Total Pageviews

Friday, 17 February 2017

('आज सामना होणार', शहीद मेजर सतीश दाहियांचे शेवटचे शब्द)


'आज सामना होणार', शहीद मेजर सतीश दाहियांचे शेवटचे शब्द • ऑनलाइन लोकमत श्रीनगर, दि. 17 - मगंळवारी काश्मीरच्या हंदवाडा येथे शहीद झालेल्या शूरवीर मेजर सतीश दाहिया यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याआधी आपल्या सहकारी सबीर खानला 'आज सामना होणार' असं म्हटलं होतं. हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर सतीश दाहिया शहिद झाले. सबीर खान हंदवाडा पोलिस खात्यात उप विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हंदवाडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सबीर खानदेखील सहभागी झाले होते. सबीर खान यांनी सांगितलं की, 'सतीश दाहिया सुरुवातील चकमकीत सहभागी नव्हते. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी निघत असताना काही वेळापुर्वीच माझ्या विनंतीला मान देऊन त्यांच्यावर टीमचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. जेव्हा आम्ही दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी निघालो तेव्हा सतीश मला बोलले 'आज सामना होणार'. मी हसत हसत त्यांना खरंच का ? असं विचारलं, तर त्यावर विश्वास ठेव असं ते म्हणाले'. (काश्मिरात ३ जवान शहीद) आपल्या मित्राची शूरगाथा सांगताना भावूक झालेल्या सबीर खान यांनी सांगितलं की, 'हा आमचा शेवटचा संवाद ठरला. हा विश्वासच आहे ज्याच्या भरवशावर आपला तिरंगा मानाने फडकत आहे'. सबीर खान यांनी सतीशच्या काही आठवणीही सांगितल्या. 'गेल्याच महिन्यात आमच्या एका मित्राला वीरचक्र मिळालं. त्यावेळी आम्ही सर्व मित्र आनंद साजरा करत होतो. त्यावेळी सतीशने पुढच्या महिन्यात मी तुझ्यापेक्षा मोठं पदक मिळवेन असं म्हटलं होतं', अशी आठवण सबीर खान यांनी सांगितली. 'खरोखरच सतीशने आपलं म्हणणं खरं केलं. त्याने सर्वात मोठं पदक मिळवलं. सोबतच कोटी भारतीयांच्या ह्रदयात स्वताची जागा निर्माण केली आहे', असं सबीर खान म्हणतात. आपल्या मित्राला शेवटचा निरोप देत असताना 'आकाशात माझ्या आवडत्या ता-यात तुला पाहिन', असं सांगत शहीद सतीश आपल्यासोबत नेहमी असेल असं म्हटलं आहे दगडफेक करणा-यांवर कारवाईसाठी तुम्हाला सूट, मनोहर पर्रीकरांचा लष्कराला संदेश • First Published :17-February-2017 : 13:02:03 • ऑनलाइन लोकमत श्रीनगर, दि. 17 - लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणा-यांविरोधात केलेल्या वक्तव्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी समर्थन केलं आहे. लष्कर प्रत्येक काश्मीरी व्यक्तीला दहशतवादी समर्थक मानत नाही, पण जर कोणी लष्कराविरोधात काही करत असेल तर उपस्थित अधिकारी कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली आहे. (काश्मिरात ३ जवान शहीद) लष्कराच्या स्थानिक पातळीवरील कामात जर कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर, त्यावेळी कमांडिग ऑफिसरला निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार असतो. लष्कर प्रत्येक काश्मीरी व्यक्तीला दहशतवाद्यांचा समर्थक मानत नाही. पण जो दहशतवाद्यांच्या बाजूने आहे, तो दहशतवादीच आहे असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. याअगोदर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीदेखील बिपीन रावत यांच्या वक्तव्याचं समर्थन करताना, 'दगडफेक करणारे आणि राष्ट्रहिताविरोधात काम करणा-यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. कारण राष्ट्रहित सर्वात महत्वाचं आहे', असं म्हटलं होतं. काश्मीर खो-यात दोन वेगवेगळ्या चकमकीत एका मेजरसहित चार जवान शहीद झाल्यानंतर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी वक्तव्य करत 'खो-यातील स्थानिक लोकांच्या शत्रुत्वाच्या वागण्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. तसंच सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान जवानांवर हल्ला करणा-यांवर सक्त पाऊल उचलंत देशविरोधी कारवाई केली जाईल', असं म्हटलं होतं. यानंतर काही राजकीय पक्षांनी बिपीन रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता

No comments:

Post a Comment