रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेतील बेकायदेशीर ई-तिकीट रॅकेटचा
पर्दाफाश केल्यानंतर, अटकेतील आरोपींच्या चौकशीतून
धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रॅकेट अवघ्या 40 सेकंदात अर्ध्यापेक्षा जास्त रेल्वे तिकीटा बुक करायचे, अशी ही माहिती आहे. या प्रकरणात 26 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई
ठरली आहे. तिकीट बुक करणारी टोळी कार्पोरेट कंपनीप्रमाणे काम करायची. यासाठी
सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची एक चमू दुबईतून काम बघायची. भारतात एक प्रमुख, व्यवस्थापक, मुख्य विक्रेते आणि एजंट असे सुमारे 20 हजार लोक यात कार्यरत असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाला हा घोटाळा उघडकीस आणून, त्याची पाळमुळे खणून काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. या
रॅकेटचा सूत्रधार हमीद अशरफ असून, तो दुबईत
वास्तव्याला आहे. त्याला 2016 मध्ये उत्तरप्रदेशच्या गोंडा येथे
तिकिटात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 2019 मध्ये गोंडा येथे झालेल्या बॉम्बस्फोटही हात असल्याचे पुरावे तपास
यंत्रणांकडे आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भारतातील या रॅकेटचा सूत्रधार गुलाम
मुस्तफाचाही समावेश आहे. त्याला बंगळुरूतून अटक करण्यात आली. या रॅकेटची विभागवार
सूत्रे सांभाळणार्यांना हस्तकांनाही अटक करण्यात आली आहे.
रेल्वेची ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्यानंतर 40 सेकंदातच अर्ध्यापेक्षा जास्त तिकिटे खरेदी केली जात असत. यासाठी
देशातील 20 हजार एजंट्सने असे सॉफ्टवेअर
वापरले होते, ज्यामुळे सिक्युरिटी क्लिअरन्स
करण्याची आवश्यकता पडत नव्हती. या प्रक्रियेत ओटीपीही द्यावा लागत नव्हता. या
रॅकेटमधील ‘गुरुजी’ नावाने ओळखल्या जाणार्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. रॅकेटमधील
पैशांची व्यवस्था तो सांभाळत होता.
या रॅकेटचा आणखी एक म्होरक्या गुलाम मुश्तफा हा सॉफ्टवेअर डेव्हलपर
असून, त्याला रेल्वे सुरक्षा जवानांनी
भुवनेश्वर येथून अटक केली आहे. त्याच्याजवळ 563 आयआरसीटीसी आयडी, स्टेट बँक आणि 600 ग्रामीण बँकांच्या 2400 शाखांची यादी आढळून आली. या सर्व बँकांमध्ये त्याची खाती असल्याचे
चौकशीतून समोर आले आहे. या रॅकेटचा संबंध पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील
अतिरेक्यांशी असल्याचा संशय आहे. ई-तिकीट व्यवहारातून मिळणारा पैसाही अतिरेक्यांना
मिळत असल्याची माहितीही उघडकीस आली आहे. ई-तिकिटांच्या विक्रीतून हे रॅकेट
प्रत्येक महिन्याला सुमारे 15 कोटी रुपयांची
कमाई करत असे.
No comments:
Post a Comment