Total Pageviews

Thursday, 28 April 2011

शंभर कोटी रुपये भरपाई देण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीला आदेश

बदनामीप्रकरणी शंभर कोटी रुपये भरपाई देण्याचेटाइम्स नाऊ वाहिनीला आदेश पुणे, २६ एप्रिल / प्रतिनिधी गाझियाबाद येथील भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे निवृत्त न्यायाधीश पी. के. सामंत यांचा समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी न्या. सावंत यांना शंभर कोटी एवढी नुकसानभरपाईटाइम्स नाऊ या खासगी वृत्तवाहिनीने द्यावी, असा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही. के. देशमुख यांनी आज दिला.बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयीन क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रचंड रकमेची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला गेल्याचे बोलले जाते आहे. गाझियाबाद येथे भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत घोटाळा झाल्याप्रकरणीटाइम्स नाऊ वाहिनीने १० सप्टेंबर २००८ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात कोलकाताचे माजी न्यायाधीश पी. के. सामंत यांचा घोटाळ्यात समावेश असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात त्या वृत्तात छायाचित्र मात्र न्या. पी. बी. सावंत यांचे प्रसिद्ध केले होते.

No comments:

Post a Comment