Total Pageviews

Friday, 10 February 2012

looting mumbai samana editorial

कोंबडी
जनतेच्या पैशाची उधळपट्टी ऐक्य समूह राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी आपल्या राजवटीत जनतेच्या पैशाची प्रचंड उधळपट्टी केल्याचे आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केले होते. वसुंधराराजेंनी सरकारसाठी विकत घेतलेले नवे हेलिकॉप्टर, पाहुण्यांच्या सरबराईसाठी खर्च केलेला कोट्यवधी रुपयांच्या निधीचा पंचनामा गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला होता. पण मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांनी सरकारी पैशाच्या उधळपट्टीत, अवघ्या तीन वर्षातच वसुंधराराजेंना मागे टाकले आहे. आपले सरकार हे जनसामान्यांच्या कल्याणासाठीच वचनबध्द असल्याची भाषणबाजी करणाऱ्या गेहलोट यांनी, अवघ्या तीन वर्षात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला आणि निवासस्थानी भेटायसाठी येणाऱ्यांचा पाहुणचार करायसाठी पाच कोटी रुपयांची उधळण केल्याचे निष्पन्न झाले. राजधानी जयपूरमध्ये परदेशी आणि देशातील विविध स्तरातील लोक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येतात. त्यांना चहा-पाणी, जेवणखाण आणि भेट वस्तूही सरकारी खर्चानेच दिल्या जातात. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना अल्पोपहार आणि भोजन पुरवण्याचा ठेका घेतलेल्या कंत्राटदाराला नियमितपणे बिलांची रक्कमही सरकारकडून मिळते. पण यासाठी सरकारने जाहीर निविदा मात्र काढलेली नव्हती. परदेशी पाहुण्यांना जयपूर दाखवण्यासाठी मोटारी, पंचतारांकित हॉटेल्स, महागडे भोजन या सुविधा सरकारमार्फतच दिल्या जातात. याशिवाय महात्मा गांधीजींच्या विचारांची डायरीही भेट दिली जाते. आतापर्यंत या भेट डायरीवर गेहलोट यांनी बारा लाख रुपये खर्च केले आहेत. वसुंधराराजे शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पाच वर्षाच्या काळात पाहुणचारावरचा हा खर्च तीन कोटी रुपये होता. त्या पाहुण्यांना चॉकलेट, कॉफी आणि अल्पोपहारही देत असत. भेट वस्तूही दिल्या जात. त्या सरकारी पैशाची विनाकारण उधळपट्टी करीत असल्याची टीका गेहलोट यांनी जाहीरपणे केली होती. पण आता मात्र त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत या खर्चावर काहीही नियंत्रण ठेवलेले नाही. राजस्थानच्या वाळवंटी भागात लोकांना प्यायला पाणी नाही, रस्ते नाहीत, ग्रामीण भागातले रस्ते उखडलेले आहेत. काही जिल्ह्यात सरकारी मालकीच्या इमारतींची डागडुजी आणि दुरुस्ती करण्यासाठीही निधी मिळत नाही. प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था अधिकच होत आहे. गेहलोट लोककल्याणाची भाषा करतात. पण गरीबांच्या योजनांसाठी ते निधी उपलब्ध नसल्याची सबब सांगतात आणि त्याचवेळी कोट्यवधी रुपये पाहुणचारावर खर्च करतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. हे सरकार गरीबांचे आहे की श्रीमंतांचे? याचा निर्णय जनताच घेईल.
आणि तंगडी!सामना
शरद पवार यांनी वांद्य्राच्या फसलेल्या सभेत सांगितले की, ‘शिवसेना-भाजप युतीने मुंबईचा चेहरा भेसूर केला आहे.’ शरदबाबू यांना कधी काय दिसेल कसे दिसेल ते सांगता येत नाही. कावीळ झालेल्यांना सगळे पिवळेच दिसते असे म्हणतात. ‘मन चंगा तो कठौती में गंगा असे आपल्या संत सज्जनांनी म्हटले आहे. याचा अर्थ तुमचे मन साफ असेल तर तुमच्या भांड्यात साक्षात गंगा अवतरेल. मात्र मनच साफ नसेल तर भांड्यामध्ये गटारगंगाच येणार! रस्त्यावरची घाण साफ होऊ शकते पण तुमच्या मनातली घाण कशी साफ करणार? ही मनातली घाण मग ओठांतून बाहेर पडते. तसेच सध्या पृथ्वीराज चव्हाणांचे शरद पवारांचे झाले आहे. कालपर्यंत ते तंगडीत तंगडी घालून एकमेकांना पाडत होते. मात्र वांद्य्राच्या सभेत ते मांडीस मांडी लावून बसले. या निर्लज्जपणास काय म्हणावे! ते एकत्र आले याचे कारण देताना दोघांनीही धर्मांध जातीय पक्षांना पराभूत करण्यासाठी ही आघाडी असल्याचे जाहीर केले. मुंबईचा चेहरा भेसूर झाल्याची भाषा केली त्याचबरोबर महापालिकेतील ४० हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ही कोंबडी आणि अंडे आपल्याकडेच राहावे यासाठी युतीचे नेते मुंबईतच राहिल्याचे विधान शरद पवारांनी केले. हीसुद्धा त्यांच्या मनातली घाण आहे. शरदबाबूंनी जग पाहिले आहे. अधूनमधून ते परदेशात जातच असतात. तिथे जाऊन ते काय करतात, काय पाहतात कोणती दिव्य दृष्टी घेऊन मायदेशात परततात हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण त्यांनी जग पाहिले असले तरी सभोवतालच्या कोंबड्या तंगड्या त्यांना दिसत नाहीत. कृपाशंकर नावाची भ्रष्ट
चरणारी कोंबडी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसली होती त्यांच्याच बाजूला तुमच्याच आर.आर. पाटलांनी पदवी दिलेलेदफा ३०२ वाले नारोबा राणे होते. कृपाशंकर यांनी मधू कोडाबरोबर झारखंड लुटले. त्या लुटीतल्या पैशांत तुमचीही तंगडी फसली आहे काय? हा प्रश्‍न आम्हीही शरदबाबूंना नाही म्हटले तरी विचारू शकतो. मुंबईतल्या बिल्डरशाहीत कोणाचा काळा पैसा लागला आहे त्यांचे कर्तेकरविते कोण आहेत यावर शरदबाबूंनी सत्यप्रकाश टाकला असता तर त्या प्रकाशात त्यांना स्वत:चा तर चेहरा दिसला असताच, पण त्यासोबत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच भेसूर चेहराही त्यांच्या नजरेस पडला असता. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे की दुभती गाय आहे ते आम्हाला माहीत नाही. अशा कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म हे पवार कुटुंबीयांच्याच मालकीचे असल्याने शरद पवारांना आता कोंबड्या अंडी दिसत आहेत. आमच्या कुटुंबातील कोणी चाळीस हजार कोटींचा वायफळ आरोप केला म्हणून त्या आरोपाचे गजकर्ण पवार हे स्वत:च्या काखेत खाजवत बसले आहेत. चाळीस हजार कोटी वगैरे मोठ्या आकड्यांचे घोटाळे करण्याची सवय कॉंग्रेस राष्ट्रवादीला. आमच्यासाठी मुंबई ही कोंबडी किंवा तंगडी नसून मराठी माणसांच्या बलिदानातून त्यागातून निर्माण झालेली महाराष्ट्राची राजधानी मराठी स्वाभिमान आहे. त्या मुंबईचा लचका तोडू पाहणारे मुंबईवर भ्रष्टाचाराची टांग वर करू पाहणारे कृपाशंकर हे तंगडी टाकून शरद पवारांच्या मांडीवर बसले होते यातच सर्व काही आले. शिवसेना-भाजपवरील आरोपांची चौकशी करण्याआधी कृपाशंकरांवरील आरोपांची गुन्ह्यांची चौकशी करण्याची हिंमत दाखवा. तिकडे तुमच्या तंगड्यांतील शेपूट आत घालता शिवसेनेच्या बाबतीत फुशारकी मारता? सध्या केंद्रात घोटाळेच घोटाळे
सुरू आहेत. त्यातल्या बर्‍याचशा घोटाळ्यांना सुब्रमण्यम स्वामी यांनी तोंड फोडले. मग तुमच्याच सरकारातील घोटाळ्यांची चौकशी करा असे तुम्ही कधीतरी बोललात का? त्याटूजी स्पेक्ट्रममध्ये कोणाचे हात किती बरबटलेत हे काय लोकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. दिल्लीत महाराष्ट्रातही भ्रष्टाचाराच्याच कोंबड्या फडफडत आहेत तिथे तुमचे राज्य आहे. राज्य सहकारी बँकेतला भ्रष्टाचार राष्ट्रवादीचा आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावर हल्ला केला. या कोंबड्या सोन्याची अंडी देत नाहीत तर मग काय शेणा-मेणाची अंडी देतात? ही अंडी उबवून तुम्ही त्यातूनही भ्रष्टाचारच जन्माला घालता ना? या उबवलेल्या अंड्यांतून ना विकासाची कामे होतात ना राज्याचे हित साधले जाते. पैसा सत्ता हेच कॉंग्रेसचे धोरण. पैसा ही कोंबडी तर सत्ता हे अंडे. त्यामुळे कोंबडी आधी की अंडे आधी या चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची तशी गरज नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्याखा खा वृत्तीमुळे मुंबईच्या वाट्याला कोंबडी अंडी सोडाच, पण सुकलेली तंगडीही येत नाही. कोंबडी आयपीएल क्रिकेटमध्ये नाचणार्‍यांची उघडी तंगडी ही संपूर्ण कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी आहे. अर्थात, काहीही झाले तरी आम्ही त्यांना मुंबईचा घास गिळू देणार नाही. कृपाशंकरच्या झारखंडी तंगडीवरून शरदबाबूंनी खुशाल प्रेमळ हात फिरवावा कोणत्या भेसूर चेहर्‍यास ते मुंबई आंदण द्यायला निघाले आहेत याचा विचार करावा. मुंबईच्या मुळावर येऊन मराठी माणसाला समूळ नष्ट करण्याची सुपारी आपण घेतलीच असेल तर हीसुपारी तुम्हाला गरम पडेल हा इशारा आम्ही आजच देत आहोत

No comments:

Post a Comment