स्फूर्तिस्थळ!
‘देव आणि सैनिक या दोघांचेही आपल्याला केवळ संकट समयीच स्मरण होते. त्या संकटातून त्यांनी तारून नेल्यानंतर देवांचा विसर पडतो आणि सैनिकांची उपेक्षा होते.’ फ्रान्सिस क्वेल याने ईश्वर आणि सैनिक यांची होणारी उपेक्षा अगदी या मोजक्या शब्दात डांबिवलीच्या स्फूर्तीस्थळावर नोंदवली आहे.
पाकिस्तानने 1947, 1965, 1971 व 1999 साली हिंदुस्थानविरुद्ध युद्ध पुकारले, तर 1962 साली चीनने ‘हिंदी-चीनी भाई-भाई’चा नारा देत आपले लाल सैन्य हिंदुस्थानात घुसविले. या सर्व युद्धकुंडात हिंदुस्थानी सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीत नि:स्वार्थी हेतूने देशाचे रक्षण करतेवेळी रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या या सैनिकांचे स्मरण म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथे ‘स्फूर्तीस्थळ’ उभारण्यात आले आहे.
या स्फूर्तीस्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ 1971च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात शत्रू सैन्याची धुळधाण उडविणार्या विजयंता -मेक1 या जातीचा रणगाडा मोठ्या दिमाखात उभा आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या वास्तूमध्ये हिंदुस्थानी जवानांची शौर्यगाथा भित्तीशिल्पांद्वारे जिवंत केली आहे. वाघा बॉर्डरवरील बीएसएफची चौकी व जवानांची प्रतिकृतीदेखील येथे पाहावयास मिळते. या उपक्रमाविषयी कल्याण-डोंबिवलीचे उपायुक्त अजीज शेख यांनी सांगितले की, तरुणांना आपल्या सैन्यदलाच्या देदीप्यमान इतिहासाची ओळख व्हावी तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या संस्थांमध्ये दाखल होणार्या मराठी तरुणांची संख्या वाढावी या हेतूने हे स्फूर्तीस्थळ उभारले आहे. यासाठी पालिकेतर्फे प्रशिक्षण शिबीर राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
पाकिस्तानी सैन्यातील मेजर जनरल अकबर खान या पाताळयंत्री सेनाधिकार्याने ज्याप्रमाणे अरब सेनापती जेबेल तारिक याने स्पेनमधील ‘रॉक ऑफ जेब्राल्टर’ एका रात्रीत जिंकले त्याप्रमाणे 1947 साली श्रीनगर एका दिवसात काबीज करण्याची योजना आखली. यासाठी भाडोत्री टोळीवाले कश्मीरमध्ये घुसविले. डोमेल हस्तगत करून श्रीनगर विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे आठ-नऊ किलोमीटरवर असलेल्या बदगामकडे ही टोळधाड वळली. या ठिकाणी 4 कुमाऊँ या पलटणीच्या एका कंपनीला मोर्चेबांधणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. कंपनीचे नेतृत्व होते मेजर सोमनाथ शर्मा यांच्याकडे. 3 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता त्यांच्या कंपनीला टोळीवाल्यांनी चारही बाजूंनी वेढा घातला. त्यांच्यावर गोळ्यांचा भडिमार व उखळी तोफांचा वर्षाव होऊ लागला. आपला एक हात प्लास्टरमध्ये असतानाही जीवाची तमा न बाळगता शर्मा शत्रूचा प्रतिकार करीत होते. ‘एक गोळी एक शत्रू’ या धर्तीवर शत्रूला टिपत होते. त्याचवेळी अचानक उखळी तोफेचा एक गोळा त्यांच्याजवळ फुटला. काही क्षणातच हा शूर धारातीर्थी पडला. बदगाम शत्रूच्या हाती लागले नाही. या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च शौर्य सन्मान परमवीर चक्र प्राप्त झालेले हिंदुस्थानचे ते पहिले सेनाधिकारी. अशा कितीतरी शौर्यगाथा या स्फूर्तीस्थळात भित्तीशिल्पांमार्फत आपल्याला अनुभवायला मिळतात.
या शूर सेनाधिकार्यांच्या त्यागवृत्तीचे प्रतिबिंब इंडियन मिलिटरी अकादमीच्या चेटवूड सभागृहातील चबुतर्यावर कोरलेल्या पुढील पंक्तीमधून उमटते.
The safety, Honour and welfare of the country come first, always and every time; The Honour, Welfare and comfort of men you command come next, always and every time; Your own ease, comfort and safely come last, always and every time
‘देव आणि सैनिक या दोघांचेही आपल्याला केवळ संकट समयीच स्मरण होते. त्या संकटातून त्यांनी तारून नेल्यानंतर देवांचा विसर पडतो आणि सैनिकांची उपेक्षा होते.’ फ्रान्सिस क्वेल याने ईश्वर आणि सैनिक यांची होणारी उपेक्षा अगदी या मोजक्या शब्दात डांबिवलीच्या स्फूर्तीस्थळावर नोंदवली आहे.पाकिस्तानने 1947, 1965, 1971 व 1999 साली हिंदुस्थानविरुद्ध युद्ध पुकारले, तर 1962 साली चीनने ‘हिंदी-चीनी भाई-भाई’चा नारा देत आपले लाल सैन्य हिंदुस्थानात घुसविले. या सर्व युद्धकुंडात हिंदुस्थानी सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीत नि:स्वार्थी हेतूने देशाचे रक्षण करतेवेळी रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या या सैनिकांचे स्मरण म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथे ‘स्फूर्तीस्थळ’ उभारण्यात आले आहे.
या स्फूर्तीस्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ 1971च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात शत्रू सैन्याची धुळधाण उडविणार्या विजयंता -मेक1 या जातीचा रणगाडा मोठ्या दिमाखात उभा आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या वास्तूमध्ये हिंदुस्थानी जवानांची शौर्यगाथा भित्तीशिल्पांद्वारे जिवंत केली आहे. वाघा बॉर्डरवरील बीएसएफची चौकी व जवानांची प्रतिकृतीदेखील येथे पाहावयास मिळते. या उपक्रमाविषयी कल्याण-डोंबिवलीचे उपायुक्त अजीज शेख यांनी सांगितले की, तरुणांना आपल्या सैन्यदलाच्या देदीप्यमान इतिहासाची ओळख व्हावी तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या संस्थांमध्ये दाखल होणार्या मराठी तरुणांची संख्या वाढावी या हेतूने हे स्फूर्तीस्थळ उभारले आहे. यासाठी पालिकेतर्फे प्रशिक्षण शिबीर राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.पाकिस्तानी सैन्यातील मेजर जनरल अकबर खान या पाताळयंत्री सेनाधिकार्याने ज्याप्रमाणे अरब सेनापती जेबेल तारिक याने स्पेनमधील ‘रॉक ऑफ जेब्राल्टर’ एका रात्रीत जिंकले त्याप्रमाणे 1947 साली श्रीनगर एका दिवसात काबीज करण्याची योजना आखली. यासाठी भाडोत्री टोळीवाले कश्मीरमध्ये घुसविले. डोमेल हस्तगत करून श्रीनगर विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे आठ-नऊ किलोमीटरवर असलेल्या बदगामकडे ही टोळधाड वळली. या ठिकाणी 4 कुमाऊँ या पलटणीच्या एका कंपनीला मोर्चेबांधणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. कंपनीचे नेतृत्व होते मेजर सोमनाथ शर्मा यांच्याकडे. 3 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता त्यांच्या कंपनीला टोळीवाल्यांनी चारही बाजूंनी वेढा घातला. त्यांच्यावर गोळ्यांचा भडिमार व उखळी तोफांचा वर्षाव होऊ लागला. आपला एक हात प्लास्टरमध्ये असतानाही जीवाची तमा न बाळगता शर्मा शत्रूचा प्रतिकार करीत होते. ‘एक गोळी एक शत्रू’ या धर्तीवर शत्रूला टिपत होते. त्याचवेळी अचानक उखळी तोफेचा एक गोळा त्यांच्याजवळ फुटला. काही क्षणातच हा शूर धारातीर्थी पडला. बदगाम शत्रूच्या हाती लागले नाही. या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च शौर्य सन्मान परमवीर चक्र प्राप्त झालेले हिंदुस्थानचे ते पहिले सेनाधिकारी. अशा कितीतरी शौर्यगाथा या स्फूर्तीस्थळात भित्तीशिल्पांमार्फत आपल्याला अनुभवायला मिळतात.
या शूर सेनाधिकार्यांच्या त्यागवृत्तीचे प्रतिबिंब इंडियन मिलिटरी अकादमीच्या चेटवूड सभागृहातील चबुतर्यावर कोरलेल्या पुढील पंक्तीमधून उमटते.
The safety, Honour and welfare of the country come first, always and every time; The Honour, Welfare and comfort of men you command come next, always and every time; Your own ease, comfort and safely come last, always and every time
No comments:
Post a Comment