गुन्हेगार स्विस बँका
SURESH KALMADI VS ANNA HAJARE -INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 98
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/ स्विस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत असे विधान विकिलीक्सचे प्रमुख ज्युलियन असांज यांनी केल्यामुळे पुन्हा एकदास्विस बँकेतील बेकायदा खात्यांचा व त्यात असलेल्या काळ्या पैशाचा प्रश्ान् ऐरणीवर आला आहे. विकिलीक्सने अलीकडे अमेरिकन केबल उघड केल्या आहेत, तसेच स्विस बँकांच्या व्यवहाराबाबत बरीच माहिती आपल्याकडे आहे असे म्हटले आहे. अर्थात विकिलीक्सने स्विस बँकांतील खात्यांबाबतचा कोणताही तपशील अद्याप उघड केला नाही, त्यामुळे थेट असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. परंतु स्विस बँकांत जगभरातला बेहिशेबी पैसा जमा होत असतो व हा पैसा जमा करणाऱ्या खातेदारांची माहिती गुप्त ठेवली जाते ही जगजाहीर गोष्ट आहे. या बँकांत अनेक भारतीयांची खाती आहेत याची चर्चा पूर्वापार होत आली आहे. स्वित्झर्लंडमधील अशा बँकांना संरक्षण देणारे कायदे आणि भारत सरकारची असमर्थता यामुळे आजवर अशा खात्यांची चर्चा करण्यापलीकडे फार काही करता आले नाही. पण अलीकडे जागतिक दहशतवादाला मिळणारा पैसा स्विस बँकांत साठविला जातो असा तर्क मांडल्या गेल्यानंतर जगातील सर्वच देशांचे डोळे खाडकन उघडले आहेत. दहशतवादी संघटना आपल्या घातपाती कारवायांसाठी बेकायदा व बेनामी व्यवहारांतून काळा पैसा निर्माण करतात आणि तो बहुदा स्विस बँकांत साठवतात अशी चर्चा सुरू झाल्यामुळे अनेक देशांची स्विस बँकांकडे खप्पा नजर वळली आहे. त्यामुळेच जर्मन सरकारने या बँकांतील जर्मन खातेदारांची माहिती उघड करण्यासाठी स्विस बँकांवर दबाव आणला आहे. जागतिक दहशतवादाला मिळणारा पैसा स्विस बँकांत आहे अशी कुणकुण लागल्यानंतर अमेरिकेनेही स्वीस बँकाच्या गुप्ततेबाबतचे कायदे बदलण्यासाठी स्विस सरकारवर दबाव आणला आहे. भारतीयांच्या गुप्त खात्यांबद्दल गेली अनेक वषेर् चर्चा चालू असूनही भारत सरकार या खात्यांची माहिती मिळावी यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नाही हे मात्र आश्चर्यजनक आहे. ज्युलियन असांज यांनी भारतीयांच्या गुप्त खात्यांविषयी केलेली विधाने असत्य आहेत अशी भारत सरकारची खात्री असेल तर त्याने तसे स्पष्ट करणे आवश्यक आहे. पण भारत सरकार तसे करणार नाही; कारण स्विस बँकांत भारतीयांची खाती असावीत असे मानण्यास परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्यामुळे भारताने स्विस बँका व स्विस सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आज भारताची आथिर्क शक्ती वाढलेली आहे, त्यामुळे स्विस सरकारच्या नाड्या आवळणे सोपे झाले आहे. अनेक देशांत कर चुकवणे हा गुन्हा असताना स्विस सरकारने या गुन्ह्याला संरक्षण देणे हे सध्याच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेशी विसंगत आहे. स्विस सरकारचे हे कृत्य म्हणजे 'चोरी'चा गुन्हा कायदेशीर ठरविण्यासाखे तर आहेच, पण चोरीचा माल विकत घेण्यासारखेही आहे. थोडक्यात, गुन्हेगारी कृत्याला कायदेशीर स्वरूप देऊन स्वित्झर्लंड हेच एक गुन्हेगारी राष्ट्र झाले आहे. सोमालियन चाच्यांना मिळणारा पैसाही स्विस बँकेत ठेवला जात असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सोमालियन चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या खलाशांना सोडण्यासाठी होणाऱ्या वाटघाटी व आथिर्क व्यवहार युरोपीय देशांत होतो. या व्यवहारात व चचेर्त युरोपीय देशांतले काही डॉन भाग घेतात हे आता स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, जगातील अनेक आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना स्विस बँकांमुळे प्रोत्साहन मिळत आहे. ज्युलियन असांज यांचा आक्षेप हा सर्वच प्रकारच्या गुप्ततेवर आहे, त्यामुळेच त्यांनी स्विस बँकांतील गुप्त खात्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. असांज खरे की खोटे हा प्रश्ान् नसून स्विस बँका अन्य देशांतील काळ्या व्यवहारांना संरक्षण का देत आहेत हा प्रश्ान् महत्त्वाचा आहे. भारतात विरोधी पक्षांनी या प्रश्ानचे राजकारण करण्याची काहीही आवश्यकता नाही. भारतीय जनता पक्षाला त्यांच्या कारकीदीर्त स्विस बँकांवर दडपण आणून ही खाती उघड करता आली असती, पण त्यांनी त्यावेळेस हे केले नाही. आता त्या पक्षाला खरेच ही खाती उघड व्हावीत असे वाटत असेल तर त्यांनी स्विस दूतावासावर मोर्चा काढून स्विस सरकारवरील दडपण वाढवले पाहिजे. अमेरिकेसह जगातील अनेक देश आता स्विस सरकारवर यासाठी दडपण आणीत आहेत. स्वीडनमधील बँकिंग प्रणाली ही गुन्हेगारीला व करचुकवेगिरीला प्रोत्साहन देणारी आहे व त्यामुळे जगातील अनेक देशांत गुन्हेगारी, दहशतवाद व अराजक माजू शकते. स्विस सरकारचे हे कृत्य दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानपेक्षाही अधिक गंभीर स्वरूपाचे आहे. पश्चिम आशियातील अरब देशांत जनअसंतोष माजल्यानंतर तेथील अनेक सत्ताधीशांनी आपल्या देशातील संपत्तीची लूट करून ती स्विस बँकांत साठवली असावी असा अंदाज आहे. ही संपत्ती त्या देशांना परत मिळणे आवश्यक आहे. जगात नि:शस्त्रीकरणाची चर्चा होते व त्यावर सहमतीही होते, तशीच चर्चा स्विस बँकांच्या व्यवहारांवर झाली पाहिजे व या बँका बंद करण्यासाठी जागतिक दडपण वाढले पाहिजे. ज्युलियन असांज यांनी स्विस बँकांविरुद्ध जी मोहीम सुरू केली आहे ती स्वागतार्ह आहे ती यामुळेच
No comments:
Post a Comment