VOTE BANK POLITICS & AFZAL
‘
NATIONAL SECURITY IS A MOVEMENT WHICH MUST REACH ALL PATRIOTIC INDIANS http://brighemantmahajan.blogspot.com/
नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंस्था) - संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार महंमद अफझल गुरू याला फासावर लटकवायचे की त्याला माफी द्यायची या मुद्यावरून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट ‘विकिलिक्स’ने केला आहे. अफझल गुरूला फासावर लटकवले तर देशभरातील मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भयाने कॉंग्रेसला पछाडले होते, असा गुप्त संदेश हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाच्या अधिकार्याने अमेरिकन सरकारला पाठवला होता. त्या गोपनीय दस्तावेजाचा भंडाफोड करतानाच मुस्लिम मतांसाठीच कॉंग्रेसने अफझलची फाशी लटकवल्याचे ‘सत्य’ही ‘विकिलिक्स’ने उजेडात आणले आहे. महासत्ता अमेरिकेची असंख्य गुपिते फोडून चर्चेत आलेल्या विकिलिक्सने कॉंग्रेस पक्षाचाही खरा चेहरा जनतेसमोर आणला आहे. हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाचे अधिकारी जेफरी पॅट यांनी २० ऑक्टोबर २००६ रोजी कोड क्र. ८२६३८ या ‘केबल’द्वारे आपल्या सरकारला गोपनीय संदेश पाठवला. राष्ट्रपती डॉ. कलाम आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात कशी खुन्नस निर्माण झाली आहे त्याविषयीचा हा गुप्त संदेश आहे. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार मोहंमद अफझल गुरू याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अफझलला फासावर लटकवण्यासाठी २० ऑक्टोबर २००६ हा दिवस न्यायालयाने मुक्रर केला होता. बरोबर याच दिवशी जेफरी पॅट यांनी अमेरिकन सरकारला पाठवलेला हा गोपनीय संदेश विकिलिक्सने सार्वजनिक केला आहे.अफझलच्या फाशीवरून सोनिया गांधी आणि राष्ट्रपती कलाम यांच्यात तीव्र स्वरूपाचे मतभेद निर्माण झाले होते. जम्मू-कश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा अफझलला फासावर लटकवण्यास विरोध तर होताच शिवाय त्याला माफी दिली जावी, अशी शिफारस गुलाम नबी यांनी केली होती. सोनियांकडेही त्यांनी माफीचा आग्रह धरला होता. राष्ट्रपती कलाम आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये अफझल गुरूच्या याच मुद्यावरून तीव्र मतभेद निर्माण झाले होते, असे विकिलिक्सने पॅट यांच्या गोपनीय संदेशाचा हवाला देऊन म्हटले आहे.सोनिया गांधी आपल्याला दुसर्यांदा राष्ट्रपती होऊ देणार नाहीत असे राष्ट्रपती कलाम यांना वाटले तर ते अफझल गुरूचा हाच मुद्दा योग्यवेळी जनतेसमोर आणून कॉंग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील’’, असा उल्लेख पॅट यांनी या संदेशात केला आहे.अफझल गुरूला फाशी देण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेसचा राजकीय गोंधळ उडाल्याचे नमूद करून पॅट यांनी या संदेशात म्हटले आहे की, २००७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आहेत. त्याआधी यूपीए सरकारने अफझल गुरूला माफी दिली तर भाजप नेते देशाच्या सुरक्षेशी कॉंग्रेसने समझोता केल्याचा आरोप करतील, अशी कॉंग्रेसला भीती होती. दुसरीकडे अफझल गुरूला फासावर लटकवावे तर कॉंग्रेसच्या पाठीशी असणारी मुस्लिमांची व्होट बँक कॉंग्रेसची साथ सोडून देईल याचेही भय कॉंग्रेसला वाटत असल्याचे कॉंग्रेसच्याच एका नेत्याने आपणास सांगितल्याचेही पॅट यांनी या गुप्त संदेशात म्हटले आहे. या राजकीय गोंधळामुळेच कॉंग्रेसने अफझलच्या फाशीचा निर्णय लांबवला. राष्ट्रपती कलाम यांच्याकडून आलेल्या अफझल गुरूच्या दयेच्या अर्जावर कोणताही निर्णय न घेता आजतागायत हा अर्ज सरकारकडेच पडून आहे. अलीकडेच स्वत: गृहमंत्री चिदंबरम् यांनीच संसदेत अफझलच्या दयेचा अर्ज अद्याप राष्ट्रपतींकडे पाठवलेलाच नाही, अशी कबुली दिली होती हे येथे उल्लेखनीय होय.विकिलिक्सने केलेल्या या दंभस्फोटामुळे कॉंग्रेसची चांगलीच अडचण झाली आहेत ‘‘
‘
PASS IT ON TO ALL YOUR FRIENDS & RELATIONS
विकिलिक्स’चा खळबळजनक गौप्यस्फोट ;मुस्लिम मतांसाठीच कॉंगेसने अफझलची फाशी लांबवली!अफझलच्या माफीवरून सोनिया-कलाम यांच्यात तीव्र मतभेद झाले होतेNATIONAL SECURITY IS A MOVEMENT WHICH MUST REACH ALL PATRIOTIC INDIANS http://brighemantmahajan.blogspot.com/

No comments:
Post a Comment