Total Pageviews

Sunday, 26 January 2020

ऑस्ट्रेलियातील आगडोंब स्रोत: विवेक मराठी-डॉ. बाळ फोंडके**


ऑस्ट्रेलिया हा तसा गवताळ प्रदेश आहे. इथे 'नेमेचि येतो वणवाअसा प्रकार आहे. तसं यंदाच्या इथल्या वणव्यांनी रौद्र रूप धारण केले आहेही आजची वस्तूस्थिती आहे. मात्र निम्म्याहून अधिक वणवे मात्र मानवनिर्मित असल्याचा अग्निशमन दलाचा दावा आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
ऑस्ट्रेलियात पेटलेले आणि झपाटयानं सर्वत्र पसरू पाहणारे वणवे ही आजची सनसनाटी ताजा खबर झाली आहे. वास्तविक तसं होण्याचं कारण नाहीऑस्ट्रेलियातल्या वणव्यांचा फार जुना इतिहास आहे. यंदा या वणव्यांनी अधिक भयंकर स्वरूप धारण केलं आहे आणि अधिक व्यापक प्रदेशावर आक्रमण केलं आहेहे मान्य. त्यामुळेच त्याची जगभर गांभीर्यानं दखल घेतली जात आहे. पण वणवे हा ऑस्ट्रेलियाचा स्थायिभाव आहे.
त्याची कारणंही अवगत आहेत. इथे ज्याला बुश म्हटलं जातंअशा गवतांनी आणि फार फार तर कमरेइतक्या उंचीच्या झुडपांनी सर्व खंडच व्यापलेलं आहे. लोकवस्ती तुरळक आणि मुख्यत्वे किनाऱ्यावरच्या प्रदेशातच स्थापित राहिलेली असल्यामुळे विशाल प्रदेशावर या बुशचंच राज्य आहे. त्यांच्यातच काही उंच वृक्षांनी पाय पसरले आहेत. एक प्रकारे विस्तृत जंगलांनी बहुतांश प्रदेश व्यापलेला आहे.
 
या वृक्षराजीची आणखी काही वैशिष्टयं आहेत. ती सहजासहजी आगीला बळी पडणाऱ्या प्रकृतीची आहे. काहींच्या जीवनचक्रातच अग्नीला कळीचं स्थान आहे. एकदा वृक्ष आगीला बळी पडला की त्यानंतरच त्याची पुढची पिढी जन्माला येऊ शकते. त्यामुळे काही वेळा तर या झाडांची व्यवस्थित वाढ व्हावीम्हणूनही आगी लावल्या जातात. त्या नियंत्रणात राहिल्या नाहीत की त्यांचं वणव्यांमध्ये रूपांतर होतं. त्यात भर पडते ती इथल्या हवामानाची. हे खंड जगातलं सर्वात कोरडं खंड आहे. इथे पर्जन्यवृष्टी फार कमी होते. हवेत बाष्पाची कमतरता असून ती नेहमी कोरडीच राहते. त्यापायी आणि उन्हाळयातील चढया तापमानापायी झाडंझुडपं साफ वाळून जातात. त्यांचं सरपणात रूपांतर होतं. अशात जर वीज कोसळली किंवा इतर काही कारणांनी ठिणगी पडलीतर ती गवताळ झुडपं पेटायला वेळ लागत नाही. झाडीही इतकी गर्द आणि एकमेकाला चिकटून असते की वाऱ्याचा झोत अनुकूल असेलतर आग माकडांसारखी एका झाडावरून दुसऱ्या झाडावरतिथून तिसऱ्या झाडावर अशा उडया घेत झपाटयाने पसरत जाते.
डिसेंबर ते फेब्रुवारी हा इथला उन्हाळा. त्यामुळे देशाच्या दक्षिण भागात चढं तापमान आणि कोरडं हवामान यापायी वणव्याला आमंत्रण देणारी परिस्थिती उत्पन्न होते. आपल्याकडे जसा 'नेमेचि येतो पावसाळा', तसा इथे 'नेमेचि येतो वणवाअसा प्रकार आहे. यंदा आपल्याकडेही जसं पावसाने अतिरेकी धुमाकूळ घालून सर्वांचीच पाचावर धारण बसवली होतीतसं यंदाच्या इथल्या वणव्यांनी रौद्र रूप धारण करत सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवलं आहे. गेला दीड महिना हे वणवे वाटेत येईल ते जाळत आले आहेत आणि अजूनही काढता पाय घेण्याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
 
यंदाच्या वणव्यांचं भीषण स्वरूप उघड करणारी काही आकडेवारी स्तिमित करणारी आहे. आजपर्यंत एकूण एक कोटी हेक्टर क्षेत्र वणव्यात जळून खाक झालं आहे. आपल्याला सहज समजेल अशा भाषेत सागायचंतर संपूर्ण इंग्लंड देशाचं एकूण क्षेत्रफळही साधारणपणे एवढंच आहे. एकटया न्यू साउथ वेल्स या राज्यात हॉलंड देशाएवढं - म्हणजेच पन्नास लाख हेक्टर क्षेत्रफळ वणव्यात सापडलं आहे. आजवरची सर्वात मोठी आग गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ऍमेझॉनच्या जंगलांमध्ये लागली होती. पण तिची व्याप्तीही फक्त नऊ लाख हेक्टर इतकीच होती. तरीही त्या आगीनं साऱ्या जगाला त्रस्त केलं होतं. त्याच्या कितीतरी पट अधिक ऑस्ट्रेलियातले सध्याचे वणवे आहेत.
 
ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधील ज्येष्ठ प्राध्यापक स्टीफन पाईन यांनी ऑस्ट्रेलियातील वणव्यांचा समग्रा अभ्यास करून 'बर्निंग बुशहे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी आजवरच्या विविध वणव्यांचा तौलनिक अभ्यास केला आहे. गेल्या वर्षापर्यंत सर्वाधिक भीषण वणवा 2009 सालातील ब्लॅक फ्रायडे या नावाने ओळखला जाणारा होता. त्याने पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचा घास घेतला होता. पण यंदाच्या वणव्याची व्याप्ती पाहता त्याला केवळ शेकोटीच म्हणावं लागेल.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 परंतु या संकटाचा सामना करण्याची जी आपत्कालीन व्यवस्था इथे आहेतिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. वणव्याची माहिती मिळताक्षणीच अग्निशमन दल तिथे धावून जातं आणि दलाचे जवान आणि अधिकारी आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न दिवसरात्र करत राहतात. आगीवर पाण्याचे जोमदार फवारे तर मारले जातातचतसंच हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून त्याच्यावर पाणी तसंच अग्निरोधक वायू आणि रसायनं यांचाही मारा केला जातो. अग्निशमन दलातले बहुतांश जवान स्वयंसेवी आहेत. दलाचे नियमित वेतनधारी कर्मचारी संख्येने कमी आहेत. पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच तत्परतेने काम करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून आपल्या कामधंद्यातून सुटी घेऊन धावून जाणाऱ्या व्यक्तींची कमतरता नाही. इतर मंडळीही मदतकार्यात स्वतःला झोकून देतात. मदतीसाठी अर्थबळाचा तर ओघच लागतो. ही या देशाची खासियत आहे. दानधर्मात सर्वच जण आघाडीवर असतात. कोणत्याही आपत्तीच्या वेळी - मग ती नैसर्गिक असो की मानवनिर्मितमदत करण्याची अहमहमिकाच लागते. यापायीच इतकी गंभीर समस्या उद्भवल्यानंतरही आतापर्यंत फक्त पंचवीस जणांचेच बळी गेले आहेत. त्यातही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. मालमत्ता आणि गुरंढोरं यांची मात्र फार मोठया प्रमाणात हानी झाली आहे. गावंच्या गावं जळून खाक झाली आहेत.
 
वणव्यांची सुरुवात होण्याची दोन कारणं आहेत. गवताळ झुडपांनी व्यापलेल्या प्रदेशावर जवळच्या झाडांची सुकलेली पानं आणि काटक्या सतत पडत राहतात. अवर्षण आणि दीर्घ काळचं कोरडं हवामान यापायी हा सर्व पालापाचोळा सुकून सरपणासारखा होतो. त्यावर वीज पडली किंवा सोसाटयाच्या वाऱ्यामुळे होणाऱ्या घर्षणापायी ठिणगी उडाली की तो झटकन पेट घेतो. वारा आग पसरवायला मदतच करतो.
 
निम्म्याहून अधिक वणवे मात्र मानवनिर्मित असल्याचा अग्निशमन दलाचा दावा आहे. यातील काही समाजविघातक मंडळींकडून जाणूनबुजून लावलेल्या आगीपायी उद्भवतात. काही शेतकरी पुढील हंगामासाठी जमिनीची मशागत करण्यासाठी आगी लावतात. त्या मग नियंत्रणाबाहेर जाऊन त्यांचं वणव्यात रूपांतर होतं. आपल्याकडेही बोरघाटातल्या डोंगरांवर अशा आगी दिसतात. पण त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशाची स्थिती इथल्या जंगलांसारखी नसल्यामुळे त्यांचं व्यापक वणव्यांमध्ये रूपांतर होणं टळतं.
काही आगी तर अग्निशमन दलाकडून बुध्दयाच लावल्या जातात. वणव्यांवरच्या प्रतिबंधक उपायांचा तो एक भाग असतो. जो प्रदेश वणव्यांना बळी पडण्याची शक्यता असतेत्याच्या भोवती रिंगणाकार आग लावून ते रिंगण जाळून टाकलं जातं. रिंगणात मग जळू शकेल असं काहीही राहत नाही. त्यायोगे मग त्याच्या पलीकडे लागलेली आग त्या प्रदेशावर आक्रमण करू शकत नाही. काही वेळा ही रिंगणाकारी आग लावताना चुका होतात आणि प्रतिबंधक उपायांऐवजी वणव्यांना पोषक परिस्थिती प्रस्थापित होते.
तरीही यंदाच्या भीषण वणव्यांना हवामान बदल कारणीभूत असल्याचा दावा पर्यावरणवादी मंडळी करत आहेत. जगभरच आज ऋतुमानात फार मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी आपल्याकडे देशभर पुरांनी जे थैमान घातलं होतंत्याचीही कारणमीमांसा अशीच केली गेली आहे. यावर अजूनही तज्ज्ञांचं एकमत नसलंतरी त्यावर आतापासूनच प्रतिबंधक उपाय योजावे हे बहुतेकांनी अधोरेखित केलं आहे. शिवाय हे उपाय जागतिक स्तरावर झालेतरच लाभदायक ठरू शकतील. त्यामुळेच पॅरिस करारातून अमेरिकेने अंग काढून घेणं आणि त्यावर बहुतांश विकसित देशांनी मौन पाळणं याला जगभरातून जोमदार विरोध होत आहे.
अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रसारमाध्यमांचं वर्तन कसं असावं याचा वस्तुपाठ येथील मुद्रित तसंच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी घालून दिलेला आहे. वणव्यांचं वास्तव वर्णनच दिलं जात आहे. जिथे वणवा आहेतेथील स्थानिक वार्ताहर परिस्थितीविषयी यथातथ्य माहितीच देतात. सनसनाटी वार्तांकन टाळल्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण घबराट पसरत नाही. मदतकार्य करणाऱ्याचं मनोबल तर वाढतंचआणि ते करत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचं उत्स्फूर्त सहकार्य लाभतं. त्यांनी दिलेल्या आदेशांचं व्यवस्थित पालन होतं. त्यापायीच जीवितहानी टाळण्यातही मदत होत आहे.
अग्निशमन दलं कोणत्या संकटांशी सामना करत आपलं काम निष्ठापूर्वक पार पाडत आहेतहेही दाखवलं गेल्यामुळे नागरिकांनाही धीर येतो व मदतकार्य शिस्तबध्दरीत्या पार पाडता येत आहे. कोणत्याही वाहिन्यांवर गल्लीबोळातल्या तथाकथित तज्ज्ञांना पाचारण करून त्यांचं भाष्य ऐकवणं कटाक्षानं टाळलं जात आहे. मुलाखती घेतल्या जातात त्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्याच. तेही वस्तुस्थितीचं संयत वर्णन करून नागरिकांनी पाळायच्या पथ्याविषयीच बोलतात. स्वयंघोषित तज्ज्ञांना आणि राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बोलावून केल्या जाणाऱ्या आक्रस्ताळी कंठाळी चर्चांची गंमत येथील प्रसारमाध्यमांना समजलेली नाही.
या वणव्यांचं राजकारण करण्याची संधी कोणीही साधलेली नाही. राजकारणी मंडळी कुठेच दिसत नाहीत. फक्त व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीच हजेरी लावली आहे. तीही नागरिकांच्या मदतीसाठी कोणत्या सोई केल्या आहेत याची माहिती देण्यासाठी, तसंच मदतीचं आवाहन करण्यासाठी. बळी पडलेल्या नागरिकांना सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावंकर्जमाफी करावी अशा प्रकारच्या मागण्या विरोधी पक्षांनीही केलेल्या नाहीतना त्यांनी या वणव्यांसाठी सरकारला जबाबदार धरून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रस्त्यांवर उतरून आकांडतांडव करत मोर्चे काढले जात नाहीत. याला अपवाद काही पर्यावरणवाद्यांचा. हवामान बदलाविषयीचं धोरण तातडीने अंमलात आणावं असा आग्राह धरून त्यांनी मोर्चे काढण्याचे प्रयत्न केले. पण त्याला मर्यादित पाठिंबाच मिळालेला आहे. नाही म्हणायला पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या विरोधात काही घोषणाबाजी झाली. पण ती त्यांनी या काळात हवाई बेटांवर जाण्यासाठी घेतलेल्या सुटीवर टीका करण्यासाठी. तसंच रिंगणाकार आगी लावण्याचे प्रतिबंधक उपाय योजायला त्यांनी उशीर केल्याबद्दल. पण काही तज्ज्ञांनी हे उपाय रामबाण नसल्याचं सांगून त्यांच्यावरच्या दोषारोपांचं गांभीर्य कमी केलं आहे.
काही तज्ज्ञांनी मात्र इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभ्यास करण्याची वेळ आल्याचं ठासून सांगितलं आहे. त्यातला एक तर त्यांनी आताच सुचवला आहे. जागा मुबलक असल्यामुळे इथे बहुमजली रहिवासी इमारती फारशा नाहीत. ग्राामीण भागात तर अजिबात नाहीत. स्वतंत्र घरंभोवताली गवताळ कुरण व बाग हाच तिथला भूगोल आहे. मात्र या घरांच्या बांधणीत लाकडाचा फार मोठया प्रमाणावर वापर केला जातो. फार फार तर सर्वात बाहेरच्या भिंतीसाठी विटा आणि सिमेंट वापरले जातात. त्यापायी मग घरं ज्वलनशील बनतात आणि जेव्हा वणवा जंगलाची हद्द तोडून गावात शिरतो, तेव्हा ही घरं त्याला सहजासहजी बळी पडतात. पोलादऍल्युमिनियमकाच आणि उच्च दर्जाचं सिमेंट यांनी बांधलेली घरंही संपूर्णपणे अग्निविरोधक असतात असं नाही. पण ती पटकन पेट घेत नाहीत. त्यामुळे आता घरबांधणीकडे नव्या नजरेने पाहायला हवंअसा आग्राह धरला जात आहे.
नैसर्गिक आपत्ती सर्वतोपरी टाळणं अशक्यच असतं. त्यापायी जीवितहानी होणार नाही याचीच काळजी घेणं शक्य असतं. त्यासाठी लोकशाही देशांमध्ये शासनशासकीय संस्था यांच्या बरोबरीने सर्वसामान्य नागरिकाचंही काही उत्तरदायित्व असतं याची पुरेपूर जाणीव ऑस्ट्रेलियन समाजात दिसून येते. येथील लोकशाही प्रगल्भ झाल्याचीच ही लक्षणं आहेत.

No comments:

Post a Comment