Total Pageviews

Friday 29 April 2011

NAXALISM नक्षलवाद्यांच्या 'प्रपोगंडा युनिट्‌स'चा शोध सुरू

नक्षलवाद्यांच्या 'प्रपोगंडा युनिट्‌स'चा शोध सुरू सकाळ वृत्तसेवा पुणे - नक्षलवाद्यांच्या "प्रपोगंडा युनिट'चे जिल्ह्यातही अस्तित्व दिसून आल्यामुळे दहशतवादविरोधी पथकाबरोबरच (एटीएस) पुणे पोलिसांनीही जोरदार तपास मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध पोलिस यंत्रणांना सुमारे चौदा महिन्यांत नक्षलवाद्यांच्या संभाव्य कारवायांबाबत 16 "ऍलर्ट' मिळाले आहेत. नक्षलवाद्यांना विविध मार्गांनी सहानुभूती दाखविणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिस यंत्रणांनी प्रारंभ केला आहे. नक्षलवाद्यांशी संबंधितांवर "एटीएस'ने पिरंगुटमध्ये कारवाई केली आहे. त्यांनी विणलेले जाळे कसे होते, त्यात कोण सहभागी होते, त्यांना कोणाची मदत आहे, याबाबत जोरदार तपास सुरू आहे. पुणे पोलिसांनीही "नक्षल सेल' एक वर्षापूर्वी सुरू केला आहे. जहाल नक्षलवादी पुण्यात येत असल्याचे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, त्यांच्याशी संबंधित काही जण पुण्यात वावरत असावेत, असा पोलिस यंत्रणांचा दाट संशय आहे. या पार्श्‍वभूमीवर, दहशतवादविरोधी पथकाकडूनही तपास मोहीम सुरू आहे, असे विभागाचे येथील प्रमुख सहायक आयुक्त विनोद सातव यांनी नमूद केले. "नक्षल सेल'कडूनही शहरात तपासणी मोहीम सुरू आहे, अशी माहिती शहर पोलिसांच्या विशेष शाखेचे निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली. विशेष सेलमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना गुरुवारी सादर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या या सेलमध्ये पोलिसांची संख्या कमी आहे. नक्षल कृत्यांना सक्रिय पाठबळ देणाऱ्या त्यांच्यातील एका गटाचे मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक आदी प्रमुख शहरांत अस्तित्व आहे. संघटनेला आर्थिक रसद पुरविण्यासाठी काही उद्योगपती, व्यावसायिक यांच्याकडून हा गट पैसे गोळा करतो. तसेच नक्षल कृत्यांचे समर्थन करणारे विचार युवकांमध्ये पसरविण्यासाठी हे "प्रपोगंडा युनिट' कार्यरत असते, अशी पोलिसांची माहिती आहे. हैदराबाद पोलिसांनी पुण्यातून तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित एका दांपत्याला अटक केली होती. तसेच पुणे-मुंबईमध्ये नक्षलवाद्यांच्या काही गटांतील सक्रिय सदस्यांचा वावर असतो, असेही अधिकृत सूत्रांनी नमूद केले. या संदर्भात गेल्या वर्षी जानेवारीपासून या वर्षी एप्रिलपर्यंत एकूण 16 "ऍलर्ट' केंद्रीय राज्य स्तरीय यंत्रणांकडून पुण्यातील पोलिस यंत्रणांना मिळाल्याचे सांगण्यात आले. "ऍलर्ट' मिळाल्यावर त्याची खातरजमा केली होती. मात्र, पहिल्यांदाच "अशा ऍलर्ट'नुसार कारवाई झाली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार, त्यांना आर्थिक मदत करणारे, वैचारिक पाठबळ देणाऱ्या व्यक्ती, संघटना यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. प्रतिक्रिया आणि पवारांच्या "प्रपोगंडा युनिट' सकाळ चे काय? कुठलाही विचार दडपून टाकणे चूक आहे. अगदी आपल्याला कितीही चुकीचा वाटला तरी. पण तुम्ही सकाळ विरुद्ध लिहून बघा कसे दडपून टाकतात ते. लोकांना आपल्या आशा आकांक्षा सनदशीर मार्गाने पूर्ण होऊ शकत नाहीत असे लक्षात आले तर ते नक्षलवाद, दहशतवाद अशा गोष्टींकडे वळतात. पण देशाची एवढी वाट लागली आहे पण मुठभर सत्तेत किवा सत्तेशी संबंधित असलेल्या लोकांना ते कळत नाहीये.गडचिरोलीतील नक्षलवादाचा प्रश्‍न फक्त पोलिस भरती करून संपणार नाही, तर त्या भागाच्या विकासासाठी सामुदायिक प्रयत्नही व्हायला हवेत, अशी अपेक्षा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी (ता. दहा) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.हसन अलीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू असून पोलिसांकडे त्यांच्या संदर्भातला तपास करण्याच्या सूचना आलेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. देगलूरला जाण्यासाठी गुरुवारी सकाळी गृहमंत्री पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन झाले. या वेळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. श्री. पाटील म्हणाले, की गेल्या वर्षी बाराशे पोलिसांची भरती करण्यात आली. आणखी यंदा पोलिस भरती करण्यात येणार असून भरतीला गडचिरोलीतील युवकांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र तेथील नक्षलवाद हा केवळ पोलिस भरती करून प्रश्‍न सुटणार नाही. शिक्षणही महत्त्वाचे आहेत. या भागात चांगले शिक्षक मिळाले पाहिजेत. ती कमतरता भरून काढली पाहिजे. आजकालचे तरुण अधिकारी गडचिरोलीला जायला तयार होत नाहीत. त्यांच्यात ही मानसिकता नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नवीन फौजदारांची भरती करण्यात आली मात्र त्यांचीही तिथे जाण्याची तयारी होत नाही. त्यामुळे त्या भागातील पदवीधारक पोलिस शिपायांना परीक्षेद्वारे बढती देता येईल काय? असा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले

On 29/04/2011 04:31 AM sunil datar said:

No comments:

Post a Comment