Total Pageviews

Monday, 11 April 2011

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 54

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 54
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/ तुळजाभवानी
मंदिरात ३३ किलो सोने, २०० किलो चांदी बेपत्ता महाराष्ट्राच्या राज्यकारभारात सध्या एवढी बजबजपुरी माजली आहे की, कुणालाच कशाचे पडलेले नाही. चारित्र्याची संपूर्ण वासलात लागली आहे. हावरटपणाने हद्द गाठली आहे. भस्मासुरी खादाडीला आता देवाधर्माचीही धास्ती उरलेली नाही. तुळजा भवानी हे छत्रपती शिवरायांनी पूज्य मानलेले स्थान. सध्या राज्यात शिवाजी महाराजांच्या उदोउदोला कमतरता नाही. त्यांच्या कुलदेवतेच्या संपत्तीची राजरोस पळवापळवी चालू आहे. देवस्थानाची भक्त मंडळी आपापल्या श्रद्धेनुसार देवीला यथाशक्ती सोन्या-चांदीचे दागिने भक्तिभावाने अर्पण करतात. मंदिराचे पुजारी आणि देवस्थानाचे विश्‍वस्त निदान देवाच्या संपत्तीचा नीट सांभाळ करतील अशी भोळ्याभाबड्या जनतेची समजूत असते. पण तुळजाभवानी मंदिराच्या विश्‍वस्त आणि पुजार्‍यांनी भक्तांची ती श्रद्धा निकाली काढली आहे. मातेला गेल्या पंधरा वर्षापासून अर्पण केल्या गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ३३ किलो सोन्याचा थांगपत्ता नाही, तर सुमारे २०० किलो चांदीही बेपत्ता आहे. सोन्याचे दागिने विकताना दहा-पंधरा टक्के घट येते असा साधारणत: अनुभव आहे. मात्र ८२ किलो सोन्यात ३३ किलोची घट आणि ३८३ किलो चांदीच्या साहित्यात निम्मी घट हा कुणा संबंधिताच्या खास करामतीचा प्रभाव आहे यात शंका नाही. खोटे दागिने देवाला अर्पण करण्याची हिंमत या देशातील सामान्य जनतेजवळ अद्याप नाही. देवाच्या सेवेचा पिढीजात वारसा मिरवणारे गणंग मात्र काय करतील करू शकतील ते केवळ देवालाच ठावे! आता भरपूर गाजावाजा झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होणार आहे. विश्‍वस्त म्हणविणार्‍यांची खादाड प्रवृत्ती एवढी वाढली आहे की भवानीमातासुद्धा त्यांना अडवू शकत नाही! मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा देण्याच्या प्रक्रियेतही ४० किलो सोने असेच हडप केले गेले होते. त्या प्रकरणाची आठवण येथे होते. देवाचे पुजारी देवालाच हस्तलाघव दाखवतात तर जनतेचे सेवक म्हणवणारे सद्रक्षणाय खल निग्रहणाय’ हे विरुद मिरवणारे राज्यातील पोलीस चक्क खूनखराबा करू लागले आहेत. जनतेच्या मालमत्तेची आणि जीविताची काळजी पोलीस घेतात असा समज आहे. पण ठाण्याच्या पोलीस दलात खंडणीविरोधी पथकातील एक पोलीस रवि परब याच्यावर एका वृद्धाच्या खुनाचा आरोप आहे. एकट्या राहणार्‍या त्या वृद्ध गृहस्थांच्या नावावर मोठा जमीनजुमला अन्य बरीच मालमत्ता होती.त्या संपत्तीच्या मोहाने रवि परब त्याचा खून करण्यास सरसावला.  
पुणे
विद्यापीठाच्या चुका आणि गलथान कारभाराची शिक्षा विद्यार्थ्यांना ,नादानपणाचा नवाच विक्रम शिक्षणाही
बेदरकारपणाची बजबजपुरी माजली आहे. त्याचा धक्कादायक प्रत्यय काल प्रथम वर्ष बी. कॉमची परीक्षा देणार्‍या परीक्षार्थींना आला. या परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या. अर्थात आजकाल परीक्षा सुरळीत पार पडणे जवळपास अशक्यच असते. दरवर्षी काही ना काही गोंधळ होतोच. यंदा पुणे विद्यापीठाच्या चुका आणि गलथान कारभाराची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागली. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सच्या प्रश्‍नपत्रिकेत असंख्य चुका होत्या. मात्र परीक्षेचा दिवस उजाडेपर्यंत ते कोणाच्याही लक्षात आले नाही. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्‍नपत्रिका पडल्यावर त्यातील चुका पाहून विद्यार्थ्यांना धक्काच बसला. त्यांनीच त्या चुका संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्या. परीक्षा आटोपल्यावर अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. कॉलेजनेसुध्दा प्रश्‍नपत्रिकेत प्रचंड चुका असल्याचे विद्यापीठाला कळविले. त्याबाबत काय करायचे त्याची विचारणा केली.पण बरेच दिवस झाले तरी विद्यापीठाकडून काहीच हालचाल झाली नाही. काय निर्णय घेतला जाईल तेसुध्दा कळविण्यात आले नाही. आणि आता अचानक विद्यापीठ जागे झाले. त्या विषयाची मंगळवार दि. १२ एप्रिलला पुन्हा परीक्षा घेतली जाणार असल्याचे आदल्या दिवशी कॉलेजांना कळविण्यात आले! कॉलेजांनी विद्यार्थ्यांना फोन करून परीक्षा घेण्याची कशीबशी तयारी केली. पण सगळ्यांशी संपर्क होणे शक्यच नव्हते. एका रात्रीत परीक्षेची तयारी करणेही अशक्य होते. बरेच विद्यार्थी परीक्षा संपल्याने परगावी निघून गेले आहेत. त्यामुळे फेरपरीक्षा घेतली गेली तरी सर्वांना ती देता आली नाही. त्यावर विद्यापीठानेच पुन्हा नवा तोडगा काढला. तोसुध्दा इरसालपणाचा नमुना ठरावा असा आहे. ज्यांनी पुन्हा परीक्षा दिली त्यांचे पेपर तपासायचे आणि ज्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचा निकाल पूर्वी दिलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे द्यायचा असे विद्यापीठाने ठरविले आहे! जो दे उसका भला, ना दे उसकाभी भला या धर्तीचा निर्णय शिक्षणाच्या क्षेत्रात आणि तोसुध्दा पुणे विद्यापीठासारखी संस्था घेते हे धक्कादायक आहे. पुणे तिथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने म्हटले जायचे. ती उक्ती उणेपणाच्या बाबतीत सार्थ ठरवण्याचा विडा पुणे विद्यापीठाने उचलला असावा असे दिसते. गेल्या काही वर्षातील अनुभव तसाच आहे. प्रवेशापासून परीक्षेपर्यंत दरवर्षी काही ना काही घोटाळे होत असतात. यावेळी स्वत: प्रश्‍नपत्रिकेत चुका करून आणि ती चूक निस्तरताना विद्यार्थ्यांना वेठीस धरून विद्यापीठाने नादानपणाचा नवाच विक्रम केला आहे!

No comments:

Post a Comment