Total Pageviews

Monday, 25 April 2011

KALMADI -INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 86


KALMADI -INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 86 http://brighemantmahajan.blogspot.com/'राष्ट्रकुल' घोटाळा :कलमाडींना अटक; काँगेसमधून निलंबितसीबीआयने नोंदवले आठ गुन्हेस्पेक्ट्रम घोटाळा जगभरातील क्रीडाविश्वात भारताची प्रतिमा डागाळणाऱ्या हजारो कोटींच्या 'राष्ट्रकुल' घोटाळ्यात अखेर संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना सोमवारी अटक झाली. राष्ट्रकुल खेळांसाठी स्वीस कंपनीवर १४१ कोटी रुपयांच्या कंत्राटाची खैरात केल्याचा आरोप कलमाडींवर ठेवण्यात आला असून त्यांना मंगळवारी कोर्टासमोर उभे करण्यात येईल. त्यामुळे कलमाडींना सोमवारची रात्र सीबीआयच्या कोठडीत काढावी लागेल. कलमाडींवर अटकेची कारवाई होताच काँग्रेस पक्षानेही तातडीने कारवाईचा बडगा उगारत त्यांना पक्षातून निलंबित केले. केंदीय क्रीडा मंत्री अजय माखन यांनीही कलमाडींची ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदावरूनही हकालपट्टी करण्यासाठी समितीला पत्र पाठवले आहे! कलमाडींना सोमवारी सकाळी सीबीआयच्या दिल्लीतील नव्या मुख्यालयात बोलावले गेले. दिवसभर त्यांना अधिकाऱ्यांच्या प्रश्ानंच्या फैरींना तोंड द्यावे लागले. अखेर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली. डिसेंबरपासून सीबीआयसमोर येण्याची कलमाडी यांची ही चौथी वेळ होती! कलमाडींचे 'विश्वासू' सहकारी आणि संयोजन समितीचे महासचिव ललित भानोत आणि महसंचालक व्ही. के. शर्मा यांना या प्रकरणात या पूवीर्च अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे दोन अधिकारी नुकतेच चौकशीसाठी लंडनला जाऊन आले. सीबीआयला या प्रकरणात नवे सज्जड पुरावे मिळाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयने नोंदवले आठ गुन्हे
सीबीआयने राष्ट्रकुल प्रकरणात आत्तापर्यंत एकूण आठ गुन्हे नोंदवले आहेत. त्यातील तीन क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसंबंधात, दोन क्वीन बॅटनसंदर्भात तर अन्य स्वीस टाइम कीपिंग आणि राष्ट्रकुल स्पर्धांच्या प्रसिद्धीसाठी एसआयएस कंपनीशी केलेल्या व्यवहारांबद्दल आहेत. राष्ट्रकुल खेळांसाठी टीएसआर(टाइम स्कोअरिंग रिझल्ड सिस्टिम)च्या व्यवहारात स्विस कंपनीला वाढीव दराने कंत्राट देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप कलमाडींवर ठेवण्यात आला आहे. याच कंपनीला कंत्राट देण्याचे पूर्वनियोजित असल्याने या व्यवहारात संयोजन समितीने इतर पुरवठादारांचा विचारही केला नसल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीबीआयने क्वीन बॅटन रिले दरम्यान 'एएम फिल्म्स' तसेच 'एएम कार अँड व्हॅन लिमिटेड' कंपन्यांकडून अवाच्या सव्वा दराने भाडेतत्त्वावर व्यवहार केल्याचा आरोप कलमाडी आणि सहकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या लंडनस्थित कंपन्यांचा मालक आशीष पटेल याच्याकडून माहिती आणि कागदपत्रे मिळाल्यानंतर कलमाडी यांच्या अटकेच्या कारवाईची चक्रे वेगाने फिरल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी घोटाळ्यात नाव गुंतलेल्या आणखी काही कंपन्यांचीही चौकशी केली चौकशी टाळण्याचा कलमाडी यांनी अटोकाट प्रयत्न केला. आपण परदेशदौऱ्यावरून आल्यानंतर चौकशीसाठी हजर राहू असे सांगणाऱ्या कलमाडी यांनी १९ एप्रिलला परदेशातून परतल्यावरही सीबीआयसमोर जाण्यास टाळटाळ केलीस्पेक्ट्रम घोटाळा आणि राष्ट्रकुल घोटाळा पुण्यातील काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांना झालेली अटक आणि स्पेक्ट्रम घोटाळ्यात सादर झालेल्या पुरवणी आरोपपत ्रात तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांची मुलगी आणि खासदार कनीमोळी यांचा झालेला समावेश, यामुळे भ्रष्टाचारविरोधातील सीबीआयच्या कारवाईची विश्वासार्हता वाढण्यास निश्चितच मदत होईल. या स्पर्धांच्या आयोजनातील अनेक घोटाळे आणि स्पर्धांसाठी दिल्लीत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात प्रशासकीय पातळीवर दाखविली गेेलेली अकार्यक्षमता यांची चर्चा स्पर्धा सुरू होण्याआधीच टिपेला पोचली होती. ती ऐकून स्पर्धक धास्तावले असले तर आश्चर्य नव्हते. भारतीय जनताही धास्तावली होती, पण ती देशाची बेअब्रू होण्याच्या भीतीने. प्रत्यक्षात देशाला अभिमान वाटावा अशाच पद्धतीने राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्या. मात्र त्यामुळे स्पधेर्च्या आयोजनातील आथिर्क गैरव्यवहारांची पापे धुवून निघतील आणि पुन्हा क्रीडा-क्षेत्रातील आपली मक्तेदारी कायम ठेवण्यात यश येईल, हा कलमाडी आणि कंपूचा अंदाज यावेळी खोटा ठरला. स्पेक्ट्रमघोटाळा आणि राष्ट्रकुल घोटाळा या दोन्हींचे सूत्रधार कंेदातील संयुक्त पुरोगामी आघाडीतील (युपीए) अनुक्रमे दमुक आणि काँग्रेस या पक्षांचे नेते असल्यामुळे, या घोटाळ्यांबाबत कठोर कारवाई होताना दिसणे, हे युपीए सरकारच्या आणि त्यातही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विश्वासार्हतेसाठी गरजेचे होते. कलमाडी यांच्यावरील कारवाईत राजकीय अडचण नसली, तरी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीत आणि दमुकचे टेलिकॉम मंत्री . राजा यांच्या-विरोधातील कारवाईत राजकीय धोका होता. अर्थात संसदेत विरोेधी पक्षीयांनी आणि बाहेर माध्यमांनी दबाव निर्माण केला असतानाच, सुप्रीम कोर्टानेही स्पेक्ट्रम घोटाळ्याची गंभीर दखल घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. यामुळे एकप्रकारे पंतप्रधान आणि युपीएच्या अध्यक्ष सोनिया यांचीही सोय झाली! सीबीआयच्या तपासात केंदाने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा करण्याचे धाडस आता करुणानिधी करू शकणार नाहीत आणि त्यासाठी सरकार पाडण्याच्या धमक्या देऊन स्वत:चे हात पोळून घेणार नाहीत, या आशेला जागा होती. राजा यांना गजाआड केले गेले, तरी केंदातील आघाडीत आणि मंत्रिमंडळातही दमुकचे मंत्री कायम राहिले. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस-दमुक युती झाली. परंतु आता कनीमोळींचे नाव आरोपपत्रात आल्यामुळे, आज ना उद्या त्यांनाही अटक होऊ शकते. शिवाय हे नाव आले आहे, ते स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सुमारे दोनशे कोटींची रक्कम बलवा याच्या कंपन्यांच्या साखळीव्यवहारातून कलईगनार टीव्ही प्रा. लि. या कंपनीपर्यंत पोचल्याचे पुरावे सीबीआयला आढळल्यामुळे. या कंपनीत कनीमोळी यांचे २० टक्के शेअर्स आहेत, तर करुणानिधी यांची पत्नी आणि कनीमोळीची सावत्र आई दयालू अम्मल यांचे ६० टक्के! स्पेक्ट्रमवाटपाच्या लाभाथीर् कंपनीशी झालेल्या या संशयास्पद आथिर्क व्यवहारात कनीमोळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना आरोपी करण्यात आले आहे. करुणानिधींसाठी समाधानाची बाब म्हणजे त्यांच्या पत्नीचे नाव आरोपपत्रात समाविष्ट नाही. त्यांच्या नावे ६० टक्के शेअर्स असले, तरी त्यांचा सहभाग केवळ नावापुरताच आहे आणि कंपनीच्या व्यवहारांची कल्पनाही त्यांना नाही, असे सीबीआयला आढळल्यामुळे त्यांचे नाव वगळले गेले असावे. त्यामुळे त्याचे राजकारण करण्यात अर्थ नाही. सीबीआयच्या चौकशीत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप होता नये, तसाच माध्यमे विरोधी पक्ष यांच्या सोईस्कर समजुतींचे समाधान करण्याचा दबावही सीबीआयने येऊ देता नये. कोर्टात ग्राह्य मानले जातील असे पुरावे आणि माध्यमांतील चर्चा रंगवायला पुरेसे ठरणारे 'पुरावे' यात फरक असतो, याचे भान ठेवले गेले पाहिजे. अशाप्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी वेळ द्यावा लागतो.राष्ट्रकुल स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेल्यांना तसेच भरमसाट भावाची कंत्राटे संगनमताने देत देशाचे कोट्यवधींचे नुकसान करण्याच्या कटाचे लाभाथीर् असलेल्यांना आधी अटका झाल्या. त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती, कागदपत्रे यांच्याआधारे समोर येणाऱ्या बाबींविषयी कलमाडी यांचे स्पष्टीकरण घेण्यासाठी त्यांची चार वेळा चौकशी करण्यात आली आणि नंतरच त्यांना अटक झाली आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरही आरोप झाले आहेत. मात्र ते राजकीय किती आणि फौजदारी गुन्ह्यासाठी आवश्यक त्या निकषांची पूतीर् करणारे किती, याविषयी आजच निष्कर्ष काढणे अकाली ठरेल. भ्रष्टाचाराच्या विरोधातील देशातील वातावरण आणि सुप्रीम कोर्टाची देखरेख यामुळे सीबीआय या गुन्ह्यांचे ताकिर्क टोक गाठेल, या आशेला कलमाडी यांची अटक कनीमोळी यांच्यावरील आरोपपत्रामुळे बळ मिळाले आहेकलमाडी यांचा खेळ आता संपुष्टात खेळात राजकारण आणि राजकारणाचा खेळ अशी स्थिती भारतात अनेकदा असते . सुरेश कलमाडी यांनी या दोन्ही गोष्टी शब्दश : खरे करून दाखविल्या . तब्बल तीस वषेर् कलमाडी यांचा हा हातखंडा प्रयोग सुरू आहे . राष्ट्रकुल क्रीडा स्पधेर्तील गैरव्यवहाराबाबत सोमवारी त्यांना अटक झाल्यानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत . त्यामुळे बहुधा कलमाडी यांचा खेळ आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत .
.............
भारतामध्ये क्रिकेट हा एकच खेळ आहे ... बाकी सगळ्या खेळांकडे बघण्यास कोणीच नाही .... असे म्हणत या सगळ्या खेळांची सूत्रे आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे सुरेश कलमाडी . पुण्याच्या सेंट व्हिन्सेंट आणि र्फग्युसन महाविद्यालयाचे ते माजी विद्याथीर् . हवाई दलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर कलमाडी रमले ते आपल्या हॉटेल व्यवसायामध्ये आणि पुण्याच्या राजकारणामध्ये . युवक काँग्रेसचे राजकारण करत असतानाच पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली . गरवारे उद्योगसमूहामध्ये मोठ्या पदावर असलेले अनिल सुळे हे खरे अध्यक्षपदाचे उमेदवार होते . याच वेळेस महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेची सूत्र बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती . हे दोन्ही पक्षी एकाच दगडाच मारण्यासाठी तेव्हाच्या अॅथलेटिक्स संघटनेच्या कार्यर्कत्यांनी कलमाडी यांची निवड केली . त्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या पुण्याच्या निवडणूकीमध्ये त्यांना विरोध झाला नाही . शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक तेव्हापासूनच . त्याच बळावर पाहता पाहता ते महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष झाले . त्याच सुमारास राजीव गांधी यांच्याकडे दिल्लीच्या आशियाई स्पर्धांची सूत्रे होती . कलमाडी आणि राजीव गांधी हे दोघेही पायलट . त्यातूनच त्यांची मैत्री जुळली . पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर भारताने कधी तरी ऑलिंपिकचे आयोजन करावे , अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती . शरद पवार यांच्या काँग्रेस ( एस ) मध्ये असलेले कलमाडी तोपर्यंत खासदार म्हणून दिल्लीत पोहोचले होते . भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने १९८२ मध्ये बीजींग येथील मॅरेथॉनसाठी त्यांची संघव्यवस्थापक म्हणून नेमले . बीजिंगची मॅरेथॉन पाहिल्यानंतर असा प्रयत्न पुण्यात करून बघायचा हे त्यांनी ठरविले आणि प्रत्यक्षातही आणले . मॅरेथॉन ही अॅथलेटिक्समधील सर्वात लांबची शर्यत . त्याचा वापर आपल्यालाही क्रीडा क्षेत्रातील लांब टप्याचे राजकारण करण्यासाठी होईल हे ओळखून कलमाडी मॅरेथॉनच्या मागे लागले . पुण्यात १९८६ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी अॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदाची खुचीर् मिळविली . ती त्यानंतर वीस वषेर् त्यांच्याकडेच होती . स्वातंत्र्याच्या चाळीशीच्या निमित्ताने दिल्लीत झालेल्या दौडीत राजीव गांधी सहभागी झाले आणि कलमाडी यांचे क्रीडा क्षेत्रातील वजन आणखी वाढले . १९८९ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई ट्रॅक अँड फिल्ड स्पधेर्च्या संयोजनातून , मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरविली की त्याचे फायदे काय होतात हे त्यांना समजले . यातून त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न सुरू केला . इकडे महाराष्ट्रात १९९४ मध्ये झालेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्यांना फायदेशीर ठरली . त्याच दरम्यान पुणे महापालिकेची सत्ता हातात आली होती , तर लगेचच औट घटकेचे का होईना रेल्वे राज्यमंत्रीपद त्यांना मिळून गेले . आपल्या कामाचा झपाटा दाखवित त्यांनी आपल्या आठ महिन्याच्या कारकीदीर्त केलेली उदघाटने अनेक रेल्वे मंत्र्यांना पाच वर्षातही करता आलेली नाहीत . तीन वेळा अपयशी ठरल्यानंतर १९९६ मध्ये कलमाडी पहिल्यांदा भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष झाले . ते अजूनही कायम आहेत . या कारकीदीर्त त्यांनी आफ्रो आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले . त्याप्रमाणे देशभरामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली . कलमाडी यांना असलेली मिरविण्याची हौस आणि या स्पर्धांच्या निमित्ताने उत्सव साजरे करण्याची त्यांची आवड या दोन्हीमुळे ते नेहमीच अडचणीत आले आहेत . त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने ऑलिंपिक स्पर्धांत आणि ऑलिंपिक खेळांमध्ये पूवीर् पेक्षा कितीतरी अधिक यश मिळविले आहे . मात्र , त्याचे श्रेय कलमाडींना कधीच मिळाले नाही . राष्ट्रकुल क्रीडा स्पधेर्च्या गैरव्यवहारांमध्येही आपला वाटा नाही , किंबहुना आपल्या वाट्याला अवघे सोळाशे कोटी रुपयांचे बजेट होते असा त्यांचा दावा होता ; पण या स्पधेर्च्या निमित्ताने प्रसिद्धीचा झोत आपल्यावर कायम कसा राहील याची काळजी त्यांनी सातत्याने घेतली . त्याचीच किंमत त्यांनी अटकेतून मोजावी लागत आहे 

WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE

No comments:

Post a Comment