ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 3२
नोकरी लागायला अडत्यांना माल, बढती मिळायला वरिष्ठांची धमाल,बदलीही मिळायला लाखोंचा भार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
प्रवेश मिळायला नोटांची थप्पी, शिक्षण "महर्षींची' झाली चलती,डॉक्टर झाला की मग रेफरल फार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
आता पीएचडीही "स्वस्त' झाली,कुठल्या विषयात हवी आहे ती सांगा भली,दहावीच असलात तरी बिनतक्रार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
गुन्हा करणाऱ्या कोणाला धरावे,की लगेच वरून कोणाचे फोन यावे,तोंड दाबून बुक्क्यांचा मार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
गल्लीतला दादा करतो नगराची सेवा,सेवा कसली मेला लुटतो मेवा,जेवढी कामे जास्ती त्याला येते बहार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
नगराची सेवा करताना बोका सोकावतो,आणखी मोठे व्हायची स्वप्ने बघतो,मतपेट्यांच्या राजकारणावर याची मदार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
बोका हळूहळू गलेलठ्ठ होतो,घुसखोरांना पाठीशी घालतो, देश विकायलाही मागेपुढे नाही बघणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
स्पेक्ट्रम असू दे की कॉमनवेल्थ खेळ,आदर्श असो की सरकारी योजनांचा मेळ,नेता आणि बाबू मंडळींची नियतच बेकार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
संरक्षण असो, शेती असो, की असो शिक्षण,पैसे ढापायला यांच्या योजना विलक्षण, टाळूवरचे लोणी खायला हे नाही बधणार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
लोकप्रतिनिधींचे अजबच वर्तन,आमरण प्रवास फुकट आणि पेन्शन,तरी प्रश्न विचारायलाही पैसे घेणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
ज्याच्या तडाख्यात सापडावे तो किंमत मागतो,पाप नाही केले यावर ना विश्वास ठेवतो, आय सेवा विक्री किती करांचा भार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
पाचवे कमिशन, सहावे कमिशन, किती पगार वाढले विलक्षण,काम करायला तरी "वजनाचा'च आधार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
सरकार म्हणते भ्रष्टाचार वाईट,लक्ष ठेवायला आहे व्हिजीलंसची मोट,आता त्याच्या साहेबावरच प्रश्नचिन्हांची मोहोर,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
धंदा सुरू की इन्स्पेक्टर हजार,गिऱ्हाइकाचा मात्र इंतजार, पाकिटांचे दर हे स्वतःच ठरविणार
मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
धंदेवाले ही हुशार झाले, पैसे त्यातूनही कमवायला शिकले,म्हणणार एक, पण वस्तू भलतीच देणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
पत्रकारही विकले गेले,बातम्या पेरून त्यांनी इमले केले,त्यावरचाही ते कर चुकवणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
खेळाडूंची ही चलती मोठी,पैसे कमवितात कोट्यानुनिकोटी उंची गाडीवर म्हणे करा माफ आयातकर,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
खासगी क्षेत्रातले ही लोक हुशार, कंपनी बुडते इतरांना कळू नाही देणार, त्या आधीच हळूच आपले समभाग विकणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
कंपनी बुडीत म्हणून कंड्या पिकवतात,घाबरून धडाधड सगळे समभाग विकतात, कंपनी प्रगतिपथावर, मग हे सर्वांत आधी घेणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
महागाईने आणला तोंडाला फेस काळ्याबाजाराने ओलांडली वेस,व्यापाऱ्याची मजा, गरीब जिवावर उदार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
अन्नात भेसळ, औषधात भेसळ,सावध व्हा आला डुप्लिकेटचा काळ, कोणावर विश्वास हा प्रश्नच फार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
श्रुती सांगतात स्त्रिया देवीचे रूप,तिला सन्मान द्या तरच मिळेल सुख,पण ललनेने ही मांडला सौंदर्याचा बाजार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
सिनेमा सृष्टी मायानगरी,सवंग झाली करमणूक सारी, तडजोड केली तरच पुढे जाणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
शिक्षणाचे म्हणे माध्यम दूरदर्शन,चॅनेलमधली चढाओढ विलक्षण, घराघरांत कलहांना आमंत्रण देणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
निदान साहित्यात सगळ्या सोज्वळ स्वारी,इथे तरी राहो भ्रष्टाचार दूरी, वाडःमय चोरांचे मात्र इथे फावणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
मध्यमवर्गीय ही झाला बेरकी, स्वार्थापुरतीच जगण्याला गती,दीन दुबळ्यांचे दुःख नाही कोणी पुसणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
मध्यमवर्गीय हक्कांचा दावेदार, भ्रष्टाचारी नेत्याला तो करतो चर्चेत प्रहार,मग हळूच आपला कर चुकवायला बघणार,मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
कोवळ्या मनातही आता विषाचीच पेरणी, जीवघेण्या स्पर्धेची पायाभरणी,सहकार कसला, सगळीकडे स्वार्थच दिसणार मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
लोकेषणा, वित्तेषणा, कामेषणांचा बाजार
प्रसिद्धी मिळवायला हपापले फार, गाढवावर बसायलाही नाही मागे पुढे बघणार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?
करणार त्यालाही माहित्ये भ्रष्टाचार वाईट, स्वर्गात नाही नेता येत यातली एकही वीट,पैसा आला त्यालाही वाटा फुटणार, तरी नरकातच जायची का हा इच्छा करणार?
भ्रष्टाचाऱ्या आठवण ठेव वाल्या कोळ्याची,माया हवी पण पापातल्या सहभागात गोची, वाल्मीकीची क्षमता तुझी बावनखणी, मग का होतोस वाल्याच्या पापांचा धनी मंडळी, हे सगळे का असेच राहणार?
गुंडाराज का असेच फावणार? गीतेतल्या संदेशाचे काय होणार? धर्मसंस्थापनेला कधी प्रकटणार?करूयात आपण सगळे निर्णय एक,भ्रष्टाचाराला तिलांजली थेट
चारित्र्याची कास धरूया,ईश्वराला आपल्यातच प्रकट होऊ देऊया
प्रकट होण्याची तो वाट बघतोय
तपःपूत ऋषींकडून साधना करवतोय,घनदाट अंधारानंतर प्रसन्न सकाळ,गाडून टाकूया भ्रष्टाचार
सूर्य चंद्र वंशीयांचे वारस आपण,तेजाचे हे अंश सर्वजण,क्षमता आपल्या प्रकटवूया, जगाला नवे दर्शन घडवूया,भारत देश जगाचा आध्यात्मिक गुरू,अभ्युदय निःश्रेयसाचा मार्ग धरू,पुढच्या पिढीला सत्त्व देवूया,पैसा येईल, पण आधी तत्त्व देऊया, व्यासांनी तेव्हाही हात उंचावलेच होते,कलियुग येताहे म्हणून बजावले होते,धर्मातूनच अर्थकाम प्रशस्त होते,पण हन्त, त्यांचे ऐकून कोण घेते,त्याचीच झाली परिणती आज,भ्रष्टाचाराच्या थैमानाचा माज, पुन्हा धर्माला जागवूया,धर्म म्हणजे पंथ नव्हे समजूया,धर्म म्हणजे माणसाचे जीवनमूल्य,कर्तव्यांची सांगड अतुल्य,समाधानाचे खूपच मोल,पैशांनी नाही येणार ते तोल,पैसा हवाच, पण त्यावर धाक हवा,नीतिमत्तेचा अमोल ठेवा,सुखवस्तूंमध्ये थोडेच असते?माणसाच्या मनामनांमध्ये ते वसते,विचार करता तत्त्व उमगले,जगण्यासाठी मार्ग सापडले,आयुष्याचे मी सार्थक करणार,मग का मी करू भ्रष्टाचार?
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TOAS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/ मग का मी करू भ्रष्टाचार? डॉ. अभिजित फडणीस हाही करतो, तोही करतो, बोकाही उडवतो भूखंडाचे बार,गल्ली ते दिल्ली हाच प्रकार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?नोकरी लागायला अडत्यांना माल, बढती मिळायला वरिष्ठांची धमाल,बदलीही मिळायला लाखोंचा भार, मग का नको करू मीही भ्रष्टाचार?

No comments:
Post a Comment