Total Pageviews

Wednesday, 15 February 2012

सेक्युलर बुद्धिजीवींची ढोंगबाजी रश्दी ते तस्लिमा नसरीन-सेक्युलर बुद्धिजीवींची ढोंगबाजी रश्दी यांचाएपिसोड’ आटोपल्यानंतर आता बांगला देशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्याबाबतही जे घडले, ते काय अधोरेखित करते? स्वत:ला सेक्युलर आणि पुरोगामी म्हणवणार्‍या बुद्धिजीवी आणि स्वयंभू मानवाधिकारवाल्यांचे टोळके येताजाता केवळ हिंदूंनाच मानवाधिकारांचे डोज पाजत असते. या पुरोगाम्यांची आता का दातखीळ बसली आहे? इस्लाम आणि मुसलमान हे शब्द उच्चारताच या मंडळींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य असे लुळेपांगळे का होऊन जाते? साहित्य वाङ्‌मयीन उन्नतीसाठी जयपूर येथे तथाकथित साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. बुकर पुरस्कारप्राप्त लेखक सलमान रश्दी या मेळाव्यात येणार आहेत, या नुसत्या बातमीनेही मोठीच खळबळ माजली. रश्दींचा व्हिसा त्वरित रद्द करावा, अशी मागणी मुस्लिम कट्टरतावाद्यांनी सरकारकडे केली. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, हे लक्षात घेऊन मुसलमानांनी बरोबर सरकारला खिंडीत गाठले. राजस्थान सरकारचे कपट स्तविक सलमान रश्दींजवळपर्सन ऑफ इंडियन ओरिजिन’चे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. हे ठावूक असल्यानेच राजस्थान सरकारने कपट करून रश्दींच्या जिवाला धोका आहे, अशी बतावणी केली आणि त्यांचे येणे अशक्यप्राय करून टाकले. त्यानेही समाधान झाल्याने सरकारने त्यांना व्डिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करण्याची परवानगीही नाकारली.पश्‍चिम बंगालमधील कट्टरतावाद्यांवरील अतूट प्रेम घटना पंथनिरपेक्षता आणि बहुविध संस्कृतीचे गोडवे गाणार्‍यांच्या पश्‍चिम बंगालमधील आहे. धर्माच्या नावाखाली स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करण्यास हातभार लावणार्‍या मार्क्सवाद्यांच्या इस्लामी कट्टरतावाद्यांवरील अतूट प्रेमाच्या खुणा पॅलेस्टाईनपासून सद्दाम हुसैनपर्यंत जागोजागी दिसतच आहेत. त्यांच्याच राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांना उदारपणे आश्रय मिळाला. एकीकडे बांगलादेशी मुस्लिमांना अभय आश्रय आणि दुसरीकडे त्याच देशातील लेखिका डॉ. तस्लिमा नसरीनकडे साफ दुर्लक्ष, असा हा दुटप्पी व्यवहार आहे. आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून तस्लिमा दीर्घ काळापासून भारत सरकारला विनवणी करीत आहे. आपल्यालज्जा’ या पुस्तकात तथाकथितरीत्या इस्लामचा अपमान केल्यामुळे मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या भीतीमुळे तस्लिमाला बांगलादेश सोडून पळून जावे लागले होेते. जवळजवळ प्रत्येक मुसलमान तस्लिमाला भारतात संरक्षण आश्रय मिळण्याच्या साफ विरोधात आहे. मार्क्सवाद्यांनी तर रातोरात कोलकातातून त्यांना चंबुगबाळे आवरून पळून जाण्यास भाग पाडले होते. मार्क्सवाद्यांचे बंगालमधून उच्चाटन झाल्यानंतर तेथील सत्तेची समीकरणे तर बदलली. परंतु, इस्लामी कट्टरतावाद्यांबद्दल तेथील सत्ताधार्‍यांना वाटणारे आकर्षण अद्याप कायम आहे. !)ही घटना म्हणजे कट्टरतावाद्यांसमोर शरणागती नाही, तर आणखी काय आहे? असा रोखठोक सवाल तस्लिमाने भारतीय नेते आणि बुद्धिजीवींना विचारला आहे. असे विचारण्यात तस्लिमाची काय चूक आहे? भारतातून सांस्कृतिक सहिष्णुता नष्ट झाली काय? केवळ हिंदूंनाच धर्मनिरपेक्षता, बहुविध संस्कृती आणि सर्वधर्मसमभावाचे उपदेश वारंवार देणार्‍या तथाकथित पुरोगामी बुद्धिजीवींनी आणि सेक्युलर नेत्यांनी या प्रश्‍नांची उत्तरे दिलीच पाहिजेत.मुस्लिम कट्टरपंथीयांच्या योग्य, अयोग्य मागण्यांपुढे गुडघे टेकण्याच्या सेक्युलरिस्टांच्या प्रवृत्तीला काही अंतच नाही. वास्तविक तस्लिमाचेनिर्बासन’ हे पुस्तक अद्याप बाजारात आलेलेच नाही. कोणत्याही मुसलमानाने ते वाचलेले नाही. परंतु, लोकांच्या भावना दुखावतील अशी भीती दाखवण्यात आली. विशेष म्हणजे या पुस्तक मेळाव्यात तस्लिमा येणारही नव्हती. तरीही तेथील शांतता नष्ट होईल अशी निरर्थक शंका घेण्यात आली. कट्टरवाद्यांच्या धमकीला घाबरून सरकारने वस्तुत: मध्ययुगीन मानसिकतेत जखडलेल्या मुस्लिम समाजाला आणखी मागे लोटण्याचे कार्य केले आहे. शाहबानो प्रकरणी तर सेक्युलरिस्ट फार पूर्वीच उघडे पडले आहेत. याबरोबरच अमिना, गुडिया, इमरानासारखी अनेक प्रकरणे जेव्हा बाहेर आली तेव्हा सेक्युलरिस्टांनी कट्टरतावाद्यांच्या सनातनी, रूढिवादी मनोवृत्तीचे पोषण करून मुस्लिम समाजाच्या सुधारणेच्या मार्गात अडथळे आणले.वास्तविक तस्लिमा नसरीनने आपल्या आत्मकथेत स्वत:च्या निर्वासित जीवनातील अनुभवांचाच फक्त उल्लेख केला आहे. एवढ्यावरही आक्षेप कशासाठी? सेक्युलर मंडळी तिला अभिव्यक्तिस्वातंत्र्य का देत नाही? ज्या मकबूल फिदा हुसैन यांनी हिंदूंच्या आराध्य देवी-देवतांसह भारतमातेची अपमानजनक चित्रे काढली, त्या हुसैन यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण कवच पुरवणारे पुरोगामी, बुद्धिजीवी, सेक्युलर नेते आणि त्यांना संरक्षण प्रदान करणारा मीडियातील एक दुराग्रही वर्ग आज तस्लिमा प्रकरणी गप्प का बसला आहे? त्यांची वाचा अचानक नाहीशी कशी झाली? ही केवळ जयपूर किंवा पश्‍चिम बंगालमधीलच उदाहरणे नाहीत. मुस्लिम कट्टरपंथीयांपुढे सपशेल लोटांगण घालून देशहिताला नेहमीच तिलांजली देण्याची सत्ताधार्‍यांची तुष्टीकरणवादी अवसानघातकी वृत्ती सातत्याने प्रगट होत आहे. थेट जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याची असंख्य उदाहरणे दिसून येतात.काश्मिरी पंडितांना खोर्‍यातून हाकलून लावलेपाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी नव्वदीच्या दशकात काश्मिरी पंडितांना खोर्‍यातून हाकलून लावले होेते. या काश्मिरी पंडितांना आजतागायत त्यांच्या मायभूमीत पाऊल टाकता आलेले नाही. फुटीरतावादी शक्तींसमोर झुकणार्‍या सत्ताधार्‍यांना काश्मिरी संस्कृतीचे मूळ वाहक असलेल्या पंडितांचे पुनर्वसन करण्याची हिंमत का होत नाही? अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच त्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न दरवर्षी का होतात? देशातील अन्य भागातील शबरीमला, कुंभमेळा किंवा खुद्द जम्मू येथील वैष्णोदेवी यात्रेला कधीच अडथळे येत नाहीत. मग, अमरनाथबाबतच हे का? या दुरवस्थेसाठी भारतात प्रचलित सेक्युलरवादाचे विकृत स्वरूप जबाबदार नाही काय? घटनेचे ३७० कलम लागू केल्याबरोबर जम्मू-काश्मीरला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याची बिजे रोवण्यात आली, हे खरे नाही काय? आज त्याच काश्मीरच्या खोर्‍यात तिरंगा जाळला जातो आणि भारतमातेचा सर्रास अपमान करण्यात येतो.अफजल गुरूच्या आणि मुंबईला रक्तरंजित करणार्‍या अजमल कसाबच्या मानवाधिकारसंसदेत रक्तपात घडविणार्‍या कटाचा सूत्रधार असलेल्या आणि फाशीची शिक्षा झालेल्या अफजल गुरूच्या आणि मुंबईला रक्तरंजित करणार्‍या अजमल कसाबच्या मानवाधिकारांची भलावण करणारे सेक्युलरिस्ट काल्पनिक भगव्या आतंकवादावर तर तावातावाने बोलतात, पण ज्या इस्लामी दहशतवादामुळे, जिहादमुळे संपूर्ण जग त्रस्त भयभीत आहे त्यावर यांची बोलती पार बंद होऊन जाते. स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे मुस्लिम बुद्धिजीवीही दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो वगैरे पोपटपंची करून कशीबशी वेळ निभावून नेतात. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना स्थानिक मदतीशिवाय आपले उद्दिष्ट गाठणे शक्य आहे काय? ही कोणती मानसिकता आहे, जी देशातील काही नागरिकांना देशद्रोह्यांशी हातमिळवणी करण्यास प्रेरित करीत आहे? या फुटीर, धोकादायक मानसिकतेवर का प्रहार केले जात नाहीत?केरळचे इस्लामीकरण माजी मार्क्सवादी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंद देवभूमी केरळचे कसे इस्लामीकरण केले गेले, याचा खुलासा तेथील माजी मार्क्सवादी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंद यांनीही केला आहे. परंतु, एवढे असूनही तेथील जिहादींना कवटाळण्याची स्पर्धा माकप आणि कॉंग्रेसमध्ये सतत सुरू असते. जगाच्या इतिहासात क्वचितच असा देश असेल की जेथील विधानसभेने राष्ट्रविरोधी शक्तींना आपला पाठिंबा दिला असावा. १६ मार्च २००६ रोजी (होळीची सुट्टी असताना) केरळ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मानवतेच्या आधारावर कोईम्बतूर बॉम्बस्फोटांतील आरोपी मदनीच्या सुटकेसाठी सर्वसंमतीने प्रस्ताव पारित करण्यात आला होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही मदनीला आपल्या कळपात ओढण्यासाठी कॉंग्रेस आणि माकप या दोन्ही पक्षांत स्पर्धा लागली होती. मुस्लिमांच्या मानवाधिकारांचे ढोल बडवणारे सेक्युलरिस्ट दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीला बनावट ठरवत आहेत. दहशतवाद्यांशी घनिष्ठ संबंध ठेवणारा आजमगड सेक्युलरिस्टांचे तीर्थक्षेत्र बनला आहे. या विकृत सेक्युलरवादामुळे मुसलमानांचे कितपत कल्याण होईल, याचे आकलन खुद्द मुस्लिम समाजानेच केले पाहिजे.दादाराज’ जाऊनदीदीराज’ आल्यानंतरही इस्लामी कट्टरपंथी आपला प्रभाव राखून आहेत. याचा पुरावा म्हणजे कोलकाता पुस्तक मेळाव्यातील कट्टरतावाद्यांची धटिंगणशाही. तस्लिमा नसरीनच्या निर्बासन या आत्मकथेचा प्रकाशन समारंभच रद्द करणे आयोजकांना भाग पडले (आणि दीदी फक्त पहात राहिल्यादुसरीसलमान
सलमान

No comments:

Post a Comment