NATIONAL SECURITY IS A MOVEMENT WHICH MUST REACH ALL PATRIOTIC INDIANS
PASS IT ON TO ALL YOUR FRIENDS & RELATIONS
प्रत्येक गावातून घरटी एक मुलगा किंवा मुलगी चळवळीत सामावून घेण्याची सक्ती नक्षलवाद्यांकडून गडचिरोली - हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, सरकारची रोजगारासंबंधीची कोणतीही योजना गावातील युवकांपर्यंत पोचत नाही. नक्षलवाद्यांच्या बंदुकीच्या धाकापुढे पिढ्यान्पिढ्या पिचल्या जाणाऱ्या आदिवासींचे काही चालत नाही. नक्षलवाद्यांकडून होणारा जुलूम असह्य झाल्याने विकासाचा लवलेश नसलेल्या दुर्गम भागातील युवापिढी नक्षलवाद्यांच्या दलम्चा मार्ग आपसूकच स्वीकारते. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक गावातून घरटी एक मुलगा किंवा मुलगी चळवळीत सामावून घेण्याची सक्ती नक्षलवाद्यांकडून केली जाते. "नाही तर उचलून नेऊ' अशी धमकी देणारे नक्षलवादी नव्या पिढीला कारवायांचे बाळकडू वयाच्या आठव्या वर्षापासून देत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
चळवळीला मनुष्यबळ मिळावे यासाठी लहान मुलांवर अठरा दलम्चे नक्षलवादी लक्ष केंद्रित करायला सुरवात करतात. गोरगरीब आणि आदिवासींच्या हक्कासाठीच शस्त्र उचलतो आहोत, असे भावनिक आवाहन करून त्यांना नक्षलवादी कारवायांत ओढून घेतले जाते. हे जंगल आहे, त्याच्यावर फक्त आपलाच अधिकार आहे, अशी भावनाही चौथी, पाचवीत असल्यापासूनच मुलांच्या मनावर ठसविली जाते. लहान मुलांना नक्षलवादाकडे आकृष्ट करण्यासाठी त्यांचे मतपरिवर्तन करणारे वेगवेगळे गट नक्षलवाद्यांनी तयार केले आहेत. बाल, विद्यार्थी आणि युवासंघटन तयार करून त्यातून नक्षलवादाचे धडे गिरवले जातात. चेतना नाट्य मंच, दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन या गटांच्या माध्यमातून आदिवासी मुला-मुलींना नक्षलवादी कारवायांसाठीची कवाडे उघडी केली जात असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगतात. गरिबांच्या हातात अधिकार असावा, अशा भूमिकेची पथनाट्ये गावागावांत करून दाखविली जातात. युवावर्गाला नक्षलवादाकडे आकर्षित करण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग असल्याचे सांगितले जाते. नक्षलवाद्यांचे एरिया रक्षक दल, ग्राम रक्षक दल, स्पेशल झोन कमिटीकडे १० ते १६ वर्षांच्या मुला-मुलींना नक्षलवादी कारवायांसाठी तयार करण्याची जबाबदारी सोपविली जाते. अनेक प्रयत्नांअंती नक्षलवादाकडे वळण्याची इच्छा नसलेल्या तरुण, तरुणींची मने वळविण्यापेक्षा त्यांना बंदुकीच्या धाकाने लहान-मोठी कामे सांगायची. पाणी आणणे, जेवण देणे अशी कामे करवून घेताना या मुलांबद्दल हस्ते-परहस्ते नक्षलवाद्यांसोबत काम करीत असल्याबाबतची चर्चा गावात घडवून आणायची. गावात चर्चा होऊ लागल्यानंतर या तरुणांना पोलिसांकडून त्रास द्यायला सुरवात होते. नक्षलवाद्यांशी आलेल्या अशा कथित संपर्कामुळे कितीतरी तरुणांना नाहक पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते. नक्षलवादी चळवळीत मुलींची वाढती गरज लक्षात घेता त्यांना नक्षली दलांत सहभागी करून घेण्यावर भर दिला जात आहे.
नक्षलवाद्यांकरिता स्वयंपाक तयार करून देणे, कधी पोलिसांशी सशस्त्र मुकाबला करणे, तर कधी दलम्मधील काही नक्षलवाद्यांची शारीरिक भूक भागविण्यासाठी या मुलींचा वापर होतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पन्नावारा येथे झालेल्या पोलिस चकमकीत तिगापड दलमची शकुंतला गणू बड्डे ही अवघी सोळा वर्षांची गर्भवती नक्षलवादी मारली गेली. या घटनेनंतर नक्षलवाद्यांकडून महिलांच्या होणाऱ्या पिळवणुकीच्या घटना अधोरेखित होऊ लागल्या.
"काहीही करून इथल्या सरकारने इथल्या युवावर्गाला रोजगार उपलब्ध करून द्यावा. नाहीतर दिवसेंदिवस ही समस्या आणखीनच चिघळेल' अशी विनवणी वीस वर्षे नक्षलवादी म्हणून काम केलेल्या रघू ऊर्फ बालमसाय लालसाय सडमेक या भामरागडच्या हिंदेवाडा येथील शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्याने "सकाळ'शी बोलताना केली. नक्षलवाद्यांचा स्टेट कंपनी मेंबर म्हणून काम केलेला रघू त्यांच्या पॉलिट ब्युरोतील नेत्यांसोबत अनेक वर्षे काम करीत होता. गेल्या वीस वर्षांत चळवळीचे बदलते स्वरूप आपण पाहिले आहे. आता नक्षलवादाकडे वळणे म्हणजे जीवन व्यर्थ घालविण्यासारखे आहे.

No comments:
Post a Comment