Total Pageviews

Friday, 10 January 2020

साताऱ्याचे जवान ज्ञानेश्‍वर जाधव शहीद सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले धकटवाडी, ता. खटाव येथील जवान ज्ञानेश्‍वर चंद्रकांत जाधव जम्मू-काश्‍मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) गावी येणार असल्याची माहिती देण्यात आली.


साताऱ्याचे जवान ज्ञानेश्‍वर जाधव शहीद
साताराः सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले धकटवाडी, ता. खटाव येथील जवान ज्ञानेश्‍वर चंद्रकांत जाधव जम्मू-काश्‍मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) गावी येणार असल्याची माहिती देण्यात आली.

शहीद जवान ज्ञानेश्वर जाधव हे २०१५मध्ये सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे. घरची परिस्थिती जेमतेम असून ज्ञानेश्वर यांचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथे झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, आई, वडील व दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे.

ज्ञानेश्वर यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना जम्मू-काश्‍मीरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी कळविले. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव उद्या (शनिवार) सायंकाळपर्यंत गावात पोहोचेल, अशी माहिती सरपंच कृष्णाजी माने यांनी दिली. जवान ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment