Total Pageviews

Wednesday, 13 April 2011

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 64-देशात दहा वर्षांत १२ लाख बेपत्ता

 
INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 64
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/२००० ते २०१० या दहा वर्षांत महाराष्ट्रामध्ये दोन लाख २४ हजार १०२ जण बेपत्ता झाले - देशात दहा वर्षांत १२ लाख बेपत्ता
माणसे हरविण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. २००० ते २०१० या दहा वर्षांत महाराष्ट्रामध्ये दोन लाख २४ हजार १०२ जण बेपत्ता झाले आहेत. या यादीमध्ये मध्य प्रदेश दुसर्‍या तर राजधानी दिल्ली तिसर्‍या क्रमांकावर आहे.महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये एक लाख १४ हजार २०० पुरुष तर एक लाख नऊ हजार ९०० महिलांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीतून ही माहिती पुढे आली आहे. देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून मागील दहा वर्षांत एकूण १२ लाख चार हजार ११९ व्यक्ती हरविल्या आहेत. यात सहा लाख ५९ हजार २० पुरुष आणि पाच लाख ४५ हजार ९९ महिलांचा समावेश आहे. यात १८ वर्षांखालील दोन लाख ५० हजार पुरुष आणि दोन लाख १९ हजार १०२ महिला आहेत. १८ वर्षांवरील व्यक्तींमध्ये चार लाख नऊ हजार पुरुष तर तीन लाख २५ हजार ८९२ महिला आहेत.
*
ओरिसा, गुजरात महिलांसाठी धोक्याचे!दहा वर्षांची आकडेवारी पाहता ओरिसा आणि गुजरात ही राज्ये महिलांसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट होते. ओरिसामध्ये १२ हजार ६२० पुरुष तर १६ हजार ५३० महिला बेपत्ता झाल्या आहे. गुजरातमध्येही पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे.
*
हरविलेल्या व्यक्तींची आकडेवारी
राज्य - संख्या
महाराष्ट्र - लाख २४ हजार १०२
मध्य प्रदेश - लाख ७६ हजार ७९५
दिल्ली - ९४ हजार १८९
कर्नाटक - ६९ हजार ५३४

No comments:

Post a Comment