Total Pageviews

Saturday, 3 March 2012

दुर्दैवी मुलींना दारिद्य्रामुळे, प्रलोभनाने ङ्गसवून देहविक्रयाच्या व्यवसायाकडे सामाजिक समरसतेची तीन वेगवेगळी रूपे अहमदनगर (03-March-2012) देशदूतआपल्या देशात राजकारणाला इतके एकांगी महत्त्व दिले जाते की देशात सदैव सर्वत्र ङ्गक्त राजकारणच घडत आहे, असा कुणाचाही गैरसमज व्हावा. सत्ताधार्‍यांसहित सर्व पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना विकासापेक्षा गटबाजीच्या, कुरघोडीच्या सत्तेच्या राजकारणात अधिक रस असतो. वृत्तपत्रांनाही ङ्गक्त राजकीय नेत्यांची वक्तव्ये, हालचाली, भेटीगाठी यातच तेवढ्या बातम्या दिसतात. एवढेच कशाला, कुटिल राजकारण थोडेही समजणार्‍या सर्वसामान्य माणसाला अज्ञ असूनही तज्ञांच्या आवेशात बोलायला नको तेवढे आवडते. अशा तर्‍हेने समाजाचा ङ्गार मोठा भाग राजकारणग्रस्त झाला आहे. परिणामी, निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये जे सकारात्मक विधायक घडत असते त्याच्याकडे बर्‍याच वेळा दुर्लक्ष होते नि समजा चुकून लक्ष गेले वा वेधले गेले तरी त्यास ठळकपणे ङ्गारसे महत्त्व दिले जात नाही. टिळक-आगरकर यांच्या काळापासूनच सामाजिक समस्यांना कधीही गंभीरतापूर्वक पुरेसे महत्त्व दिले गेले नाही. स्वातंत्र्योत्तर भारताविषयी हे अधिक खरे आहे. सामाजिक सुधारणा हा केवळ ङ्गॅशनवजा बोलघेवडेपणाचा नव्हे तर ठोस आचरणाचा कृतीचा विषय असून ही मानसिकता कशी निर्माण होत वाढीस लागेल? ‘टाईम्स ऑङ्ग इंडिया या इंग्रजी दैनिकात गेल्या १८, २० २२ ङ्गेब्रुवारी रोजी तीन सामाजिक बातम्या प्रसिद्ध झाल्या. या तीन बातम्या म्हणजे सामाजिक समतेच्या लढाईतील चांगले, सलणारे कलंकित अशी तीन रूपे आहेत. दुर्दैवी मुलींना दारिद्य्रामुळे, प्रलोभनाने ङ्गसवून देहविक्रयाच्या व्यवसायाकडे वळविले जाते. डॉनच्या गुहेत शिरलेल्या वाट चुकलेल्या मुलांसाठी त्यातून बाहेर पडण्याचा, सुधारण्याचा मार्ग कायमचा बंद असतो. त्यांच्या आयुष्याचे मातेरे पोतेरे होते. आपल्या देशात अजूनही निरनिराळ्या राज्यांच्या काही खेड्यांमध्ये विशिष्ट जातीच्या लोकांच्या मुलींना पारंपरिकरीत्या वेश्या व्यवसायात ढकलले जाते. दुर्दैवाची परिसीमा म्हणजे या जातीच्या मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे आई, वडील, भाऊ हेच रौरवाचे, नरकाचे जीवन जगायला भाग पाडतात. या संपणार्‍या नरकातून गुजरात राज्यातील पालनपूरपासून जवळच वाडिया नावाच्या खेड्यातील १५ कुस्करलेल्या कोवळ्या मुलींच्या जीवनात येत्या ११ मार्च रोजी खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उजाडणार आहे. या दिवशी या मुलींचा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सामाजिक क्रांतीचे तांबडे ङ्गुटत आहे. ‘वेश्यांचे गांव या कलंकित नावाने ओळखल्या जाणार्‍या खेड्यात ही अभूतपूर्व, ऐतिहासिक क्रांतिकारक घटना घडणार आहे. हा बदल सहजासहजी घडून आलेला नाही. पूर्वी राज्य सरकारने स्वयंसेवी संघटनेने या मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले होते. पण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे हे प्रयत्न अयशस्वी झाले होते. मगविचार्ती जाती समुदाय संमेलन मंच या संस्थेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तीन वर्षांपूर्वी या चुकीच्या मार्गावर नेऊन ठेवलेल्या मुलींशी संपर्क संवाद साधण्यास सुरुवात केली. या मुलींना वेश्या व्यवसायात बरबाद करण्याऐवजी, त्यांचा विवाह करून त्यांना आत्मसन्मानाचे, इज्जतीचे सुखी संसारयुक्त जीवन जगता येईल याबाबत या मुलींच्या कुटुंबीयांची मंचच्या नेत्यांनी खात्री पटवली. आज या खेड्यात ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण आहे. या देह विक्रय व्यवसायामधील दलाल तेवढे दु:खी संतापी झाले आहेत. त्यांनी मंचच्या नेत्यांना शिवीगाळ करीत धमकावले आहे. सामूहिक विवाहास सज्ज झालेल्या मुलींच्या स्थानिक पालक मंचच्या नेत्या शारदा भाटी यांनी या संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या खेड्यात सुमारे १०० मुली वेश्या व्यवसायात आहेत. ‘मंचच्या नेत्यांनी या जमातीच्या मुलांना समजावून १५ मुलींचा जीवनसाथी निश्‍चित केला आहे. ११ मार्चला त्यांचे नवे वैवाहिक जीवन शांततेने सुरू होवो. त्या खेड्यातील देशातील अशा हजारो दुर्दैवी मुलींच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट कधी उगवेल? त्यासाठी देशवासीय कधी प्रयत्न करणार? अलिगड मुस्लिम विद्यापीठा महाविद्यालयातील मुलींना विद्यापीठाच्यासेंट्रल लायब्ररी अद्याप दिला नाही.दुसरी बातमी भेदक सामाजिक पक्षपाताचा सल, शल्य दाखविणारी, बोचणारी आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील मुलींना विद्यापीठाच्यासेंट्रल लायब्ररी अद्याप प्रवेश दिला जात नाही. या अन्यायाविरुद्ध लढा देणार्‍या मुस्लिम विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिबल यांना निवेदन देऊन हा पक्षपात थांबविण्याची आशियातील एक सर्वोत्कृष्ट अशा विद्यापीठातील मौलाना आझाद लायब्ररीतील पुस्तकांचा वापर करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. मार्क्सवादी नेत्या वृंदा करात यांनीही हा प्रश्‍न सिबल यांच्या खात्याकडे नेला आहे. सिबल यांच्याकडून पत्र आल्यावर विद्यापीठाच्या कारभार्‍यांनी पक्षपाती प्रघात बंद करण्याऐवजी थोडी सवलत देण्याच्या रूपाने सामाजिक समतेच्या मागणीवर मीठ चोळण्याचा नतद्रष्टपणा केला आहे. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुलींना विद्यापीठाच्या सेंट्रल लायब्ररीतील पुस्तकांच्या कॅटलॉगशी ऑनलाईनने संपर्क साधता येईल. मुलींनी त्यामधून पुस्तकांची निवड करावी ती पुस्तके त्यांना आणून दिली जातील. म्हणजे ग्रंथालयात त्यांना थेट प्रवेश नाहीच का? मुली आहेत म्हणून ! पक्षपाताच्या आरोपाचे तद्दन खोटे खंडन करतांना विद्यापीठाने केलेली मखलाशी मुळीच पटणारी नाही. पदव्युत्तर मुलींना या ग्रंथालयात जाण्यास मुभा आहे, असे खुलाशात म्हटले आहे. असे जर आहे तर पदवी शिक्षण घेत असलेल्या मुलींना या ग्रंथालयात प्रवेश का असू नये? ‘या ग्रंथालयात ङ्गार गर्दी होऊ नये या अस्तित्वात असलेल्या नियमाकडेही विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी बोट दाखविले आहे. पण तेही पटणारे नाही. फक्त या मुली आल्याने या लायब्ररीतफार गर्दी होणार आहे काय? या धादांत पक्षपात अन्यायाविरुध्द लढणार्‍या प्राध्यापक विद्यार्थिनीच्या लढ्याला देशातील महिला संघटना, विद्यार्थी संघटना सामाजिक संघटना कधी पाठिंबा देणार? बोलघेवेडा पुरोगामी पक्ष कार्य करणार? सामाजिक समतेची ही लढाई जिंकलीच पाहिजे
. तिसरी बातमी ही आजही हरयाणात अस्पृश्यता किती हिंसक पध्दतीने पाळली जाते यावर झगझगीत प्रकाशझोत टाकणारी आहे. हरयाणातील सानियाना नावाच्या खेड्यातील राजेशकुमार नावाचा ३१ वर्षाचा दलित युवक हा इतर १४ लोकांसह ट्रॅक्टर टॉलीवरुन दौलतपूरला चालला होता. त्याला तहान लागली. त्याला एका शेतात मातीची घागर दिसली. त्या घागरीतील पाणी तो प्याला. हे पाहून राजेंदर नावाच्या शेतकर्‍याने राजेशकुमारला शिवीगाळ केली. तसेच हेटाळणी केली. एवढेच नव्हे तर, राजेंदरने धारदार शस्त्राने राजेशकुमारवर हल्ला केला. हल्लेखोर शेतकर्‍यास अटक झाली आहे. पण केवळ सवर्णाच्या मातीच्या घागरीतील पाणी प्याल्याबद्दल दलित युवकावर हल्ला करावा काय? बधीर समाज मन कसे बदलणार ? (प्रस्तुत स्तंभलेखक हे दै. ‘देशदूतच्या खान्देश आवृत्तीचे माजी संपादक आहेत

No comments:

Post a Comment