Total Pageviews

Sunday, 2 November 2014

बुखारींचा राष्ट्रद्रोह

बुखारींचा राष्ट्रद्रोह vasudeo kulkarni Saturday, November 01, 2014 AT 11:32 AM (IST) Tags: ag1 दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीचे इमाम, म्हणजे देशातल्या मुस्लिमांचे धर्मगुरू नव्हेत. ऐतिहासिक काळापासून या मशिदीच्या इमामाला महत्त्व आहे. मोगल काळात या मशिदीच्या इमामाला बादशाह सन्मानाची वागणूक देत असे. मोगलाई गेली, ब्रिटिशांचे राज्यही गेले आणि स्वातंत्र्यात या इमामाचे धार्मिक महत्त्वही लयाला गेले. पण तरीही आपणच इस्लामचे वारसदार आहोत, अशा मस्तीत जामा मशिदीचे इमाम परंपरेने राष्ट्राच्या विरोधात आणि धार्मिक ऐक्याला चूड लावणारी वक्तव्य करीत असतात. आपण या मातीत जन्मलो आणि याच मातीने आपल्याला वाढवले, पोसले, याची कृतज्ञताही या हरामखोर इमामांना नाही. यापूर्वीच्या इमामांनीही हिंदू-मुस्लीम धार्मिक ऐक्यात फूट पाडायचे करंटे उद्योग केले होतेच. आता आपले इमामपद परंपरेने आपल्या मुलाकडे देताना, सध्याचे इमाम सय्यद बुखारी यांनी उधळलेली मुक्ताफळे आगलावी आणि राष्ट्राच्या एकतेला सुरुंग लावणारी आणि देशाच्या पंतप्रधानांचा म्हणजेच देशाचाही अवमान करणारी आहेत. त्यांचे 19 वर्षांचे चिरंजीव शाबान याच्याकडे शाही इमाम बुखारी 22 नोव्हेंबर 2014 रोजी आपल्या इमामपदाची सूत्रे धार्मिक सोहळ्याने देणार आहेत. या सोहळ्यासाठी जगातल्या धर्मगुरुंबरोबरच त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबरोबरच देशातल्याही विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे दिली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र या धार्मिक सोहळ्याचे निमंत्रण जाणून-बुजून दिलेले नाही. भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देणारा हा बुखारी अस्तनीतला निखारा असल्यानेच, त्याच्या कारवाया केंद्र सरकारने कठोरपणे मोडून काढायला हव्यात. भारताच्या पंतप्रधानांपेक्षा त्याला पाकिस्तानचे पंतप्रधान जवळचे वाटत असतील, तर त्याने आपला भारतातला गाशा गुंडाळून पाकिस्तानात चालते व्हावे, ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया अवास्तव नाही. या असल्या परधार्जिण्या आणि शत्रू राष्ट्राच्या प्रमुखाचा सन्मान करणाऱ्यांना भारतीय भूमीत रहायचा मुळीच अधिकार नाही. पाकिस्तानात हजारो मशिदी आहेत आणि ते राष्ट्रही मुस्लीम आहे. तिथल्या सरकारचे, मुस्लिमांचे धार्मिक नेतृत्व करायसाठी या जुन्या काळातल्या शाही इमामाने तिथे जरूर जावे. भारतापेक्षा या असल्या धर्मांध आणि आगलाव्या इमामाची त्याच देशाला खरी गरज आहे. गुजरातच्या दंगली नियंत्रणात आणायसाठी मोदी अपुरे पडले, त्या राज्यात मुस्लिमांची हत्याकांडे झाली. त्या प्रकरणात मोदींना मुस्लिमांनी माफ केलेले नाही. मोदींनीही त्या दंगलींबाबत मुस्लिमांची माफी मागितलेली नाही. मोदी हे मुस्लिमांना आपले नेते वाटत नसल्यानेच, त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवलेले नाही. पाठवणारही नाही, असे उद्दामपणे हा सय्यद बुखारी म्हणाला आहे. तो आणि त्याच्या आधीच्या शाही इमामांनीही राष्ट्राबद्दल द्वेषाची गरळ ओकणारी वक्तव्ये केली. त्याचे जाहीरपणे समर्थनही केले. पण तेव्हाच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी कॉंग्रेसच्या सरकारांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही. मतांच्या राजकारणासाठी कॉंग्रेसवाल्यांनी या धर्मांध नेत्याच्या कारवायांना सातत्याने प्रोत्साहनच दिल्यामुळे, तो माजला आहे. त्याचा हा माज उतरायलाच हवा! राष्ट्रीय ऐक्यावर निखारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दस्तारबंदी म्हणजे पदग्रहण समारंभाचे निमंत्रण मुद्दाम न देणारा सय्यद बुखारी हा राष्ट्राच्या विरोधात तर आहेच, पण त्याच्या आधीच्या इमामांनीही तशीच भडकाऊ आणि आगलावी कृत्ये केलेली आहेत. दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमामांची परंपरा तशी धार्मिक ऐक्याला प्रोत्साहन देणारी कधीच नव्हती. मोगलाई गेली, तरी अत्याचारी मोगल सम्राटांचे आपण इमाम आहोत, अशा थाटात वावरणाऱ्या या इमामांना पूर्वीच्या सरकारांनी कायद्याचा हिसका दाखवला असता, तर सध्याच्या इमामाला देशाच्या पंतप्रधानांचा जाहीर अपमान करायचे धाडस झालेच नसते. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकात कॉंग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या या इमामांच्या दाढ्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी कुरवाळण्यातच धन्यता मानली. हा इमाम उपटसुंभ आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना आपले मानतो. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंतप्रधान मात्र त्याला आपले वाटत नाहीत. हा देशवासीयांचाही अवमान आहे. सय्यद बुखारीच्या वडिलांनी, तर इमाम पदावर असताना राष्ट्रहिताच्या विरोधात फतवे काढायचा सपाटाच लावला होता. त्या आणि सध्याच्या इमामांना मुस्लीम धर्मीयात काडीची किंमत नाही. मोगलाई गेली आणि मोगलाईबरोबरच इमामाचे इमामपदही दिल्लीच्या जामा मशिदीपुरतेच मर्यादित राहिले. पण तरीही प्रसिद्धीच्या झोतात रहायसाठी हा इमाम चिथावणीखोर फतवे काढतो. सरकारच्या विरोधात गरळ ओकतो. सध्याच्या इमामाच्या वडिलांनी 26 जानेवारी, प्रजासत्ताकदिनावर मुस्लिमांनी बहिष्कार घालायचा आणि काळे झेंडे लावायचा फतवा काढलेला होता. न्यायालयात ते प्रकरण गेल्यावरही बरीच वर्षे त्याच्यावर वॉरंटही लागू होत नव्हते. त्याला मोकाट सोडल्यामुळेच देशातल्या जात्यंध आणि धर्मांध शक्तींना चेव आला. सध्याचा इमामही आपल्या बापाची धर्मद्वेषाची परंपरा चालवत असला, तरी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव आणि साम्यवादी नेत्यांना त्याच्या आगलाव्या वक्तव्याचा निषेध करावा, असे वाटत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा जाहीरपणे अवमान झाल्यावरही धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचा येळकोट करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांनीही इमामाच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतलेली नाही. इमामाने पंतप्रधानांना निमंत्रण दिल्याने, ते काही मोठे होत नाहीत आणि न दिल्याने त्यांचे नेतृत्व छोटे होत नाही. पण ते देशाचे नेते आहेत. फक्त भारतीय जनता पक्षाचे ते नेते नाहीत, ही बाब लक्षात घेता, इमामाने केलेल्या या कटकारस्थानामुळे देशातल्या धर्मांध इस्लामी शक्तींना चिथावणी मिळेल, याचे भान धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्या सत्तेच्या दलालांनी ठेवायला हवे. मुस्लीम मला आवडत नाहीत, असे नरेंद्र मोदी यांनी कधीही म्हटलेले नाही. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी कधीही मुस्लीम समाजाचा अवमान केलेला नाही. या धर्मीयांचा सन्मानच केला आहे. राजाला कोणताही धर्म नसतो. राज्यातले सर्व प्रजाजन त्याचे असतात. राजधर्माचे पालन करणे हाच त्याचा धर्म असतो. लोकशाहीतही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना याच राजधर्माचे पालन करावे लागते आणि मोदी हे करत आहेत. मतांच्या राजकारणासाठी मुस्लिमांची टोपी त्यांनी जाहीर समारंभात घालून घेतली नाही. याचा अर्थ ते मुस्लिमांच्या विरोधात आहेत, असा होत नाही. पवित्र रमजानच्या उपवासाच्या काळात इफ्तार पार्ट्या झोडणारे संधिसाधू नेते मुस्लीम टोप्या घालून मिरवतात, मुस्लीम नेत्यांना गळाभेटी देतात, ते मुस्लीम मतांवर डोळा ठेवूनच! मोदींनी हे जातीय राजकारण नाकारून खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभावाचे राजकारण पंतप्रधान झाल्यावर खऱ्या राजधर्माचे पालन सुरू केले. हे सत्य इमाम आणि त्याच्या टोळीलाही नाकारता येणार नाही. इमामाची ही कृती म्हणजे राष्ट्रहितावर निखारे ओढायचा अश्लाघ्य प्रकार होय!

No comments:

Post a Comment