एका
अमेरिकन नागरिकाचे मूल्य एक अब्ज डॉलर्स!
असे मानले जाते की, जागतिक बाजारात सर्वाधिक मूल्य अमेरिकन नागरिकाचे आहे. बाजारभावानुसार एक अमेरिकन हा एक अब्ज डॉलर्सचा मानला जातो. त्या तुलनेत हिंदुस्थानी नागरिकाचे मूल्य एक डॉलर देखील नाही! जगात कुठेही अमेरिकन नागरिकावर अत्याचार होत असतील तर अमेरिकन सरकार त्याच्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावते. आपल्या नागरिकाच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न करते. मग त्या अमेरिकन नागरिकाने कितीही मोठा गुन्हा केलेला असला तरी अमेरिकन सरकार त्याला वाचविण्यासाठी कसलीही कसर सोडत नाही. आपल्या नागरिकाला वाचविण्यासाठी अमेरिकन सरकार सरासरी शंभर कोटी डॉलर्स खर्च करते, असा अंदाज लावला जातो. त्या तुलनेत आपण आपल्या सरकारवर एक दृष्टिक्षेप टाकला तर शरम वाटते. हिंदुस्थानी सरकार आपल्या नागरिकाला वाचविण्यासाठी एक डॉलरही खर्च करीत नाही! जगात हिंदुस्थानी नागरिकाचे प्राण सर्वात स्वस्त आहेत! चीनमधील एका न्यायालयाबाहेर हिंदुस्थानी राजकीय मुत्सद्दी बालाचंद्रन यांना बेदम मारहाण करून अर्धमेले केले जाते. चीनकडून दिले जाणारे संरक्षण हा देखावा असल्याचे सिद्ध होते. इंग्लंडमध्ये अनुज बिडवे या हिंदुस्थानी विद्यार्थ्याला एक ब्रिटिश तरुण वेळ विचारतो. अनुज घड्याळाकडे पाहून वेळ सांगतो, परंतु अचानक तो ब्रिटिश तरुण अनुजवर गोळ्या झाडून त्याला खतम करतो आणि पळून जातो. इंग्लंडची प्रसिद्ध पोलीस यंत्रणा काहीही करत नाही. ऑस्ट्रेलियात तर नेहमीच हिंदुस्थानी युवकांना काही ना काही कारणावरून गोळी घालून खतम केले जाते. गोळ्या झाडणारा ऑस्ट्रेलियन धावता धावता अर्वाच्च शिवीगाळ करतो आणि ‘आमच्या येथून हिंदुस्थानींना हाकला’ असे ओरडतो. कॅनडात एका गॅसोजीन एजन्सीच्या शीख मालकाला केवळ तो हिंदुस्थानी आहे म्हणून मारले जाते...हा प्रकार केवळ या देशांपुरताच मर्यादित नाही. आम्हा हिंदुस्थानींचा मान-सन्मान आणि संरक्षणाच्या उपाययोजना कोणत्या देशात आहेत? मागील काही वर्षामध्ये कित्येक हिंदुस्थानींचे प्राण अशाप्रकारे घेण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वी गुलाम असलेल्या हिंदुस्थानात युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे देश हिंदुस्थानींचा ‘काळे हिंदुस्थानी’ म्हणून वाटेल तसा अपमान करत होते. स्वातंत्र्यानंतर तरी यात काय फरक पडला, असे आमच्या सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियात आतापर्यंत चार हजार हिंदुस्थानी या अन्यायाचे बळी ठरले आहेत. युगांडाच्या इदी अमीनने हिंदुस्थानींना अक्षरश: विवस्त्रावस्थेत हाकलले. आम्ही त्याचे काय केले? खाडी देशांमध्ये हिंदुस्थानींना कशी वागणूक दिली जाते हे ज्याच्यावर प्रसंग गुजरला तोच सांगू शकतो.प्रश्न हा आहे की, परदेशात हिंदुस्थानींच्या संरक्षणाची व्यवस्था का होत नाही? प्रत्येक सरकार एकतर घृणेने आणि बेपर्वाईने हिंदुस्थानींच्या समस्यांबाबत उदासीन असते. आमच्या मनात हा प्रश्न वारंवार उठतो की, हिंदुस्थान २१ व्या शतकात पदार्पण करून महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, तर मग आम्हाला मान-सन्मान का नाही? एखाद्या साधारण शेठजीला लोक झुकून नमस्कार करतात, येथे तर सुपर पॉवर असूनही हिंदुस्थानी नागरिकाला लाथाबुक्क्या खाव्या लागतात. हिंदुस्थानींच्या या अवहेलनेस कोण जबाबदार आहे? खुद्द नागरिक की हिंदुस्थानी सरकार? आमचा शेअर बाजार रोज उसळतो. सोने-चांदी नव्या शिखरावर पोहोचतात आणि मनमोहन सिंगांचे सरकार उदारीकरणाच्या नावावर प्रत्येक क्षेत्राचे दरवाजे उघडते. एकदा हे दरवाजे उघडल्यानंतर पुन्हा बंद होत नाहीत. तरीही करोडपती हिंदुस्थानींची कुणी इज्जत ठेवत नाही? खाडी देश असतील किंवा अफगाणिस्तान किंवा इराक असेल, या देशांमध्ये अमेरिकेचा एक सैनिक मारला गेला तर अमेरिका त्यांच्या दोनशे ते अडीचशे लोकांना खतम करण्यास मागे पुढे पाहत नाही. ११/९ मध्ये लादेनने अमेरिकेवर हल्ला केला. अमेरिका आक्रोश करत बसली नाही. आपल्या शत्रूला घेरून आपल्या जमिनीवर जिवंत किंवा मृत कसे पकडावे याच्या योजना आखल्या. शेवटी अमेरिकेने शत्रूला उद्ध्वस्त केलेच! आमच्याकडे १९९२ पासून आजपर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये किती हिंदुस्थानी प्राणास मुकले याची गणती करणेही कठीण आहे. त्या निर्दोष हिंदुस्थानी लोकांच्या प्राणांची सरकारने किंचितही पर्वा केली नाही. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानींचे गळे कापणारे नराधम जगात उजळ माथ्याने फिरत आहेत आणि कसाबसारखे अतिरेकी रोज आठवण देत आहेत की, ‘तुम्ही आतापर्यंत माझे काय बिघडवले? मला फाशी दिली तरी विजय आमचाच झाला आहे. कारण अतिरेक्यांच्या काळ्या कारवायांमुळे जे असंख्य हिंदुस्थानी शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांचे आत्मे तळमळत आहेत.’अनिवासी हिंदुस्थानी आम्हा लोकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. २००९ मध्ये अनिवासी हिंदुस्थानींनी ५० अब्ज डॉलर्स हिंदुस्थानात पाठवले होते. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या अहवालानुसार परदेशात राहणार्या नागरिकांनी आपल्या देशांमध्ये जो पैसा पाठवला तो एकूण १६२.५ अब्ज डॉलर्स एवढा होता. त्यात ३९ टक्के हिंदुस्थानी आणि चिनी लोकांचा पैसा होता. सध्या मंदी असल्याने त्यात थोडी कमतरता आली असेल. परंतु या कमावत्या सुपुत्रांशी आमचे सरकार कसा व्यवहार करते ते उपरोक्त वर्णनावरून स्पष्ट होते.जगात हिंदुस्थानी कुठे कुठे वसले आहेत यावरही एक नजर टाकणे आपल्यासाठी आवश्यक आहे. जगातील ७२ देशांमध्ये राहात असलेल्या काही हिंदुस्थानींची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.४० लक्ष हिंदुस्थानी नेपाळमध्ये राहतात. २७ लाख ६५ हजार ८१५ अमेरिकेत, २४ लाख मलेशियात, २० लाख म्यानमारमध्ये, १५ लाख सौदी अरबमध्ये, १४ लाख संयुक्त अरब अमीरात म्हणजे खाडी देशांमध्ये, १३ लाख १६ हजार इंग्लंडमध्ये, ११ लाख ६० हजार दक्षिण आफ्रिकेत, १० लाख ६३ हजार १५० कॅनडात, ८ लाख ५५ हजार मॉरिशसमध्ये, ५ लाख ८० हजार कुवैतमध्ये, ५ लाख २५ हजार त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये, ४ लाख ५० हजार ओमानमध्ये, ४ लाख ५० हजार ऑस्ट्रेलियात, ४ लाख सिंगापूरमध्ये, ३ लाख ४० हजार फिजीमध्ये, ३ लाख ३० हजार फ्रान्समध्ये, ३ लाख २७ हजार गयानात, ३ लाख १० हजार बहारीनमध्ये, १ लाख ३५ हजार सुरिनाममध्ये, १ लाख २५ हजार कतारमध्ये, १ लाख १० हजार हॉलंडमध्ये, १ लाख ५ हजार न्यूझिलंडमध्ये, १ लाख केनियात, ९० हजार टांझानियात, ९० हजार युगांडात, ९० हजार जमैकात, ७१ हजार ५०० इटलीत आणि ६५ हजार हिंदुस्थानी थायलंडमध्ये राहतात. जगात सर्वत्र पसरलेल्या या हिंदुस्थानचे मूल्य किती असायला हवे, हे आमचे आकडेशास्त्रज्ञ मनमोहन सिंग आणि यूपीए सरकार निश्चित करील काय

No comments:
Post a Comment