Total Pageviews

Wednesday, 29 October 2014

मतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिणम बंगालमधे वाढता दहशतवाद

मतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिणम बंगालमधे वाढता दहशतवाद पश्चिीम बंगालमध्ये १८० दहशतवादी, ७० दहशतवादी छुपे सेल ? पश्चिीम बंगालच्या बर्दवानमधील खागरागड येथे बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणाला सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल,गुप्तचर विभागाचे (आयबी) प्रमुख इब्राहिम, एनएसजीचे महासंचालक चौधरी,रॉ आणि एनआयएचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.या वरुन पश्चिमम बंगालमध्ये फ़ोफ़ावल्या दहशतवादाची कल्पना यावी.श्री अजित दोवल यांनी पश्चिम बंगालमधे लपलेल्या १८० दहशतवाद्यांची, राज्यातील शेकडो मदरसामधील दहशतवादी ट्रेनिंग केंद्राची आ्णि ७० दहशतवादी छुप्या सेलची यादी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर आतंकी कारवाया ज्या ठिकाणी चालत असतील, तेथे स्थानिक प्रशासन, पोलीस यांना याविषयी माहिती कशी मिळत नाही ? कि माहिती मिळूनही पोलीस-प्रशासन त्याकडे कानाडोळा करते कि पोलीसही त्यात सामील असतात ? तृणमूलच्या नेत्याच्या घरी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनीच पुरावे नष्ट केले आहेत.बंगलादेश ची राजधानी ढाका येथे मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवून आणण्याची हुजी अतिरेक्यांची योजना असल्याची माहिती आहे व काही राजकीय नेत्यांना, नामवंत व्यक्तींनाही ठार मारण्याची हुजीची योजना होती, असे इतके दिवस झोपलेले पश्चिम बंगालचे पोलिस आता सांगत आहेत. बर्दवान,जर्मन बेकरी, पाटण्यातील बॉम्बस्फोटांत साम्य २ ऑक्टोबर रोजी वर्धमान जिल्ह्याच्या खागरागढ येथे तृणमूल नेत्याच्या घरी बॉम्ब बनविताना झालेल्या स्फोटात दोन दहशतवादी ठार झाले. एक जण जखमी झाला. यावेळी पश्चिटम बंगालच्या ‘सरकारने सर्वात पहिले कोणते काम केले असेल तर ते म्हणजे घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली स्फोटके आणि पुरावे नष्ट करण्याचे. मात्र घटनास्थळावरून वृत्त स्थानिक वर्तमानपत्रात फोटोंसह छापून आले.नंतर गृहमंत्रालय अधिकार्यां्नी खुलासा केला आहे की, प. बंगाल पोलिस या प्रकरणी अजीबात सहकार्य करीत नाही. आता जसजशी अधिक सखोल चौकशी होत आहे, तसतसे ममता बॅनर्जी सरकारचे जिहादींशी असलेले जिव्हाळ्याचे संबंधही उघड होत आहेत. ज्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या नेत्याच्या घरी बॉम्बस्फोट झाला, त्याचे बांगला देशातील दहशतवादी संघटना जमात उल मुजाहिदीनशी अतिशय निकटचे संबंध आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरविण्यात देखील वरील नेत्याची मोठी भूमिका आहे. बर्दवानमधील खागरागड, पुण्यातील जर्मन बेकरी आणि पाटण्यातील बॉम्बस्फोटांत मोठे साम्य आढळून आले होते. बर्दवानमधील एका घरातून ५९ आयईडी, ५५ ग्रेनेड्‌स जप्त करण्यात आले. यामध्ये रशियन ग्रेनेड लॉंचर्सचाही समावेश आहे. आसाममधील बोडोंवर हल्ला करण्यासाठी,बांगलादेशातील दहशतवाद्यांसाठी आणि भारतात इतरत्र बॉम्बस्फोट करण्याकरता ही शस्त्रे तयार केली असावीत. वर्धमान जिल्ह्यात दहशतवाद्यांचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे आणि त्यांची काय योजना होती, याचे पुरावे राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) च्या हाती लागले आहेत. खागरागढ स्थित घरातून एनआयएला लेड अलाईड या अतिशय शक्तिशाली रसायनांच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. या स्फोटकाच्या धमाक्यात हजारो लोकांचा बळी जाऊ शकला असता. एनआयएने दहशतवाद्यांच्या अन्य दोन अड्ड्यांवरून प्रचंड प्रमाणात आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरून जप्त सिम कार्डच्या कॉल डिटेल्सवरून असे कळले की त्यांचा जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, आसाम, महाराष्ट्र, तामिळनाडू येथील राज्यातील सहकार्यांमशी सातत्याने संवाद होत होता. ‘आझमगढ आणि दरभंगा मॉड्यूल’ नंतर दहशतवादी बायका व मुलांबरोबर राहुन दहशतवादी कारवाया करत आहे. यामुळे अड्डे बनविणे सोपे होते आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा संशय येत नाही. अनेक प्रांतातील युवक-युवती जिहादी संघटनांमध्ये सामील एनआयएला सिमुलियातील मदरशाविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. दहशतवाद्यांना याच मदरशात जिहादी प्रशिक्षण देण्यात आले होते. रुमी आणि अमीना बीबी बांगलादेशच्या जमातुल मुजाहिदीनच्या महिला ‘हिट स्क्वाड’च्या सदस्य होत्या. या दोघींच्याही शोधात बांगलादेश पोलिस होती. चौकशीत दोघींनीही कबूल केले की, सिमुलिया मदरशात त्यांना शस्त्रास्त्रे चालविण्याचे आणि जिहादचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. वर्धमान प्रकरणातील दहशतवाद्यांचा सूत्रधार आणि मदरसाचा संचालक युसुफ शेख २००७ ते २००९ पर्यंत उत्तरप्रदेशात होता, जेथे त्याला दहशतवादी प्रशिक्षण देण्यात आले. त्याने आझमगड मॉड्यूलच्या धर्तीवरच वर्धमान येथे जमातुल मुजाहिदीन बांगलादेशचे दहशतवादी मॉड्यूल बनवले होते. गेल्या वर्षी बोधगया येथील महाबोधी मंदिरावर दहशतवाद्यांच्या हल्ल्याची चौकशी करीत असताना लक्षात आले, की या स्फोटासाठी वापरण्यात आलेली साधने आसाममधील गुवाहाटी येथून आणण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात म्यानमारमधून हकालपट्टी झालेल्या रोहंगिया मुसलमानांचा(हे भारतीय नाहीत) हात होता. त्यांना स्वीकारण्यास बांगलादेश तयार नाही; त्यांना कोणतेही राष्ट्र स्वीकारायला तयार नाही. आसामची सरहद्द त्यांना प्रवेश करण्यास सुलभ वाटते, म्हणून त्यांनी आसामात आश्रय घेतला आहे. अशा तऱ्हेने ३० हजार रोहंगिया मुसलमानांनी आसामात आश्रय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिाम बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश, बिहार इत्यादी राज्यांत मोठ्या संख्येत युवक-युवतींना जिहादी संघटनांमध्ये सामील करण्यात आले आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी बांगलादेशमार्गे वजीरिस्तानमध्ये पाठवले जाते. तेथून परतल्यावर ते मदरशाच्या माध्यमातून अन्यना जिहादसाठी प्रेरित करतात. सिमुलिया स्थित मदरशातून एनआयएने प्रचंड प्रमाणात उर्दू आणि अरबी भाषेतील प्रकाशित जिहादी सामुग्रीचे ढीग जप्त केले. शेकडो जिहादी पुस्तके, पत्रके, प्रचार सामुग्रीने भरलेल्या १४ पेट्या आणि वाळूने भरलेली असंख्य पोती जप्त केली. मदरशातून एक नॅनो कारही जप्त करण्यात आली आहे. या कारच्या काचेवर नाशिक स्थित लष्करी छावणीत वापरण्यात येणारे स्टीकरही लावण्यात आले होते. मदरशाला गुप्त खोल्या आणि भुयारी मार्ग असल्याचेही आढळून आले आहे. एनआयएला बांगलादेशला अगदी लागूनच असलेल्या मुर्शिदाबादच्या लालगोला आणि बेलडांगा येथे दोन मदरशांची माहिती मिळाली आहे, जेथे दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते. बांगलादेशचे ‘जनसंख्या-युद्ध’ आणी आपले मत पेटीचे राजकारण तिकडे आसाम पोलिसांनी बरपेटाहून सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दतशतवादीसुद्धा जमातुल मुजाहिदीनचे सदस्य आहेत आणि यातील तिघांचे प्रशिक्षणही त्याच मदरशातून झाले, जेथे वर्धमान बॉम्बस्फोटातील फरार मुख्य आरोपी कौसरचे झाले होते. आज भारतातील अनेक जागा बांगलादेशी मजूरवर्गासाठी सुरक्षित वस्ती झाल्या आहेत. मुंबई आणि दिल्लीकडे त्यांची रीघ लागली आहे. हे बेकायदेशीर स्थलांतरण जर असेच काही वर्षे चालत राहिले, तर त्याचे परिणाम सार्यार देशासाठी भयानक होऊ शकतात. कारण प्राथमिक अवस्थेत मजूर म्हणून यांची ओळख देण्यात येत असली, तरीही अल्पावधीतच एका राजकीय शक्तीमधे/पक्षामध्ये त्यांचे रूपांतर होते. सध्या ज्या प्रकारे बांगला देशी घुसखोर आसाममधे प्रभावी बहुसंख्यक म्हणून स्वत:ला सिद्ध करू पाहत आहेत(त्यांचे ३ खासदार आणि १७ आमदार आहेत). याचीच पुनरावृत्ती नजीकच्या काळात मुंबई आणि दिल्लीमधेही घडू शकेल. भारतीय नागरिकाच्या मताचे जे मूल्य आहे तेच, भारतातिल घुसखोर बांगलादेशीचेही आहे आणि हा मताधिकार मिळविणे बांगला देशींसाठी या देशात किती सहज आहे, आहे हे समजवण्याची गरज नाही. बांगला देशातून भारताविरुद्ध एक ‘जनसंख्याआक्रमणाचे-युद्ध’ छेडलेले आहे, जे पाकिस्तान करीत असलेल्या सशस्त्र आक्रमणापेक्षा कितीतरी पटींनी भयावह आहे. बांगलादेशी घुसखोरीची समस्या आता नंबर एक राष्ट्रीय समस्या बनली आहे.ते आता दहशतवाद पण पसरवत आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या निवडणुकांच्या काळात या संबंधात कठोर भाषा वापरली होती, आता ते या संकटापासून सार्यात देशाचे रक्षण करण्यासाठी एक परिणामकारक कार्यवाही अमलात आणतील, अशी आशा वाटते.

No comments:

Post a Comment