Total Pageviews

Wednesday, 15 January 2020

काश्मीर: लातूरचा जवान सुरेश चित्ते हिमस्खलनात शहीद



लातूर: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला गावतील रहिवासी सुरेश गोरख चित्ते (वय ३२) हे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावत असताना झालेल्या हिमस्खलनामध्ये सुरेश चित्ते मृत्यूमुखी पडले. सुरेश चित्ते यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

सुरेश चित्ते यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, पत्नी, दोन मुली आणि महिन्याचा मुलगा आहे. सुरेश चित्ते हे २००४ मध्ये भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंट वन या तुकडीत सहभागी झाले. सुरेश चित्ते यांच्या निधनामुळे आलमला गावात दरवर्षी मकर संक्रातीला भरणारी यात्रा आणि स्पर्धा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सुरेश चित्ते यांचे पार्थिव शुक्रवारी १७ जानेवारीपर्यंत लातूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापले यांनी दिली.

मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन जवानांचा तर पाच नागरिकांचा समावेश होता. हिमस्खलनाच्या घटनेनंतर अनेक जण बेपत्ता असून, त्यामध्ये एका जवानाचाही समावेश आहे.

No comments:

Post a Comment