चला सैन्यात...22 Feb 2012, शॉर्ट सर्व्हिस कमिशन शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल) पुरुष व शॉर्ट सव्हिर्स कमिशन (टेक्निकल) महिला भरती योजना : ३९वे शॉर्ट सव्हिर्स कमिशन (पुरुष): ५० जागा शैक्षणिक पात्रता : यासाठी इंजिनीअरिंग पदवीधर आणि जागांची संख्या पुढे दिलेली आहे. सिव्हिल-११, इलेक्ट्रिकल-६, मेकॅनिकल-७, ऑटोमोबाइल-१, प्रोडक्शन/आकिर्टेक्चर-१ जागा, इलेक्ट्रॉनिक्स-४, कम्युनिकेशन-६, कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी-२, कम्प्युटर सायन्स-२ जागा. १०वे शॉर्ट सव्हिर्स कमिशन (महिला) : ३४ जागा सिव्हिल-४, इलेक्ट्रिकल-४, मेकॅनिकल-७, इन्फोमेर्शन टेक्नोलॉजी-१, प्रोडक्शन-१, इलेक्ट्रॉनिक्स-८, कम्युनिकेशन-६, हाउस बिल्डिंग टेक्नोलॉजी/आकिर्टेक्चर-१, कम्प्युटर सायन्स-२ जागा. संरक्षणदलातील शहीद सैनिकांच्या पत्नी : २ जागा शॉर्ट सव्हिर्स कमिशनमधील नॉन टेक्निकल पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र असतात. तर, टेक्निकल पदासाठी इंजिनीअरिंग पदवीधर पात्र असतात. निवडप्रक्रिया - पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना निवडण्यात येतं. यानंतर दोन टप्प्यातील मानसशास्त्रीय कलचाचणीद्वारे उमेदवारांती अंतिम निवड करण्यात येते. यातील यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते. प्रशिक्षण : निवड झालेल्या उमेदवारांचे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी येथे होतं. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शॉर्ट सव्हिर्स कमिशन (प्रोबेशन) बहाल केलं जातं. या काळात लेफ्टनंट पदासाठीचं पूर्ण वेतन व इतर भत्ते दिले जातात. अधिकाऱ्यांना (पुरुष-महिला) शॉर्ट सव्हिर्स कमिशनमध्ये १४ वर्षं काम करता येतं. (सुरुवातीचा दहा वर्षांचा कालावधी व नंतर ४ वर्षांची मुदतवाढ मिळू शकते.) पुरुष अधिकाऱ्यांची दहा वर्षांची सेवा शॉर्ट सव्हिर्स कमिशनमध्ये पूर्ण केल्यावर, जर उमेदवार पात्र असेल तर त्याला परमनंट कमिशनमध्ये सामावून घेतलं जातं. महिला उमेदवारांना या योजनेद्वारे परमनंट कमिशनमध्ये सामावून घेतलं जात नाही. पदोन्नती : लेफ्टनंट ते लेफ्टनंट कर्नलपर्यंत पदोन्नतीच्या सेवेच्या काळानुसार प्राप्त होते. यानंतरच्या पदोन्नतीच्या संधीसाठी पात्रतेेचे निकष पूर्ण करावे लागतात. लेफ्टनंट जनरल पदापर्यंत शॉर्ट सव्हिर्स कमिशनच्या माध्यमातून जाता येतं. लेफ्टनंटची मासिक मिळकत साधारण ६५ हजार रुपये इतकी असते. प्रवेश अर्ज प्रक्रिया : प्रवेश अर्ज हे केवळ ऑनलाइनच भरता येतील. यासाठी प्रा. मीनल मापुस्कर
(
(
No comments:
Post a Comment