Total Pageviews

Wednesday 15 June 2011

CHECK MOBILES USED BY POLICE OFFICERS RULE COURT

उच्च न्यायालयाचा दणका; पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश...पोलिसांनो, स्वतर्‍चाच मोबाईल वापरा!पोलीस वापरत असलेले मोबाईल त्यांच्या स्वतर्‍च्या नावे नसल्यास त्यांना स्पष्टीकरणासाठी बोलवा त्यात दोषी आढळलेल्या अधिकार्‍यावर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने आज पोलीस आयुक्तांना दिल़े
बलात्काराच्या एका प्रकरणात साहाय्यक पोलीस निरीक्षकाने तडजोड केल्याचा आरोप करणार्‍या याचिकेवरील सुनावणीत संबंधित अधिकारी वापरत असलेला मोबाईल त्याच्या स्वतर्‍च्या नावे नसल्याचे न्या़ बी़ एच़ मर्लापल्ले न्या़ यू़डी़ साळवी यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आल़े त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने वरील आदेश दिल़े
पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सर्व अधिकार्‍यांना मोबाईलचा तपशील देण्याचे निर्देश द्यावेत़ त्याची सर्व कागदपत्रे आयुक्तांनी तपासून बघावीत़ एखादा अधिकारी वापरत असलेला मोबाईल त्याच्या नावे नसल्यास त्याला स्पष्टीकरणासाठी बोलवून, त्यात तो अधिकारी दोषी आढळल्यास आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आह़े
याप्रकरणी अमिनुद्दीन सईदने केलेल्या याचिकेनुसार, एक महिला आपल्या पोलिओग्रस्त मित्राला घर कार दे, अन्यथा आपल्या शरीरसंबंधाची सीडी पोलिसांना देईन असे धमकावत होती़ याबाबत आपण पोलिसांत तक्रार करायला गेलो तेव्हा ओशिवरा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आह़े यावरील सुनावणीत एपीआय खाडे वापरत असलेला एक मोबाईल अलूसाहेब बाबुराव खाडे यांच्या नावे आहे, तर दुसरा शैलेश यादवचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल़े

No comments:

Post a Comment