Total Pageviews

Tuesday, 19 April 2011

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 3 जवान शहीद April 19, 2011 AT 07:03 PM (IST)

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 3 जवान शहीद April 19, 2011 AT 07:03 PM (IST) गडचिरोली येथील कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत "कोब्रा' या विशेष दलाचे 3 जवान शहीद झाले असून सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत किती नक्षलवादी ठार झाले याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास खोब्रोमेंढा जंगलात नक्षलवादी आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये भीषण धुमश्‍चक्री उडाली. यात कोब्राचे 3 जवान शहीद झाले असून सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाल्याचा दावा नेहमी प्रमाणॆ पोलिसांनी केला आहे. प ण ज र
मृतदेह मीळाले नाही तर यावर विश्वास करता येणार नाही.

शहीद झालेल्या जवानांमध्ये महेंद्र सिंग (पंजाब) याचा समावेश असून इतर दोन जवानांची नावे कळु शकली नाहीत. जखमी जवानांची नावे खालीलप्रमाणे - अरुणकुमार मार्कंडे (राहुरी, जिल्हा नगर), सतीश शिंदे (जळगाव), अशोक कावरे (भंडारा), राजेश पटेलिया (गुजरात) आणि योगेशकुमार प्रसाद (दिल्ली) .
दरम्यान, चकमकीनंतर काही नक्षलवादी बाडबाडा या गावात लपल्याचे माहिती मिळाल्याने पोलिसांनी या गावाला वेढा दिला आहे. तेथे अजूनही चकमक सुरू असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment