षता मंचचा एक कार्यकर्ता म्हणाला, आपण आपल्यालाच बरं वाटावं, म्हणून लोकांमध्ये जनजागृतीचे प्रकार करतो की काय, हे कळत नाही. सण, उत्सव म्हटला की त्यात धांगडधिंगा असायलाच हवा, असा समज लोकांनी पूर्वापार करून घेतलेला आहे. त्यांना तो कायम ठेवायचा आहे, असंच वाटतं. प्रथमदर्शनी लोक आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व कळतंय, पटतंय असं दाखवतात. पण तशी कृती करताना दिसत नाहीत.
  • पर्यावरण शाळा
या संस्थेमार्फ कल्याण, डोंबिवली येथे नैसर्गिक रंग बनवण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. नैसर्गिक रंग वापरणं, स्वतंत्र होळी करणं टाळावं. विभागवार एकच होळी उभारावी. प्रतीकात्मक होळी करताना त्यात गुटख्याची पाकिटं, प्लॅस्टिक जाळू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
  • अंधश्रद्धा निर्मूलन समिती
  • पोळी दान करा, होळी लहान करा
  • होळीच्या अग्नीत पुरणपोळीचा नैवेद्य देऊ नका
  • त्याऐवजी घराघरातून पोळय़ा गोळा करून जवळपासच्या गरीब-कष्टकरी मजुरांना द्या.
  • होळीभोवती आयाबहिणींच्या, वडीलधा-यांच्या नावे बोंब मारण्याऐवजी एकतेची, समतेची राष्ट्रभक्तीची गाणी म्हणा.
  • शिक्षक-विद्यार्थी, नागरिकांनी श्रमदान करावे. आपला परिसर स्वच्छ करावा. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करावा. सुका कचरा होळीत जाळावा.
  • होळीत व्यसनांची, अपप्रवृत्तींची प्रतीकं जाळावीत. त्याबाबत संदेश द्यावा.
  • वृक्षतोड करू नये, सुकी लाकडे, पालापाचोळ्याचा वापर करावा.
  • पाना-फुलांपासून तयार केलेले रंग वापरावेत.
  • अवैध वृक्षतोड केल्यास शिक्षा : एक वर्षाची कैद व 2 हजार रुपये दंड
हरित सेनेचा पर्यावरणपूरक उपक्रम 
  • विद्यार्थ्यांच्या साहाय्याने शाळा परिसरात रॅलीचे आयोजन
  • परिसरातील मुलांना होळीसाठी वृक्षतोड न करण्याचं आवाहन करण्यात येते. त्यातून झाडांची हानी कशी होते, याबाबत माहिती दिली जाते.
  • होळी आयोजकांना फूल देऊन लाकडं न तोडण्याचं आवाहन केलं जातं.
  • रंगपंचमीत फुगे वापरू नका, असंही आवाहन केलं जातं.
  • फुगे वापरल्यामुळे होणा-या दुष्परिणामांबाबात जागोजागी जाऊन माहिती दिली जाते.
  • रासायनिक रंगांमुळे होणा-या त्वचाविकारांविषयी माहिती देण्यात येते.
 
पर्यावरणपूरक रंग कुठे मिळतील?
 
  • मंत्रालयाच्या आवारात 56 मार्च रोजी रंग उपलब्ध करण्यात येतील. संपर्क- पर्यावरण विभाग 22855082
  • सृष्टिज्ञान, परळ-भोईवाडा महापालिका शाळा, तिसरा मजला, खोली क्रमांक 81,
  • पर्यावरण दक्षता मंच, न्यू इंग्लिश स्कूल, राममारुती रोड, ठाणे (पश्चिम

No comments:

Post a Comment