December 28, 2016
0
67
•
•
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जर्मनी, तुर्की आणि स्वित्झर्लंडमधील इस्लामी जिहादी हल्ला म्हणजे ख्रिश्चॅकनिटीवर आक्रमण असल्याचे सांगितले. ‘‘जेव्हा ख्रिश्च न समाज उत्सव साजरा करीत होता, त्या वेळी इसिसने व अन्य इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ले केले. हे हल्ले जिहादींच्या विश्विव्यापी ख्रिश्चसनविरोधी अभियानाचा भाग आहे,’’ असेही ट्रम्प यांनी स्पष्टपणे नमूद केले.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे युरोपमध्ये एकीकडे वाद निर्माण झाला असतानाच दुसरीकडे भारतातील खास सेक्युलर गटाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत, ‘दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो’ वगैरे हा नेहमीचाच सूर आळवला. मात्र, ट्रम्प म्हणजे ओबामा नव्हेत! त्यांनी इस्लामी जिहादचा खराखुरा, बुरख्याआड दडलेला चेहरा गोडगोड, चॉकलेटी राजकीय भाषा न वापरता जगापुढे आणला आणि व्होटबँकेच्या राजकारणापायी अन्य लोक ज्या गोष्टीचा उच्चार करायलाही मागेपुढे पाहतात, ती गोष्ट ट्रम्प यांनी अतिशय रोखठोखपणे बजावण्याची हिंमत दाखविली.
इस्लाम आणि ख्रिश्चॅरनिटीचा संघर्ष इसवी सन आठव्या शतकातच सुरू झाला होता. महंमद पैगंबर यांचा इ. स. ७३२ मध्ये मृत्यू झाल्यानंतर, ख्रिश्चघन आणि यहुदी राज्यांवर मुसलमानांचे हल्ले झाले आणि जबरदस्तीने धर्मांतरणाचे भीषण सत्र सुरू झाले. मुस्लिम हल्लेखोरांनी ख्रिश्चचन आणि यहुदी समाजाला ‘धिम्मी’चा दर्जा दिला, ज्यांना स्वत:चे रक्षण करण्यासाठी मुस्लिम शासकांना कर द्यावा लागत होता, त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचा पोषाख निश्चिात करण्यात आला होता, जेणेकरून दुरवरूनच ते ‘धिम्मी’ असल्याचे ओळखता यावे. नवीन चर्च उभारण्यास प्रतिबंध करण्यात आला होता आणि त्यांना आपल्या पूजा-प्रार्थना व धार्मिक कार्य आपल्या घरातच करण्याचा आदेश देण्यात आला होता. जरी इस्लामच्या प्रारंभिक कार्यकाळात अल्प कालावधीसाठी ख्रिश्च्न व यहुदी समाजाला ‘अहले-किताब’ संबोधून त्यांच्याप्रती सहिष्णुता दर्शविल्याचे पुरावे असले, तरी नंतर लवकरच कुराणची नवीन व्याख्या करणार्यांहनी गैर-इस्लामी समाजाला शत्रूप्रमाणे मानले आणि जेरुसलेम इस्लामच्या पंजाखाली आणले. स्पेनला चिरडून टाकले. इंग्लंड, आयर्लंड आणि पॅरिसपर्यंत इस्लामी फौजांचे हल्ले झाले.
जिहादला क्रुसेडने (धर्मयुद्ध, खिश्चॅगनिटी) तोडीस तोड उत्तर देण्यात आले. १५ वे शतक येता येता स्पेनमधील मुसलमानांसमोर स्पॅनिश साम्राज्याच्या एकीकरणातून जन्मलेल्या ख्रिश्चचन एकतेचा प्रमुख फर्डिनांड द्वितीयचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले. फर्डिनांडचे लष्करी सामर्थ्य अफाट होते. त्याने स्पेनमधील मुसलमानांसमोर एकच पर्याय ठेवला आणि तो म्हणजे एकतर ख्रिश्चंन धर्माचा स्वीकार करा अथवा मृत्यू पत्करा. मध्ययुगीन संघर्षानंतर आटोमन साम्राज्याचा अंत आणि नवीन व्यवस्थेत नवनव्या देशांची निर्मिती ख्रिश्चान राजवटींनी केली आणि त्यामुळे इस्लामचा विश्वनव्यापी प्रभाव संपुष्टात आला. वर्तमान इस्लाम-ख्रिश्चीन संघर्षात भूतकाळातील वर उल्लेखित घटनांची मुळे आहेत. या सार्याव घटनांच्या स्मृती दोन्ही धर्माच्या अनुयायांमध्ये कोरल्या गेल्या आहेत. इस्लामी जिहादी आणि ख्रिश्च न समुदायात या संचित स्मृतींचे विष एवढे भिनले आहे की, काहीही, कुठलेही, कधीही आणि कसेही मतभेद एकदम हिंसेचे भीषण रूप धारण करतात. आज इस्लामी देश अमेरिकेला पाश्चिामात्य ख्रिश्चरनांच्या शक्तीचे केंद्र मानतात, जो इराक-इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तानपासून सीरियापर्यंत सध्याच्या युद्ध आणि राजकीय सारिपाटावर इस्लामचा खात्मा करण्यास उद्युक्त झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हेच वास्तव अतिशय रोखठोक व प्रखर शब्दांत व्यक्त केले, एवढेच. तुर्कीत रशियन राजदूताला ठार करणारा सीरियन नागरिक नाही तर तुर्कीच होता. मात्र, त्याच्या मनात तुर्की राष्ट्रवाद आणि आपल्या जन्मभूमीच्या हितापेक्षा सीरियाच्या मुसलमानांशी ‘इस्लामियत’ च्या धाग्याने जुळल्याची भावना होती. रशियाने तुर्कीविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियन राजदूताला ठार करण्यात आलेले नाही, तर सीरियातील रशियन भूमिकेचा बदला घेण्यासाठी तुर्कीच्या नागरिकाने ही हत्या केली. जेव्हा धार्मिक कट्टरता राष्ट्रवादाला ओलांडते तेव्हाच असे कृत्य घडते.
भारतात सेक्युलर राजकारणी व मीडिया राष्ट्रवादाविरुद्ध लेख लिहितात, भाषणे देतात आणि अशा प्रकारे ते आपल्या मौनातून आणि हिंदू विरोधातून इस्लामी कट्टरतेला खतपाणी घालत असतात. पाकिस्तान, इसिस, तालिबान हे भारताला हिंदुराष्ट्र मानतात. केवळ याच कारणामुळे त्यांचा भारताला विरोध आहे. म्हणूनच देशात व काश्मिरात ही जिहादी विषवल्ली फोफावत आहे. जागतिक संसाधने-संपदा, शक्ती, सैन्यबळ तसेच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, औद्योगिक विकासाच्या संस्था या सर्वांवर पाश्चिनमात्य ख्रिश्चभनांचा प्रभाव व वर्चस्व पाहून इस्लामी जिहादी संतापून जातात आणि हा प्रभाव नष्ट करण्यासाठी हिंसाचाराचा आश्रय घेतात. त्याचप्रमाणे भारताची निरंतर प्रगती, लोकशाहीवादी संसदीय प्रणालीचे यश, येथील सामाजिक बहुलतावाद, लष्करी आणि आर्थिक शक्ती यामुळे इस्लामला धोका आहे, असे जिहादी मानतात.
भारतात इस्लामी दहशतवाद्यांचे आणि कम्युनिस्ट विद्रोही गटांचे हल्ले केवळ हिंदूंवरच होत आहेत. भारताबाहेर इस्लामी आणि ख्रिश्चॅमनिटी एकदुसर्यायसमोर उभे ठाकतात, पण भारतात मात्र या शक्ती हिंदूंविरुद्ध एकवटल्या आहेत, ही मोठीच विडंबना आहे. चर्चवरील हल्ले, धर्मांतरण अथवा तथाकथित असहिष्णुता या सार्याा मुद्यांवर चर्च हिंदू संघटनेविरुद्ध सेक्युलर मीडियालाच साथ देते. अशा वेळी राजकीय पक्ष व एनजीओदेखील चर्चच्याच भूमिकेची री ओढतात.
इसवी सनाच्या १२ व्या शतकापासूनच भारतावर इस्लामी आक्रमण सुरू झाले होते. तीन हजारांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. सोमनाथचा महंमद गजनीकडून झालेला विध्वंस, काशी, मथुरा, अयोध्येतील प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्रांवर हल्ला, प्रयागची लूट करून व शहर जाळून टाकून त्याचे नाव अलाहाबाद आणि कर्णावतीचे अहमदाबाद ठेवणे, नालंदा, तक्षशिलासारखी विश्ववविख्यात विद्यापीठे नष्ट करणे, १३३८ मध्ये तैमुरलंगकडून दिल्लीच्या भयानक नरसंहारापासून (दुर्दैवाची गोष्ट ही की, आमच्या देशातील धर्मांतरित मुस्लिमांना आपल्या मुलाचे नाव तैमूर असे ठेवण्यात कुठलाही संकोच वाटत नाही) १९४७ मध्ये स्वतंत्र राष्ट्र आणि द्विराष्ट्रवादाचा पोकळ सिद्धांत उकरून काढून देशाची धर्माच्या आधारावर फाळणी करणे, या सार्याध स्मृती इस्लामच्या घोर हिंदुद्वेषाचेच पुरावे आहेत. इस्लामी जिहाद वस्तुत: हिंदू विरोधाची नवीन आवृत्ती आहे, हेच यातून सिद्ध होते.
जोपर्यंत मुसलमान आपल्या आतून हिंदूंविषयीचा द्वेष नष्ट करीत नाहीत, तोपर्यंत जिहाद व पाकिस्तानचा द्वेष संपणार नाही. कारण शेवटी ही घृणा, हा द्वेष केवळ पाकिस्तानच नव्हे, तर सार्यान मुस्लिम देशांना आपल्या आगीच्या कवेत घेत आहे. इस्लामी विश्व एकीकडे पाश्चिदमात्य ख्रिश्चचन व दुसरीकडे हिंदू भारताविरुद्ध उभे ठाकलेले दिसते. मात्र, यामुळेच इस्लामी जगत स्वत: याच आगीत होरपळत आहे. आज जगात सर्वात जास्त मुसलमान खुद्द मुसलमानांकडूनच मारले जात आहेत आणि प्रत्येक दहशतवादी घटनांमागे कुणी ना कुणी मुस्लिम आढळून येतोच.
या सार्याप पृष्ठभूमीवर, भारताला आपली नेतृत्वशील भूमिका निभविण्याची वेळ आली आहे. शील, करुणा याबरोबरच लष्करी पराक्रम आणि दुष्टांना क्षमा न करता त्यांचा संहार करणे, हाच विश्वाशांती आणि सद्भावासाठी आज एकमेव उपाय आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या या त्रिआयामी प्रकट संघर्षात मंगोलवंशीय चीन आणि पूर्व आशियाई देशांचा दृष्टिकोन भारतासाठी विशेष सामरिक महत्त्वाचा आहे. अमेरिकेत ट्रम्प, भारतात मोदी आणि रशियात पुतिन आगामी काळात कुठल्यातरी मोठ्या निर्णायक घटनेचे साक्षीदार, सूत्रधार आणि सेनापती बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असे दिसते.
No comments:
Post a Comment