Total Pageviews

Saturday, 4 February 2012

सचिन तेंडुलकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!!!

सचिन रिटायर होतो : एक (दु:)स्वप्न!शेखर देशमुख सचिन तेंडुलकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!!!राजकारणात गेल्यापासून या इम्रान खानचे डोके काम करेनासे झाले आहे. काय वाट्टेल ते बरळतो. बरे बरळला तर एक वेळेस समजू शकते, पण आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान नसावे माणसाला? उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला. याला काय अर्थ आहे? काय तर म्हणे वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर असतानाच साचिन (हा खास इम्रानखानी उच्चार!) तेंडुलकरने सन्मानाने निवृत्ती स्वीकारायला हवी होती. कुठल्या जमान्यात राहतो हा फडतूस इम्रान? आधी नीट सचिन म्हणायला शीक. म्हणे साचिन. आम्ही इकडे एवढ्या मेहनतीनेआला रे आला सचिन आला म्हणत बोंब ठोकतोय. मीडिया, जाहिरातदार, प्रायोजक देव पाण्यात ठेवून शंभराव्या शतकाची आतुरतेने वाट बघताहेत आणि हा तोंड उचकटून फुकाचे सल्ले देत सुटलाय. सल्ला तोही कोणाला, तर आमच्याभारतरत्न इन वेटिंग सचिन तेंडुलकरला. इम्रानने आधी आपला देश सांभाळावा, तिकडे जो काही दहशतवादी राडा चाललाय तो निस्तरावा, मग जगाची उठाठेव करावी. च्यामारी, इतके दिवस आम्ही हे सगळे थोपवून धरले, आता इम्रानपाठोपाठ कुणाही सोम्यागोम्याला कंठ फुटला म्हणजे, कितीत पडेल सगळे? तिकडे इयन चॅपेलनेही सचिनकेंद्री भारतीय मानसिकतेवर घाव घातलेत म्हणे. ग्रेग चॅपेल या आपल्या चक्रम भावाप्रमाणे भारताच्या वाइटावरच टपलाय तो. ऑस्ट्रेलियन टग्यांच्या नादी लागण्याचे काम नाही. पण त्यांच्याच नादाला लागून त्याभय्याने म्हणजे, आपल्या झारखंडच्या धोनीने शालजोडीतले हाणलेत, त्याचे काय? म्हणाला, मी फार तर दोन वर्षं खेळणार आणि रिटायर होणार. कुणी जा म्हणण्याची वाट नाय बघणार. पण आवई उठलीच ना, की या धोनीने सीनियर प्लेअर्सना मेसेज दिलाय. समझने वाले को इशारा काफी होता है..., हा सरळसरळ मराठीद्वेष आहे. आताखळ्ळ्् खटॅकचा इंगा दाखवलाच पाहिजे. तरी आम्ही म्हणत होतो, याला कॅप्टन करू नका, एक दिवस आपल्या डोक्यावर बसून मि-या वाटेल. घ्या आता...
आमच्या गावसकर-शास्त्रीकडून शीक म्हणावं काहीतरी. टेस्ट सिरीज हरल्यानंतर केवढा संताप झाला. पण एकदा तरी सचिनचं नाव घेतलं? काय म्हणाले दोघे, टीममधल्या सीनियर प्लेअर्सची गच्छंती अटळ आहे. म्हणजे कोण, तर ते दोन मद्रासी अण्णा...राहुल-लक्ष्मण. त्यात सचिनचा संबंध नाही. सचिन ज्युनियर-सिनियर नाय, एकदम सुपीरिअर आहे...ऑस्ट्रेलियात संघाने माती नव्हे, शेण खाल्ले. त्यावर टीका करताना मीडियातल्या एकाने तरी सचिनचे नाव घेतले? जाहिरातदार-प्रायोजकांपैकी एकाने तरी तोंडातून ब्र काढत सचिनचे कॉण्ट्रॅक्ट रद्द केले? निवड समितीमधल्या एकाची तरी हिंमत झाली सचिनला ड्रॉप करण्याची? उलट सचिनचे 100वे शतक लौकरात लौकर व्हावे, या सद्भावनेने वन-डे टीममध्ये त्याला जागा करून दिली. म्हणून तर आम्हीसचिन आला रे आला म्हणत तो दिवस साजरा केला.समजा, हा इम्रान म्हणतो तसे घडले असते. म्हणजे वर्ल्ड कपनंतर घरच्या मैदानावर, सन्मानाने, तो म्हणतो तशी मान उंचावून सचिनने निवृत्तीची जंगी घोषणा केली असती, तर मग काय मीडिया-जाहिरातदार-प्रायोजकांनी आपापली दुकाने बंद करून हिमालयाची वाट धरावी, अशी अपेक्षा होती ती काय त्या इम्रानची. अरे, त्याला काय ठाऊक, सचिनचे शंभरावे शतक झाले तर सेलिब्रेशन कसे करायचे, याचे किती जंगी प्लॅनिंग केले आहे सगळ्यांनी. सत्कार, पार्ट्या, भाषणे, गौरवपर लेख, पुरवण्या, टेलिव्हिजन कॅप्सूल्स आणि मग डायरेक्ट भारतरत्न... यासाठी किती, घाम आणि रक्त आटवलेय सगळ्यांनी. तिकडे सचिनचे शतक व्हायचा अवकाश, इकडे काहीशे कोटी रुपयांची चांदी झालीच म्हणून समजा सगळ्यांची. जगाची अर्थव्यवस्था चालती-फिरती राहिली पाहिजे की नाही? जागतिक आर्थिक मंदीची फिकीर आहे की नाही कुणाला? म्हणे, सचिनने निवृत्ती घ्यायला पाहिजे होती. त्याच्या शंभराव्या शतकावर कोट्यवधींचा व्यवहार अवलंबून असताना, एवढी मोठी गुंतवणूक झालेली असताना सचिन रिटायर होईलच कसा? म्हणजे, आपले म्हणणे असे आहे की, सचिनने रिटायर व्हावे हे तो सीमेपलीकडून आलेला इम्रान खान सोडा, आपली निवड समितीसुद्धा ठरवू शकत नाही. खोटं कशाला बोला, पण तसे ते खुद्द सचिनही ठरवू शकत नाही म्हणा. सीमेपलीकडून आलेल्या इम्रान खानचा निषेध! चक्रम चॅपेल बंधूंचा त्रिवार निषेध!! सचिन तेंडुलकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!!!
 

No comments:

Post a Comment