Total Pageviews

Tuesday, 19 April 2011

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 66

 
INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 66
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/
. जी. मर्कंटाईल कंपनीस मोठ्या भूखंडाची भेट -उपमुख्यमंत्र्यांचा "दादा' घोटाळा ? . जी. मर्कंटाईल कंपनीस मोठ्या भूखंडाची भेट कंपनीत पवारांसह गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, गोएंका यांचीही गुंतवणूक
आदर्श भूखंड घोटाळा प्रकरणी अद्याप तपासाची चक्रे फिरत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2007 साली जलसंपदा खात्याचे मंत्री असताना स्वत:चे तब्बल 8 हजार 800 शेअर्स असलेल्या . जी. मर्कंटाईल कंपनीसाठी भिलवले धरणाशेजारी पर्यटन विकासाच्या नावाखाली तब्बल 2 लाख स्क्वेअर फुटांचा भूखंड लाटला असल्याचा गौप्यस्फोट एका वृत्तवाहिनीने मंगळवारी केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याच कंपनीत सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आणि टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी विनोद गोएंका हे देखील संचालक असल्याचे स्पष्ट झाल्याने काल-परवापर्यंत आमचे गोएंका कुटुंबियांशी कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत तर केवळ कौटुंबिक संबंध आहेत, असे सांगणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्व त्या पुराव्यानिशी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात याच प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून याबाबत वृत्तवाहिनीच्या अधिक माहितीनुसार, 29 जून 2005 साली स्थापन करण्यात आलेल्या . जी. मर्कंटाईल कंपनीत 39 शेअर्स गुंतवणूकदार आहेत. या गुंतवणूकदारांमध्येसर्वाधिक शेअर्स ना. अजित पवार यांच्या नावे (8 हजार 800) आहेत. तर त्याखालोखाल श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे 7 हजार 200 शेअर्स आहेत. त्यानंतर गिरीश अमोनकर, अतुल खानोलकर यांचे शेअर्स असून याच कंपनीत टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी शाहिद बलवा याचा भागीदार विनोद गोएंका हा देखील संचालक आहे. ना. अजित पवार हे 2007 साली जलसंपदा खात्याचे मंत्री असताना, जुन्या पुणे-मुंबई महामार्गानजिक कर्जत फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलवले धरणाशेजारच्या जागेवर ना. पवार यांची नजर पडली. त्यानंतरच येथील भूखंडाचे श्रीखंड ओरपण्याची एक एक चाल खेळण्यात आली. सुरुवातीस पवारांच्या जलसंपदा खात्याला पर्यटनाचा उमाळा आला आणि पर्यटन विकासाच्या नावाखाली येथील धरणाच्या मजबुतीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्या. ही निविदा अर्थातच . जी. मर्कंटाईल कंपनीस देण्यात आली. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2006 साली बांधा, वापरा, हस्तांतरित करा या अभिनव उपक्रमांतर्गत पर्यटन विकासाला चालना देण्याचे स्वप्न रंगवले गेले. यासाठी देखील जलसंपदा खात्याकडून . जी. मर्कंटाईल कंपनीबरोबर भाडेपट्ट्याचा करार केला गेला. त्यानंतर 16 एप्रिल 2007 रोजी कंपनीने धरणात बोटींगसाठी परवाना देण्याचा अर्ज केला, त्याचवेळी बोटींगसाठी धक्का उभारण्याचाही अर्ज केला गेला आणि त्यास तातडीने 19 एप्रिल 2007 रोजी जलसंपदा खात्याकडून परवानगीही देण्यात आली. त्याच पूर्वी एक दिवस अगोदर पाणी उपसा सिंचनासाठी कंपनीकडून अर्ज करण्यात आला आणि त्याला देखील 19 एप्रिल रोजीच परवानगी देण्यात आली. त्यानंतर 2008 साली पूल, रस्ता कामासाठी कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आणि कंपनीच्या या कामाच्या मोबदल्यात सुरुवातीस 93 हजार 646 चौरस फूट आणि त्यानंतर 97 हजार चौरस फुटांचे भूखंड केवळ 2 वर्षात बहाल करण्यात आले. पर्यटन विकासाच्या नावाखाली पुढे याच कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवून या भूखंडात स्विमिंग पूलसारख्या सर्व प्रकारच्या सोई-सुविधा असलेले आलिशान इमले उभारण्यात आले असून ही जमीन कोणाच्या मालकीची अन्‌ मालकी गाजवतोय कोण, मलिदा खातोय कोण, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कंपनीचा सर्व कारभारच भोंगळ असल्याचा पुरावाही संबंधित वृत्तवाहिनीने सादर केला असून, या कंपनीत शेअर्सधारक असलेल्या 39 जणांच्या यादीतील पहिल्या पाच जणांचे रहिवास पत्ते संपूर्ण आहेत, तर उर्वरित शेअर्सधारकांचे पत्ते केवळ मुंबई याच नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याशिवाय संबंधित वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्यातील काही नावांची शहनिशा करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर पोहचण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातूनही काही वेगळीच माहिती उघड झाली आहे. कंपनीच्या कागदपत्रांवर जे. बी. शहा, एस. एम. राठी, प्रकाशचंद जैन यांची शेअर्सधारक म्हणून नोंद आहे आणि त्यांनी बोरिवली येथील योगीप्रभात सोसायटी, प्लॉट नं. 402, योगीनगर असा पत्ता त्यावर नमूद केला आहे. पण, जेव्हा त्या प्रतिनिधीने तेथे पोहचण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तेथे यापैकी कुणीही रहात नसल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानुसारच या कंपनीतील सर्व शेअर्सधारक बोगस आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित वृत्तवाहिनीने केलेल्या या गौप्यस्फोटातून अशा सर्व बाबी समोर आल्या आहेत की, त्या सर्व बाबींचे स्पष्टीकरण ना. अजित पवार आणि गोएंका प्रकरणी ना. शरद पवार यांनाही द्यावे लागणार आहे. खरे गुंतवणूकदार कोण?. जी. मर्कंटाईल ही कंपनी अस्तित्वात येताना त्यामध्ये 39 जणांनी शेअर्स गुंतवणूक केली असल्याचे संबंधित कंपनीच्या वेबसाईटवरील कागदपत्रांवरुन स्पष्ट होत असले तरी, ना. अजित पवार, श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, विनोद गोएंका, गिरीश अमोनकर, अतुल खानोलकर यांच्याशिवाय अन्य नावांची आणि पत्त्यांची शहनिशा केल्यावर समोर आलेल्या बनवाबनवीच्या प्रकाराने या कंपनीचे खरे गुंतवणूकदार कोण? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. आपला काही संबंध नाही : ना. पवार दरम्यान, या प्रकरणाबाबत ना. अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाशी आणि कंपनीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे वृत्तवाहिनीकडून प्रसारित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाची फसवणूक
प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीपूर्वी आपल्या संपत्तीचा तसेच गुंतवणुकीचा सर्व तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. त्याप्रमाणे ना. अजित पवार यांनी 2009 साली निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात . जी. मर्कंटाईल कंपनीच्या शेअर्स गुंतवणुकीचा कोणताही तपशील त्यामध्ये दिलेला नसल्याचेही या वृत्तवाहिनीने प्रसारित केले असून ना. पवार यांनी चक्क निवडणूक आयोगाचीही फसवणूक केल्याचा आरोप केला आहे
 
Wednesday, April 20, 2011 AT

No comments:

Post a Comment