Total Pageviews

Monday, 25 April 2011

SURESH KALMADI INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 88

SURESH KALMADI INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 88
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/


राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची उधळपट्टी
राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी खासदार सुरेश कलमाडी अखेर गजाआड झाले. सीबीआयने सोमवारी त्यांना चौथ्यांदा चौकशीसाठी बोलावले आणि ताब्यात घेतले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा उघड झाल्यानंतर सात महिन्यांनी सीबीआयला कलमाडी अटकेचा मुहूर्त सापडला. त्यांचे सहकारी आणि स्पर्धेच्या आयोजन समितीचे सरचिटणीस ललित भानोत तसेच महासंचालक व्ही. के. वर्मा हे यापूर्वीच तुरुंगाची हवा खात आहेत. आता त्यांच्या जोडीला कलमाडीही असतील. या महाशयांची अवस्था गेल्या काही महिन्यांतमेरा नंबर कब आयेगा अशीच होती. अखेर त्यांचाही नंबर लागलाच. स्पेक्ट्रम आणि राष्ट्रकुल स्पर्धा हे दोन्ही घोटाळे तसे हातात हात घालूनच बाहेर पडले. मात्र स्पेक्ट्रम घोटाळ्याचे सावट सर्वच बाबतीत गडद होते. त्यामुळे राष्ट्रकुल घोटाळा काहीसा दबला गेल्यासारखा होता. अखेर . राजा यांच्याच मार्गाने आता खासदार कलमाडी यांनाही तुरुंगाचा रस्ता धरावा लागला. कलमाडी यांच्या अटकेमुळे या घोटाळ्याच्या तपासाचा वेग आणखी किती वाढेल हे त्या सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांनाच माहीत. तथापि, कलमाडींच्या अटकेसाठी देव पाण्यात टाकून बसलेल्यांना मात्र आता हायसे वाटले असेल. मग तो मणिशंकर अय्यर असेल किंवा राष्ट्रकुल घोटाळा उघडकीस आणल्याचे श्रेय घेणारे मीडियावाले असतील. सुरेश कलमाडी हे कुणी साव नाहीत किंवा सत्पुरुष नाहीत. त्यांनी केलेल्या घोटाळ्यात जर त्यांची मान अडकत असेल तर ते त्यांच्याच पापाचे प्रायश्‍चित्त असेल.सुमारे ७० हजार कोटी रुपयांची उधळपट्टी या स्पर्धेवर करण्यात आली. या स्पर्धेत अनेक घोटाळे - महाघोटाळे, आर्थिक गैरव्यवहार, घोळ झाले आहेत. स्पर्धेसाठी लागणार्‍या स्टेडियमच्या उभारणीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यावरही प्रश्‍नचिन्ह आहे. स्पर्धेसाठी आणलेल्या विविध उपकरणांची खरेदीही १४ पट जास्त दराने केली गेली. भाड्यापोटी .८० कोटींऐवजी तब्बल ४२.३४ कोटी रुपयांची उधळण करण्यात आली. स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा कलमाडी हेच असल्याने या सर्व घोटाळ्याचा धूर त्यांच्याच नाकातोंडात
जाणार हे स्पष्ट होते. अर्थात, कुठलाही घोटाळा निव्वळ एका व्यक्तीकडून होणे शक्य नसते. त्यात अनेकांचा हातभार लागलेला असतो. स्पेक्ट्रमप्रमाणेच राष्ट्रकुल घोटाळ्याबाबतही पंतप्रधान कार्यालयापासून दिल्लीचे कॉंगे्रस सरकार, राहुल गांधी आणि सोनियांचे जावईबापू वढेरा यांच्यापर्यंत अनेकांकडे अंगुलीनिर्देश झालेच आहेत. स्पर्धा आयोजनात कलमाडींच्या अध्यक्षतेखालील आयोजन समिती आणि सरकारी यंत्रणा यांचा एकत्रित सहभाग होता. त्यामुळे कलमाडी मुख्य आरोपी असले तरी सहआरोपी अनेक असू शकतात.मुख्य आरोपीला अटक करण्याचा मुहूर्त सीबीआयला सात महिन्यांनी सापडला. गुलदस्त्यात असलेल्या सहआरोपींचे काय? ते सीबीआयच्या ताब्यात येणार की कलमाडींच्या अटकेबद्दल स्वत:ची पाठ थोपटून सीबीआय आणि त्यांचे कर्तेधर्ते गप्प बसणार? स्पेक्ट्रम घोटाळ्यात . राजा तुरुंगात गेले. इतरही मासे गेले. करुणानिधींच्या घरापर्यंत हे अटकसत्र जाण्याची चिन्हे आहेत. याच घोटाळ्याचे काही धागे आणि दोरे १०, जनपथच्याबहिणाबाईपर्यंत देखील पोहोचले आहेत. मात्र बोफोर्स प्रकरणातून क्वात्रोचीला सहिसलामत सोडणारी सीबीआय तेथपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमीच. जे स्पेक्ट्रमचे तेच राष्ट्रकुल घोटाळ्याचेही होऊ शकते. या घोटाळ्याचे धागेदोरे फक्त कलमाडींपर्यंत थांबू नयेत. द्रमुककडून दबाव आल्यामुळे कलमाडी आत गेले असे आता सांगितले जाते. कदाचित स्पेक्ट्रम घोटाळ्यात करुणानिधी कन्येविरुद्ध कारवाई करण्यात अडचण येऊ नये यासाठीही कलमाडींविरुद्ध कारवाई केली गेली असू शकते. कारणे काहीही असतील, पण कलमाडींच्या हातात अखेर बेडी पडली. कॉंग्रेसच्यामाडीवरून हे महाशय खाली उतरले आणि दिल्लीच्या कोठडीत रवाना झाले. कॉंग्रेस ही नाहीतरीमाडी आहे. वापरायचे आणि फेकून द्यायचे. कलमाडींचे आता तेच झाले. कॉंग्रेस पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. थोडक्यात त्यांच्यावरील आरोपांना त्यांनाच तोंड द्यायचे आहे. टायमिंग आणि स्कोअरिंग मशीन्सच्या खरेदीमध्ये कलमाडींनी घोटाळा केल्याचा सीबीआयचा दावा आहे. या मशीन्सच्या खरेदीचे कंत्राट देताना कलमाडींनी स्वीस कंपनीवर खास मेहेरनजर दाखवली. केवळ ४९ कोटी रुपयांचे काम या कंपनीने केले असताना कलमाडींनी तब्बल १४१ कोटी रुपये या कंपनीला बहाल केले. शिवाय राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी आशीष पटेल यालाच कलमाडींविरुद्ध माफीचा साक्षीदार बनवण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे. या पटेलला कलमाडींच्या घोटाळ्यांची इत्थंभूत माहिती आहे, असे म्हणतात. सीबीआयच्या म्हणण्यात तथ्य असेल तर कलमाडींचा कोठडीतील मुक्काम चांगलाच लांबू शकतो. कर्नाटकातील उडुपी या गावातून पुण्यात आलेल्या कलमाडींचाउडुपी ते तिहार जेल हा साराच प्रवास मोठा चमत्कारिक आहे. १९६५ आणि ७१ च्या युद्धांच्या वेळी कलमाडी एअरफोर्समध्ये होते. या दोन्ही युद्धात सहभागी होताना कलमाडींनी शत्रूच्या हद्दीत घुसून मोठा पराक्रम केला असे म्हणतात. त्याबद्दल विशेष शौर्याचा पुरस्कारही त्यांना मिळाला. पण हेच कलमाडी पुढे राजकारणात आले आणि पुरते बिघडले. खासदार झाले, मंत्री झाले, ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षही झाले. यशाची ही धुंदी त्यांना टिकवता आली नाही. खेळाच्या क्षेत्रात पैशाचा खेळ मांडून कलमाडींनी क्रीडा क्षेत्राची बदनामी केली. राष्ट्रकुल घोटाळ्याने केवळ कलमाडींचीच नव्हे तर जगभर हिंदुस्थानचीभ्रष्टाचार्‍यांचा देश अशी वाईट प्रतिमा निर्माण केली. कलमाडींना त्यांच्या पापाची फळे आज मिळाली. प्रश्‍न आहे तो इतर घोटाळेबाजांचा. ‘मी नाही त्यातला म्हणणार्‍या कलमाडींनी नंतरमी एकटा नाही असा आरोप केला होताच. ते एकटे नसतील तर त्यांच्या सोबतचेदुकटे कोण आहेत याबाबत ते आता तरी तोंड उघडणार आहेत का? राष्ट्रकुल घोटाळ्यात कलमाडींचा नंबर लागला, यापुढे कोणाचे लागणार आहेत? पुन्हा या अटकासटकांमुळे घोटाळेबाजांनी बुडविलेल्या देशाच्या हजारो कोटींची वसुली होणार आहे का? प्रश्‍न अनेक आहेत. तूर्त कलमाडींना अटक होणार का, या प्रश्‍नाचे उत्तर सीबीआयने दिले आहे. इतर उत्तरे सीबीआयकडून मिळणार की इतर घोटाळ्यांप्रमाणे ती गुलदस्त्यातच राहणार हादेखील एक प्रश्‍नच आहे

No comments:

Post a Comment