२५ ऑगस्ट २००३ मुंबई बॉम्बस्फोट आरोपीला सजा -एक मोठे पोलिस यश५९ कारसेवकांना २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमध्ये जिवंत जाळल्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. त्यात मुस्लिमांचे प्रचंड नुकसान झाले. याचे पडसाद जगभरात विशेषत: मुस्लिम राष्ट्रांत अधिक उमटले. आखाती देशात तर मशिदी मशिदीत हिंदुस्थानी मुस्लिमांना जिहाद पुकारण्यासाठी मुल्ला-मौलवी लेक्चर देत होते त्या मौलवींच्या जाळ्यात अंधेरी (पूर्व) चिमटपाड्यातील हनीफ सय्यद हाही सापडला. दुबईत इलेक्ट्रिशियनचे काम करणारा हनीफ २००२ च्या सुमारास पुन्हा मुंबईत परतला त्यावेळी त्याला जाहीद पटणी भेटला, तोही दुबईत होता. दुबईतील मशिदीमध्ये नमाज पढतानाच त्याची ओळख झाली होती. या दोघांनी गुजरात दंगलीचा बदला घेण्याची तयारी केली असतानाच त्यांना अंधेरी (पश्चिम) जुहू गल्लीत जरीचे काम करणारा असरत अन्सारी भेटला. हाही धर्मवेडा होता. ‘गुजरातमध्ये मुस्लिमांवर अत्याचार करण्यात आले. गरोदर महिलांची पोटं फाडण्यात आली.’ अशा सीरिज पाहून असरतही मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी या दोघांच्या कटात सामील झाला. त्याचवेळी कुर्ला येथे राहणारा मोहम्मद अन्सार शेख ऊर्फ हसन बॅटरीवाला व मोहम्मद अन्सारी ऊर्फ उस्मान लड्डूवाला यांनी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी या तिघांनाही आरडीएक्स व जिलेटीन साठ्याचा पुरवठा केला. स्फोटके मिळाल्यानंतर हनीफ सय्यदने आपल्या घरातील पहिल्या माळ्यावर बॉम्ब तयार केले. बॉम्ब तयार झाल्यानंतर बॉम्बची एक बॅग त्याने असरत अन्सारीला दिली तर दुसरी बॉम्बची बॅग स्वत:कडे ठेवली. २५ ऑगस्ट २००३ चा दिवस उजाडल्यानंतर हनीफ सय्यद आपली पत्नी फैमिदा व १७ वर्षांची मुलगी फरहीन यांना घेऊन घराबाहेर पडला. स्वत:ची रिक्षा काढली आणि अंधेरी पश्चिमेला जाऊन एका ठिकाणी ती पार्क केली. रिक्षातून उतरून हनीफने दुसरी टॅक्सी पकडली. टॅक्सीच्या डिकीत बॉम्बची बॅग ठेवली. याचदरम्यान असरत अन्सारीनेही अंधेरी पश्चिमेकडून टॅक्सी पकडली. डिकीत बॅग ठेवली आणि टॅक्सी झवेरी बाजारच्या दिशेने हाकली, तर हनीफने आपली टॅक्सी कुलाबा गेट वे जवळ नेऊन थांबविली. त्यावेळी दुपारचा एक वाजला होता.गेट वेला पोचल्यानंतर हनीफ, त्याची पत्नी व मुलगी टॅक्सीतून बाहेर पडले आणि टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाले, ‘आम्ही शॉपिंग करून व गेट वे बघून परत येतो.’ तेव्हा टॅक्सीचालक शिवनारायण पांडे म्हणाला, ‘ठीक आहे. मी लघवीला जाऊन परत येतो. तो जवळच्या सार्वजनिक मुतारीत गेला आणि परत टॅक्सीत बसण्यासाठी येत असतानाच कानठळ्या बसविणारा जबरदस्त स्फोट झाला. त्याची टॅक्सी त्याच्या डोेळ्यांसमोरच शंभर फूट वर उडाली आणि तिने पेट घेतला. काही कळायच्या आतच गेट वे जवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह पाहायला मिळाले. टॅक्सीचालक पांडेची बोबडीच वळली, परंतु तो लघवीला गेला म्हणून वाचला. टॅक्सीत बसून त्या मुस्लीम दांपत्याची व त्याच्या मुलीची वाट पाहत बसला असता तर पांडेही शहीद झाला असता. परंतु मुंबई पोलिसांचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आणि मुंबई पोलिसांचा स्टार विटनेस बनला. असरत अन्सारीचा टॅक्सीचालक हर्ष बहादूर सिंग हा मात्र दुर्दैवी ठरला. असरत अन्सारी टॅक्सी ड्रायव्हर हर्ष सिंगला म्हणाला, तुम जरा रूको, मैं दो मिनट में आता हूं। असे बोलून तो निघून गेला. हर्ष सिंग त्याची वाट बघत टॅक्सीतच बसला आणि दुपारी एकच्या सुमारास झवेरी बाजार येथेही टॅक्सीतच स्फोट झाला आणि त्यात हर्ष सिंग हाही ठार झाला. गेट वेजवळ १८ तर झवेरी बाजारजवळ ३४ असे ५२ निरपराध लोक बॉम्बस्फोटात ठार झाले. गेट वे येथे ४७, तर झवेरी बाजार येथे ११४ जण गंभीर जखमी झाले. इतका मोठा संहार करून हनीफ त्याची बुरखाधारी पत्नी, मुलगी व अरशद आपापल्या घरी गेले आणि बॉम्बस्फोटामध्ये किती ठार झाले, पडसाद कसे उमटले हे पाहण्यासाठी त्यांनी टीव्ही लावला आणि आपल्या भीषण कृत्याचा आँखो देखा हाल बघितला. परंतु शिवनारायण पांडे हा स्टार विटनेस जिवंत राहिल्याने हनीफ व असरतचे क्रूर कृत्य फार काळ लपू शकले नाही. आरोपींनी कुठून टॅक्सी पकडली. टॅक्सीत कोण कसे बसले होते, त्यांचे वर्णन काय होते याची इत्थंभूत माहिती पांडेने दिल्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचच्या पोलीस पथकाने केवळ पाच दिवसांत केसचा छडा लावला. डॉ. सत्यपाल सिंग, राकेश मारिया, धनंजय कमलाकर, सुरेश वालीशेट्टी या मुंबई क्राइम बँचच्या ज्येष्ठ पोलीस अधिकार्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांच्या पथकाला या स्फोटाचा छडा लावण्यात व आरोपींविरुद्ध सबळ पुरावा गोळा करण्यात यश मिळाले. ठोस पुरावे व प्रमुख साक्षीदार पांडेनी निर्भयपणे दिलेली जबानी कामी आली. जाहीद पटणीला माफीचा साक्षीदार करण्यात आल्यामुळे तर हनीफ, त्याची पत्नी, फैमिदा व असरतला फाशीची शिक्षा ठोठावणे न्यायमूर्तींना सोपे गेले. पांडेने आपला जीव धोक्यात घालून आरोपीविरुद्ध जबानी दिली. जाहीदनेही कटाची सर्व इत्थंभूत माहिती दिली, परंतु बॉम्बस्फोट होऊन एक दशक लोटण्यास आले आहे. तरीही हे दोघे स्टार विटनेस आपले स्वातंत्र्य गमावून आजही पोलीस संरक्षणात फिरत आहेत. पोलिसांना स्टार विटनेस सांभाळणे तेवढे सोपे नसते. आज कुणीही कुणाविरुद्ध साक्ष देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे शिवरानारायण पांडे या साक्षीदाराचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्याच्या साक्षीमुळेच बॉम्बस्फोट आरोपींचा छडा लागला आणि त्यांना शिक्षा झाली.पोलीस डायरीप्रभाकर पवार
SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Saturday, 18 February 2012
मुंबई बॉम्बस्फोट आरोपीला सजा -एक मोठे पोलिस यश
२५ ऑगस्ट २००३ मुंबई बॉम्बस्फोट आरोपीला सजा -एक मोठे पोलिस यश५९ कारसेवकांना २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमध्ये जिवंत जाळल्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. त्यात मुस्लिमांचे प्रचंड नुकसान झाले. याचे पडसाद जगभरात विशेषत: मुस्लिम राष्ट्रांत अधिक उमटले. आखाती देशात तर मशिदी मशिदीत हिंदुस्थानी मुस्लिमांना जिहाद पुकारण्यासाठी मुल्ला-मौलवी लेक्चर देत होते त्या मौलवींच्या जाळ्यात अंधेरी (पूर्व) चिमटपाड्यातील हनीफ सय्यद हाही सापडला. दुबईत इलेक्ट्रिशियनचे काम करणारा हनीफ २००२ च्या सुमारास पुन्हा मुंबईत परतला त्यावेळी त्याला जाहीद पटणी भेटला, तोही दुबईत होता. दुबईतील मशिदीमध्ये नमाज पढतानाच त्याची ओळख झाली होती. या दोघांनी गुजरात दंगलीचा बदला घेण्याची तयारी केली असतानाच त्यांना अंधेरी (पश्चिम) जुहू गल्लीत जरीचे काम करणारा असरत अन्सारी भेटला. हाही धर्मवेडा होता. ‘गुजरातमध्ये मुस्लिमांवर अत्याचार करण्यात आले. गरोदर महिलांची पोटं फाडण्यात आली.’ अशा सीरिज पाहून असरतही मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी या दोघांच्या कटात सामील झाला. त्याचवेळी कुर्ला येथे राहणारा मोहम्मद अन्सार शेख ऊर्फ हसन बॅटरीवाला व मोहम्मद अन्सारी ऊर्फ उस्मान लड्डूवाला यांनी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी या तिघांनाही आरडीएक्स व जिलेटीन साठ्याचा पुरवठा केला. स्फोटके मिळाल्यानंतर हनीफ सय्यदने आपल्या घरातील पहिल्या माळ्यावर बॉम्ब तयार केले. बॉम्ब तयार झाल्यानंतर बॉम्बची एक बॅग त्याने असरत अन्सारीला दिली तर दुसरी बॉम्बची बॅग स्वत:कडे ठेवली. २५ ऑगस्ट २००३ चा दिवस उजाडल्यानंतर हनीफ सय्यद आपली पत्नी फैमिदा व १७ वर्षांची मुलगी फरहीन यांना घेऊन घराबाहेर पडला. स्वत:ची रिक्षा काढली आणि अंधेरी पश्चिमेला जाऊन एका ठिकाणी ती पार्क केली. रिक्षातून उतरून हनीफने दुसरी टॅक्सी पकडली. टॅक्सीच्या डिकीत बॉम्बची बॅग ठेवली. याचदरम्यान असरत अन्सारीनेही अंधेरी पश्चिमेकडून टॅक्सी पकडली. डिकीत बॅग ठेवली आणि टॅक्सी झवेरी बाजारच्या दिशेने हाकली, तर हनीफने आपली टॅक्सी कुलाबा गेट वे जवळ नेऊन थांबविली. त्यावेळी दुपारचा एक वाजला होता.गेट वेला पोचल्यानंतर हनीफ, त्याची पत्नी व मुलगी टॅक्सीतून बाहेर पडले आणि टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाले, ‘आम्ही शॉपिंग करून व गेट वे बघून परत येतो.’ तेव्हा टॅक्सीचालक शिवनारायण पांडे म्हणाला, ‘ठीक आहे. मी लघवीला जाऊन परत येतो. तो जवळच्या सार्वजनिक मुतारीत गेला आणि परत टॅक्सीत बसण्यासाठी येत असतानाच कानठळ्या बसविणारा जबरदस्त स्फोट झाला. त्याची टॅक्सी त्याच्या डोेळ्यांसमोरच शंभर फूट वर उडाली आणि तिने पेट घेतला. काही कळायच्या आतच गेट वे जवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह पाहायला मिळाले. टॅक्सीचालक पांडेची बोबडीच वळली, परंतु तो लघवीला गेला म्हणून वाचला. टॅक्सीत बसून त्या मुस्लीम दांपत्याची व त्याच्या मुलीची वाट पाहत बसला असता तर पांडेही शहीद झाला असता. परंतु मुंबई पोलिसांचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आणि मुंबई पोलिसांचा स्टार विटनेस बनला. असरत अन्सारीचा टॅक्सीचालक हर्ष बहादूर सिंग हा मात्र दुर्दैवी ठरला. असरत अन्सारी टॅक्सी ड्रायव्हर हर्ष सिंगला म्हणाला, तुम जरा रूको, मैं दो मिनट में आता हूं। असे बोलून तो निघून गेला. हर्ष सिंग त्याची वाट बघत टॅक्सीतच बसला आणि दुपारी एकच्या सुमारास झवेरी बाजार येथेही टॅक्सीतच स्फोट झाला आणि त्यात हर्ष सिंग हाही ठार झाला. गेट वेजवळ १८ तर झवेरी बाजारजवळ ३४ असे ५२ निरपराध लोक बॉम्बस्फोटात ठार झाले. गेट वे येथे ४७, तर झवेरी बाजार येथे ११४ जण गंभीर जखमी झाले. इतका मोठा संहार करून हनीफ त्याची बुरखाधारी पत्नी, मुलगी व अरशद आपापल्या घरी गेले आणि बॉम्बस्फोटामध्ये किती ठार झाले, पडसाद कसे उमटले हे पाहण्यासाठी त्यांनी टीव्ही लावला आणि आपल्या भीषण कृत्याचा आँखो देखा हाल बघितला. परंतु शिवनारायण पांडे हा स्टार विटनेस जिवंत राहिल्याने हनीफ व असरतचे क्रूर कृत्य फार काळ लपू शकले नाही. आरोपींनी कुठून टॅक्सी पकडली. टॅक्सीत कोण कसे बसले होते, त्यांचे वर्णन काय होते याची इत्थंभूत माहिती पांडेने दिल्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचच्या पोलीस पथकाने केवळ पाच दिवसांत केसचा छडा लावला. डॉ. सत्यपाल सिंग, राकेश मारिया, धनंजय कमलाकर, सुरेश वालीशेट्टी या मुंबई क्राइम बँचच्या ज्येष्ठ पोलीस अधिकार्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांच्या पथकाला या स्फोटाचा छडा लावण्यात व आरोपींविरुद्ध सबळ पुरावा गोळा करण्यात यश मिळाले. ठोस पुरावे व प्रमुख साक्षीदार पांडेनी निर्भयपणे दिलेली जबानी कामी आली. जाहीद पटणीला माफीचा साक्षीदार करण्यात आल्यामुळे तर हनीफ, त्याची पत्नी, फैमिदा व असरतला फाशीची शिक्षा ठोठावणे न्यायमूर्तींना सोपे गेले. पांडेने आपला जीव धोक्यात घालून आरोपीविरुद्ध जबानी दिली. जाहीदनेही कटाची सर्व इत्थंभूत माहिती दिली, परंतु बॉम्बस्फोट होऊन एक दशक लोटण्यास आले आहे. तरीही हे दोघे स्टार विटनेस आपले स्वातंत्र्य गमावून आजही पोलीस संरक्षणात फिरत आहेत. पोलिसांना स्टार विटनेस सांभाळणे तेवढे सोपे नसते. आज कुणीही कुणाविरुद्ध साक्ष देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे शिवरानारायण पांडे या साक्षीदाराचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्याच्या साक्षीमुळेच बॉम्बस्फोट आरोपींचा छडा लागला आणि त्यांना शिक्षा झाली.पोलीस डायरीप्रभाकर पवार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment