Total Pageviews

Monday 20 January 2020

सायबर सुरक्षा – उपयुक्त टिप्स-NAVSHAKTI-– उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

टीसीजीएन -Take Care Good nigh, या नावाचा एक मराठी चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. त्यातून नवीन इलेक्ट्रॉनिक संपर्क साधने आणि आर्थिक व्यवहार याविषयी बर्‍यापैकी प्रबोधन केले होते. तो चित्रपट असल्याने खात्यातून गायब झालेली जन्माची पुंजी अखेर मूळ मालकाला प्राप्त झाली. मात्र प्रत्यक्ष अनुभव खूप त्रासदायक आणि वेगळा असू शकतो.
सन 2021पर्यंत भारतातील 73 कोटी लोक इंटरनेट वापरतील असतील, असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील 70 टक्के व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसऍप, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करताना अनेक साध्या साध्या गोष्टीतून आपण आपली खाजगी माहिती जाहीर करीत असतो. यातून आपल्या संबंधीच्या एक एक बारीकसारीक माहितीचा तपशील एकत्र होऊन त्यावर झटकन पृथक्करण करून एक अहवाल तयार होत असतो. याचा उपयोग प्रामुख्याने मार्केटिंगसाठी करण्यात येतो. याचा सदुपयोग करणारे लोक जसे आहेत तसाच दुरुपयोग करणारे लोक आहेत.
काळाबरोबर राहायचे म्हणजे या गोष्टी आपण टाळू शकत नाही. अनेकदा नव्हे प्रत्येकवेळी आपणच ही माहिती कळत नकळत जाहीर करत असतो. तेव्हा ही माहिती सुरक्षित कशी ठेवावी याची माहितीही आपल्याला असणे आवश्यक आहे. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, तरी सर्व सामान्य वापरकर्त्यांना स्वहित रक्षण करण्यासाठी सजग आणि शिक्षित व्हायला हवेच. त्याला पर्याय नाही. म्हणून काही टिप्स :
  • आपले सायबर संबंधित कोणतेही खाते योग्य लॉगइन आयडी पासवर्ड टाकूनही किंवा पासवर्ड विसरल्यास तो नव्याने मिळवता येत नसल्यामुळे आपल्याला वापरता न येणे म्हणजे हॅकिंग.
  • सार्वजनिक वाय फाय (रेल्वे स्टेशन, हॉटेल, मॉल) तात्पुरते जॅम करून अल्पावधीत तशाच प्रकारचे आपले स्वतंत्र नेटवर्क निर्माण करून (Man Of Middle Attack) आपली माहिती चोरली जाते. त्यामुळे आपण नक्की कोणते नेटवर्क नेमके वापरतोय तेच समजत नाही. तेव्हा यावर उपाय हाच,की सार्वजनिक वायफायचा (अगदी विमानतळावरील सुद्धा) वापर शक्यतो करू नये. तिथून खरेदी अगर आर्थिक व्यवहार नकोतच. शक्यतो स्वतःचे नेटवर्क वापरावे.
  • दुसर्‍याचा कम्प्युटर/मोबाईल वापरून आपले व्यवहार शक्यतो करू नयेत. यामध्ये आधीच टाकलेल्या संगणक प्रणालीच्या साहाय्याने आपली महत्त्वाची माहिती युजरनेम/पासवर्ड चोरीस जाऊ शकतो.
  • आपले प्रत्येक खाते सुरू करण्यासाठी एकदा वापरता येईल असा तात्पुरता सांकेतिक क्रमांक मिळतो (OTP).ही अतिशय चांगली सोय असून (Two Factor Authentication) यामुळे आपला लॉग इन आय डी व पासवर्ड समजूनही हे खाते चालू करता येऊ शकत नाही. अनेक लोकांना गुगलने अशी सोय उपलब्ध करून दिली आहे याची माहितीच अनेकांना नसते.
  • आपण सहज विश्वासाने जी माहिती देतो; (उदा. फीडबॅक फॉर्म, व्हिजिटर रजिस्टर, ऍप डाऊनलोड करताना दिलेल्या परवानग्या) तिचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
  • ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूच्या पॅकेटवरील नाव, नंबर, पत्ता आपण सहजपणे टाकून देतो; तो कुणाच्या हाती लागणार नाही, अशा प्रकारे खोडूनच टाकायला हवा.
  • डियर कस्टमर, डियर क्लायंट, डियर यूजर या संबोधनाने येणारे मेल हे ‘फेक’ असण्याची अधिक शक्यता असल्याने त्यांना उत्तर न देता नष्ट करावेत.
  • http: ने सुरू होणार्‍या सुरक्षिततेचे निळे कुलूप असलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. व्यवहार करताना Encrypted Payment Gatewayचा वापर करावा. हा अतिशय सुरक्षित मार्ग असून तो सीलबंद पाकिटासारखा आहे.
  • सोशल इंजिनिअरिंग अटॅक म्हणजे व्यक्तीच्या बोलण्यातून त्याच्या नकळत त्याची सर्व माहिती मिळवून त्या माहितीचा तिच्याविरुद्ध वापर करणे हे प्रकार घडतात, त्यामुळे कोणतीही माहिती पटकन देऊ नये.
  • इंटरनेट बँकिंग करणार्‍यांनी बँकेस जो मोबाईल नंबर आणि मेल दिला असेल, तो कुणाशीही शेअर करू नये. नेटबँकिंग करताना स्क्रीनवरील की बोर्ड वापरावा. थोडक्यात म्हणजे , आर्थिक व्यवहार करण्यासाठी एक वेगळा आणि केवळ त्याच कामासाठी राखून ठेवलेला फोन नंबर आणि इ-मेल पत्ता असला पाहिजे.
  • पासवर्ड सहज अंदाजाने ओळखता येणार नाही, पण आपल्याला सहज लक्षात राहील, असा ठेवावा.
  • अनोळखी लोकांच्या, सामायिक मित्र असलेल्या व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Requests) मान्य करू नयेत. ही गोष्ट विशेषतः किशोरवस्थेत असणार्‍या वयात आलेल्या मुलामुलींनी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.
  • आपला मोबाइल, लॅपटॅप, डेस्क टॅप सहजासहजी कोणासही देऊ नये.
  • आपल्याला आलेली फाईल/ लिंक वापरण्यास योग्य आहे का Vovirustototal.com येथून तपासून पहावे. संकेतस्थळ सुरक्षित आहे की नाही हे आपण transparancyreport.google.com येथे जाऊन तपासू शकतो.
  • अनेक उपाय योजूनही जर कोणतेही अकाउंटहॅक झाल्यास रिकव्हरी लिंक वापरून आपल्या मॅक अड्रेसवरून (ज्या उपकरणावरून आपण हे अकाऊंट सुरू केले) विनंती करता येते.
  • पोलिसांकडे सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवताना मुद्देसुद (पंचनाम्यात जेवढी माहिती आवश्यक असते त्याप्रमाणे) आणि स्क्रीनशॉट पुराव्यांसहीतनोंदवावी.
  • प्रस्तावित डेटा प्रोटेक्शन बिल 2020 मध्ये डेटा होल्डरचे हित जपले जाईल याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे आपली माहिती का आणि कशासाठी वापरणार हे जाणून घेण्याचा हक्क आपल्याला मिळणार आहे.
  • न विचारता कुणी आपल्याला मदत करत असेल तर त्याचा हेतू तपासून पाहावा. आपले खाजगी फोटो शेअर करू नका.
                                                                                                                        

No comments:

Post a Comment