Total Pageviews

Tuesday, 6 March 2012

नक्षलीं कारवाया मुंबई, पुणे, नाशिक शहराकडॆ
डोंबिवली येथे ०३/०३/२०१२ ला दहशतवादविरोधी पथकाने पकडलेले चौघे संशयित हे खरोखरच नक्षलवादी चळवळीतील दहशतवादी असतील तर धोक्याची घंटा घणघणते आहे. देशाच्या सहा-सात राज्यांमध्ये या सशस्त्र माओवाद्यांनी चांगला जम बसविला असून महाराष्ट्राचा विदर्भही त्यातून सुटलेला नाही. मात्र या नक्षलवाद्यांना आजवर तरी मोठ्या नक्षलवादी धुमाकूळ शहरात घालता आलेला नाही. हीच स्थिती भविष्यात राहील का, असा गंभीर प्रश्न् विचारणारी ही अटक आहे. नक्षलवाद्यांमधील 'कोचीर् दलम्' ही टोळी तंत्रकुशल आहे. ती हिंस्त्र कारवायांसाठी शस्त्रे इतर सामग्री पुरविते. डोंबिवलीच्या गांधीनगरात सापडलेल्या लोखंडी नळ्या, अॅल्युमिनियम पट्ट्या हे गावठी पिस्तुलांचे सुटे भाग असू शकतात. याशिवाय, सापडलेले २३ लाख रुपये म्हणजे या भागात कामाचे जाळे विणण्यासाठी आलेले 'भांडवल' आहे. डोंबिवली परिसरातीलती बातमी खरी आहे का, हे विचारण्यासाठी वर्तमान पत्राकडे दूरध्वनी केले. नक्षलवादी हे गडचिरोलीत राहतात ना, मग ते डोंबिवलीत कसे आले?’ या अनेकांच्या भाबडय़ा प्रश्नावरून एकंदर समाजाची मानसिकता लक्षात येते
नक्षलीं कारवाया पुणे शहरातनक्षलवाद्यांनी पुणे परिसरातील दोन तरुणांना गडचिरोलीतील नक्षलवादी भागात प्रशिक्षणासाठी पाठवल्याची धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे. या तरुणांचे ब्रेन वॉशिंग करण्यात आले असून प्रशिक्षणानंतर त्यांना 'दलम'मध्ये सामील करण्यात येणार आहे. अनेक वर्षापासून फरारी असलेली अँजेला सोनटक्केला 'एटीस'ने पिरंगुटमधून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अटक केली होती. तिच्या अटकेनतंर नक्षलवाद्यांची पुण्यातील पाळेमुळे खणून काढण्यात 'एटीएस'ला यश आले . नक्षलवादी कारवाई करण्यासाठी परस्परांना पाठविलेली पत्रे तसेच चार लाख रुपये आरोपींकडून जप्त केले . या आरोपींच्या ताब्यातून दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्यामधे माहिती होती. पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटांत आरोपी असलेल्या आणि रांजणगाव 'एमआयडीसी' परिसरातील एका कंपनीत नोकरी करत असलेल्या दहा संशयित माओवाद्यांना 'एटीएस'ने अटक केली हे आरोपी पश्चिम बंगाल पोलिसांच्या हवाली केले गेले.पश्‍चिम बंगालमध्ये घातपाती कारवायांत भाग घेतल्यानंतर पुण्यात आश्रयाला आलेल्या सिद्धू कानू दलमच्या दहा नक्षलवाद्यांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात शिरूर येथून अटक केली. मजुरांच्या बरोबर आलेले हे नक्षलवादी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ पुण्यात वास्तव्य करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, सात जिवंत काडतुसे आणि माओवादी विचारसरणीचे साहित्य जप्त करण्यात आले.आरोपींपैकी रॉबी हन्सदा हा पीपल्स गोरिला लिबरेशन आर्मी (पीजीएलए) या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य आहे. पुण्यात झालेल्या या अटकेच्या कारवायांमुळे नक्षलवादी दहशतवाद्यांच्या स्लिपर सेलचे जाळे पुण्यात पसरत असल्याची गंभीर बाब पुढे येत आहे. एटीएस'ने माओवाद्यांचा म्होरक्‍या मिलिंद तेलतुंबडे याला पण अटक केली. नक्षलवादी चळवळचे दहशती संघटनांशी संधान आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा शाप भोगणा-या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांत वर्गसंघर्षाचा नारा देत नक्षलवादी चळवळ रुजली आणि फोफावली. आपल्या हिंसक चळवळीला साम्यवादी विचारांचे तात्त्विक अधिष्ठान देणा-या नक्षलवाद्यांनी शेजारील नेपाळमध्ये कशा पद्धतीने सत्ता काबीज केली हे सर्वश्रुत आहे. आपल्याकडील माओवादी नक्षलींचे तेच उद्दिष्ट आहे.काही महि न्या पूवीर् नक्षलवादी चळवळ इतर दहशती संघटनांशी संधान साधत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.नक्षलवादी हे 'सामाजिक न्याया'साठी लढत असल्याने त्यांचा दहशतवाद हा 'लोकहिताचा' असल्याचा दावा हे बुद्धिमंत करतात. पण नक्षलवाद्यांना सगळी व्यवस्थाच उलथवून फेकून द्यायची आहे. त्यांच्या लढ्याचे प्रतीक असणारी विषमता, अन्याय, अत्याचार हा या समस्येचा दुसरा गंभीर पैलू आहे. तो मात्र सरकार, नोकरशाही, राजकीय कार्यकतेर्, पोलिस उद्योजक यांनी स्वत:चे वागणे तातडीने सुधारल्याशिवाय पुसला जाणारा नाही. समाजात जो जो मागे आहे, त्याच्या उन्नतीसाठी सर्वांनी झटायलाच हवे. सतत सनदशीर संघर्ष करायला हवा. हे शहाणपण येणार नसेल तर शहरांमध्ये नक्षली अड्डे फोफावण्याचा दिवस फार दूर नाही. नक्षलींचा हिंसाचार दहशतवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू महाराष्ट्रातील नक्षलींच्या कारवाया फक्त चंद्रपूर, गडचिरोली किंवा फार तर विदर्भापुरत्या मर्यादित आहेत अशा भ्रमात या पुढे राहण्याचे कारण नाही. आता त्यांनी आपले पाय मुंबई, पुणे, नाशिक पर्यंत पसरले असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचाच अहवाल सांगतो. नक्षलग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्रातील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे गृहमंत्रालयाने नमूद करणे हे महाराष्ट्र प्रशासनाला "हाय अलर्ट' देण्यासारखे आहे.धोका लक्षात घेऊन ही कीड नष्ट केली पाहिजे. महाराष्ट्र शासनापुढे हे मोठे आव्हान ठरेल. नक्षलींचा हिंसाचार असो वा फुटीरतावाद्यांचा दहशतवाद हे सारे बंदुकीच्या बळावर विश्वास ठेवणाऱ्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यात डावे, उजवे करुन जनतेचे लक्ष विचलित केले जावू नये. हा हिंसाचार तेवढ्याच प्रभावीपणे मोडून काढला पाहिजे आणि ही विद्यमान सरकारचीच जबाबदारी आहे. एकही दिवस जात नाही की, भारतात नक्षलवादी कुठे तरी, काही तरी घातपाती कारवाया करतातच. भारतातील 40 टक्के भूभाग आणि 35 टक्के लोकसंख्या ही नक्षलवादी चळवळीच्या विळख्यात आलेली आहे. जेव्हा मुंबई, पुणे किंवा नागपूर या शहरी भागातून नक्षलवादी चळवळीशी संबंधित लोक अटक होणे याचा अर्थ आपला शहरी भागही नक्षली लोकांनी व्यापायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील एकंदरच कायदा सुव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहता, नक्षलवाद्यांना राज्यात मोकळे रान मिळाले आहे. २०११-१२ मध्ये नक्षलवादी हिंसाचारात घट होण्याऐवजी वाढच झालेली आहे. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी राज्य शासनाने जी नक्षलवादविरोधी यंत्रणा उभारली आहे, त्यातील वरिष्ठांपासून कनिष्ठ स्तरावरील पोलिस अधिका-यांपर्यंत कोणामध्येच नक्षलवाद्यांशी लढण्याची इच्छा नाही. प्रत्येक जण आपली बदली कशी होईल याच प्रयत्नात दिसतात. आपल्याकडे जे नक्षलवादी अटक केले जातात, यामागे आंध्र प्रदेशातील पोलिस दलाचा सिंहाचा वाटा असतो. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमेवर समन्वय ठेवण्यातही त्यांना अपयश आले आहे. MOB 09096701253,

No comments:

Post a Comment