प्रशिक्षणार्थी पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्कार सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर - प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून प्रशिक्षणार्थी पोलिस कॉन्स्टेबल महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल युवराज मारुती कांबळे (वय 32, रा. पोलिस मुख्यालय पोलिस लाईन) याला आज अटक केली. याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान त्याच्याविरोधात तक्रारी असल्यामुळे त्याला यापूर्वीच निलंबित केल्याचेही शहर पोलिस उपअधीक्षक महेश सावंत यांनी सांगितले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज कांबळेकडे महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम आहे. नुकत्याच भरती झालेल्या किंवा बढतीवर आलेल्या महिला कॉन्स्टेबलना तो पोलिस मुख्यालयात प्रशिक्षण देतो. यातूनच त्याने त्यांचा गैरफायदा घेऊन काही मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या. त्यातून त्याला यापूर्वी निलंबितही करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्याने एका कॉन्स्टेबल महिलेला प्रश्नपत्रिका देतो म्हणून स्वतःच्या घरी बोलविले. कांबळे हा विवाहित असल्यामुळे संबंधित कॉन्स्टेबल महिला त्याच्या घरी गेली. मात्र त्यावेळी कांबळेची पत्नी घरी नव्हती. त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर एका निनावी पत्राने ती गर्भवती असल्याची माहिती पोलिसांकडे आल्यामुळे यानंतरही याचा तपासही सुरू झाला. दरम्यान तिचा गर्भपातही केल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली. तसेच संबंधित महिलेला एका वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरकैदेत ठेवल्याचे समजते. यामुळे पोलिसांत एकच खळबळ उडाली असून याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न सर्वच पातळीवरून झाला. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरीही हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. याचे कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबतचा कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचेच शाहूपुरी पोलिस ठाण्यातून रात्री उशिरापर्यंत सांगितले जात होते. याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर गुन्ह्याची वस्तूस्थिती पुढे आली.अधिकाऱ्यांवरील कारवाईचे काय ?या प्रकारात एका पोलिसावर कारवाई झाली असली तरीही आणखी काही वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यात गुंतले असल्याची चर्चा पोलिस वर्तुळातच आहे. मात्र त्यांना कारवाईपासून लांब ठेवण्यासाठी एका हेड कॉन्स्टेबलपुरतीच ही कारवाई थांबली असल्याची चर्चा आहे. मात्र एका कॉन्स्टेबल मुलीची तक्रार आली असली तरीही आणखी काही कॉन्स्टेबल मुली या प्रकरणात भरडल्या गेल्याची माहिती पुढे येत आहे.मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?काही पोलिस अधिकाऱ्यांच्या कक्षात जाण्याचा धसकाच महिला पोलिसांनी घेतला असल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलिस वर्तुळात सुरू आहे. हे अधिकारी या ना त्या निमित्ताने महिला पोलिसांना वारंवार आपल्याकडे बोलवितात. काही अधिकारी मुद्दाम घरी बोलवतात. मध्यंतरी या संदर्भात काही महिला पोलिसांनी बंडाचा पवित्राही घेतला होता. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचे धाडस कोणाकडेच नसल्याने हे प्रकरण या थरापर्यंत पोचले.मसाज' दडपलं...एका पोलिस अधिकाऱ्याचे "मसाज' प्रकरण याच गुन्ह्याच्या पठडीतील होते. ब्युटी पार्लर महिलेचे लैंगिक शोषण एका अधिकाऱ्याने केल्याची जोरदार चर्चा होती. एका कॉन्स्टेबलच्या मध्यस्थीने हा प्रकार घडला होता. मात्र संबंधित महिलेने तक्रार देण्याची धमकी दिल्यावर हा प्रकार थांबला. आजच्या या प्रकारामुळे "मसाज' प्रकरणाची चर्चा होती.सीबीआय चौकशी करा
महिला पोलिसावर अत्याचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ब्लॅक पॅंथर पक्षाने केली आहे. ज्या पीडित महिलेने तक्रार केली आहे ती मुळात वरिष्ठांच्या दबावाखाली दिली आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. ब्लॅक पॅंथरने यापूर्वी वेळोवेळी महिला आणि दलितांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हे प्रकरण अधिक गंभीर असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. दोषींवर कारवाई केली नाही तर मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करण्याचा इशाराही पत्रकात दिला आहे. पत्रकावर जिल्हा युवक अध्यक्ष संजय गुदगे, शहर युवा अध्यक्ष प्रशांत वाघमारे, शहर उपाध्यक्ष सुभाष कापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
"
महिला पोलिसावर अत्याचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ब्लॅक पॅंथर पक्षाने केली आहे. ज्या पीडित महिलेने तक्रार केली आहे ती मुळात वरिष्ठांच्या दबावाखाली दिली आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. ब्लॅक पॅंथरने यापूर्वी वेळोवेळी महिला आणि दलितांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हे प्रकरण अधिक गंभीर असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. दोषींवर कारवाई केली नाही तर मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करण्याचा इशाराही पत्रकात दिला आहे. पत्रकावर जिल्हा युवक अध्यक्ष संजय गुदगे, शहर युवा अध्यक्ष प्रशांत वाघमारे, शहर उपाध्यक्ष सुभाष कापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
"
No comments:
Post a Comment