पोलिसांनीच अत्याचार, बलात्कार केल्याच्या सात घटना घडल्या आहेत. कोल्हापूर - जिल्हा पोलिसप्रमुख यशस्वी यादव यांची येत्या 48 तासांत अन्यत्र बदली करून प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांवरील अत्याचाराची चौकशी करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या नाशिकच्या अतिरिक्त पोलिसप्रमुख मैथिला झा यांची कार्यशैली वादग्रस्त असल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या ज्येष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून त्याची जबाबदारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वीकारावी किंवा राजीनामा द्यावा. या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांवर अत्याचार प्रकरणासंबंधी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे आज कोल्हापूरला आले. त्यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर, जिल्हा पोलिसप्रमुख यशस्वी यादव यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची माहिती घेतली.श्री. खडसे म्हणाले, ""महाराष्ट्रातील कायदा व सुवस्था संपूर्ण ढासळली असून राज्य बिहारपेक्षा खालच्या क्रमांकावर गेले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत राज्यात गेल्या वर्षी 1585 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनीच अत्याचार, बलात्कार केल्याच्या सात घटना घडल्या आहेत. कोल्हापुरातही प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांवर अत्याचार केल्याच्या तक्रारी आल्या आहे. अत्याचारित महिला पोलिसाने मला यासंबंधीची माहिती दिल्यावर मी लगेचच पोलिस महासंचालक व जिल्हा पोलिसप्रमुखांना सूचना दिल्या होत्या. त्यावेळी लेखी तक्रार नसल्याने चौकशी करता येत नसल्याचे सांगण्यात आले होते. वास्तविक वरिष्ठांनी तोंडी तक्रारीवर चौकशी करायला हवी होती. प्रशिक्षणार्थींना अपवाद वगळता ड्यूटी देऊ नये, असे शासनाचे धोरण आहे. परंतु या ठिकाणी महिला प्रशिक्षणार्थींना बंगल्यावर ड्यूटी लावल्याचे दिसते. हे आदेश कोणी दिले याचा शोध घ्यावा.''चौकशीसाठी नियुक्त केलेल्या अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख मैथिली झा यांची कार्यशैलीच वादग्रस्त आहे. नाशिक येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याला त्यांनी स्थगिती घेतली आहे. त्यांची कार्यशैली वादग्रस्त असल्याने त्यांच्याकडे ही चौकशी द्यायला नको होती, असेही श्री. खडसे यांनी सांगितले.चौकशी निष्पक्ष व्हायची असेल तर संशयाची सुई असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करावी. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी अकरा महिला पोलिसांवर अत्याचार केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेऊन तपास करावा. खासदार मंडलिक यांनीही त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना द्यावी. पोलिसांकडून निष्पक्ष चौकशी होईल अशी शक्यता नाही त्यामुळे सामाजिक संघटनेचा महिला प्रतिनिधी घ्यावा. चौकशी कमीत कमी कालावधीत पूर्ण करावी, अशा मागण्याही श्री. खडसे यांनी केल्या.शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी संवेदनाहीन पद्धतीने सुरू आहे. प्रशिक्षणाच्या ठिकाणी समिती असणे आवश्यक आहे. या ठिकाणी श्रीमती मकवाना या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती होती, असे सांगण्यात आले असले तरी त्यात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश नाही. त्यामुळे तक्रार नोंदवण्याची यंत्रणाच नाही. केवळ गर्भपात झाला नाही म्हणजे महिलांवर अत्याचार झाला नाही असे होत नाही. लैगिक शोषण झाले असण्याची शक्यता आहे. सामाजिक संघटनांच्या काही महिलांची नावे दिली असून त्यांच्यापैकी दोन महिलांचा समावेश चौकशी समितीत करावा. सरसकट सर्व महिलांची बदनामी होणार नाही याची खबरदारी घेत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. जिल्हा पोलिसप्रमुख यशस्वी यादव यांच्या भोवती संशयाची सुई असल्याने त्यांना 48 तासांत हलवून चौकशी करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही डॉ. गोऱ्हे यांनी दिला. यावेळी आमदार गिरीष बापट, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार संभाजीराव पोवार, नीता केळकर आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिक्रिया ऐसे पोलीस अधिकारी को रस्ते पे लाकर मारणा चाहिय. कोल्हापूर मी हुये एस घटना से सरकार ने कूच तो शीख लेणी चाहिये. दोषी को नोकरी से निकालना चाहिये. इस घटना से हमारी संस्क्रती कि हार हो गयी ही. महिला को उनका आदिकर देणा चाहिये वैसे उनोने भी चीनाना चाहिये. पोलीस वाले असली पण मजा करत असतील असे वाटले नवते स्वत:च्या च दिपार्त्मेंत मधल्या स्त्रियांना हे मुन्नी आणि शीला समजतात , यांच्या "दरबारात" दाद मागायला जाणार्या असहाय स्त्रियांना हे काय करत असतील कुणास ठावूक ? पण काय करणार आपण गरीब असहाय लोक आहोत आणि हे राजे आहेत , ब्रिटीशांची गुलामगिरी परवडली पण स्वकियांकडून शोषण नको कारण गुलाम गिरी मध्ये मान खाली घालून तरी जगता येत होते आता अक्षर्श: आपली अवस्था उकिरड्यावर फेकलेल्या अर्भाकांसारखी आहे
On 29/04/2011 12:48 AM satish patil said:
On 29/04/2011 01:21 AM vishal patil said:
On 29/04/2011 12:48 AM satish patil said:
On 29/04/2011 01:21 AM vishal patil said:
No comments:
Post a Comment