Total Pageviews

Monday 13 February 2017

सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर लोकांनी सुरक्षा दलांवर नागरिकांची सुरक्षा दलांवर दगडफेक;


दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्य़ात सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर लोकांनी सुरक्षा दलांवर केलेल्या दगडफेकीमुळे उफाळलेल्या चकमकींत एक युवक ठार, तर १८ लोक जखमी झाले. कुलगाम जिल्ह्य़ात रविवारी सकाळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार मारले. यानंतर प्रामुख्याने युवकांचा समावेश असलेल्या हजारो लोकांनी घोषणाबाजीसह सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. सुरक्षा दलांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली, तसेच हवेत गोळीबारही केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांच्या कारवाईत १९ लोक जखमी झाले. बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या चौघांपैकी एकजण नंतर मरण पावला. त्याचे नाव मुश्ताक अहमद असल्याची ओळख पटली आहे. १५ जखमींना अनंतनागच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, तर इतर तिघांना एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अखेरचे वृत्त मिलाले त्या वेळी दंगलग्रस्त भागात चकमकी सुरूच होत्या. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्य़ात सुरक्षा दलांनी ठार केलेल्या मुदासिर अहमद या दहशतवाद्यावर दक्षिण श्रीनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. सरकार वेगळे, चुका त्याच ! जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोडा येथे सैनिक आणि जिहादी आतंकवादी यांच्यात चकमक चालू असल्याची वार्ता एकीकडे आली, तर दुसरीकडे भारत पाकसमवेत ‘शांती वार्ता’ करणार असल्याची वार्ता ऐकावयास मिळाली. या दोन्ही परस्परविरोधी वार्ता राष्ट्रभक्तांना अचंबित करणार्यास आहेत. काश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवादाने थैमान घातले आहे. एकेकाळी केवळ काश्मीरपुरत्या मर्यादित असलेल्या जिहादी आतंकवादाने आता संपूर्ण देश पोखरून टाकला आहे. अनेक निष्पाप नागरिक या आतंकवादाचे बळी ठरत आहेत. तरीही पाकशी चर्चा करणे म्हणजे सापाला दूध पाजणे होय आणि देशात कोणाचेही सरकार आले, तरी हीच चूक पुन:पुन्हा केली जाते. याचे मूळ आपल्या पाकविषयीच्या मवाळ धोरणात आहे. देश आयएस्आयच्या विळख्यात ! देशात अलीकडच्या काळात उघड झालेल्या घटनांवरून, देश पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयच्या विळख्यात आहे कि काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. मध्यप्रदेशमध्ये आयएस्आयला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवणार्या ११ हस्तकांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडे ३ सहस्र सीमकार्ड, सीमकार्डचे ३५ बॉक्स, ५० भ्रमणभाष संच आदी शासनाधीन करण्यात आले. इतकेच नव्हे, तर त्यांनी तब्बल १२ हून अधिक बँक खातीही उघडली होती. मग प्रश्नर असा पडतो की, एवढे सर्व होत असतांना आपली गुप्तचर यंत्रणा काय करत होती ? यंत्रणांना हे कळले कसे नाही ? तसेच राजस्थानमधील जैसलमेर येथे हाजी खान नावाच्या आयएस्आयच्या गुप्तहेराला अटक करण्यात आली. त्याच्याकडूनही सीमकार्ड आणि अनेक संदिग्ध वस्तू जप्त करण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर देशात नुकतेच जे मोठे रेल्वे अपघात झाले, त्यामागेही आयएस्आयचा हात असल्याचे पोलिसांनीच सांगितले. आयएस्आयसाठी हेरगिरी करणार्याे एकाला डिसेंबर २०१५ मध्ये पंजाब येथून अटक करण्यात आली होती. तो वायुसेनेचा माजी पदाधिकारी असल्याचे सांगितले गेले. आयएस्आयच्या कारवाया येथेच थांबतात असे नाही, तर काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी आयएस्आयने काश्मीरमधील तरुणांना हाताशी धरून पथकेही सिद्ध केली आहेत. तसेच सैनिकांचे शीर कापणे, अनेक ठिकाणच्या दंगली, बॉम्बस्फोट यांमधील आयएस्आयचा म्हणजेच पाकचा सहभाग तो वेगळाच. त्यांचे हस्तक पकडले जाणे, ही तर जणू सामान्य गोष्टच झाली आहे. यावरून देश किती पोखरला गेला आहे, हे लक्षात येईल. २६/११, पठाणकोट, उरी ही जिहादी आक्रमणेही पाकनेच केली ना ? ही सूची न संपणारी आहे. या सर्व घटना पहाता पाकने भारताविरुद्ध पुकारलेले हे युद्धच नव्हे का ? आपण इतिहासात एकदाच सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याचे गुणगान नित्यनेमाने गात आहोत; पण पाक प्रतिदिन युद्ध करतो अन् देशातील असंख्य निरपराध लोकांचे रक्त सांडून आसुरी आनंद घेतो, त्याचे काय ? पाक युद्ध पुकारतो आणि आपण शांती वार्ता करत बसतो, ही कुठली गांधीगिरी ? हा देश छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारख्या अनेक थोर पराक्रमी राष्ट्रपुरुषांचा आहे. स्वराज्याच्या मुळावर उठलेल्या शत्रूचा कोथळा बाहेर काढून त्याला जशास तसा धडा शिकवण्याची आपली परंपरा आहे. कुठे गेला तो पराक्रमी इतिहास ? शत्रू एवढा उघड उघड चाल करून येत असतांना त्याच्याशीच अशा वांझोट्या चर्चा करण्याचे सुचतेच कसे ? आपण पाकशी आजवर काय कमी चर्चा केल्या आहेत का ? काय साध्य झाले त्यातून ? म्हणूनच आता तरी असली चर्चेची गुर्हाशळे चालवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अंगीकारून पाकला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. ‘तो’ अपमान विसरलात का ? पाकने आक्रमणे करून जायचे आणि भारताने त्या आक्रमणाचे पुरावे गोळा करत बसायचे, हा बालीश खेळ गेली अनेक दशके चालू आहे. पठाणकोटचे आक्रमण झाल्यानंतरही तेच झाले. भारताने पाकविरुद्ध पुरावे गोळा केले. नेहमीप्रमाणे पाकने त्याला केराची टोपली दाखवली. त्यावर तोडगा म्हणून या आक्रमणाच्या चौकशीसाठी पाक आणि भारत या दोन्ही देशांच्या अन्वेषण यंत्रणांनी एकमेकांच्या देशांत जायचे निश्चिणत झाले. त्यानुसार प्रथम पाकचे अन्वेषण पथक पठाणकोटला येऊन गेले; पण विश्वरसाघातकी पाकने कोलांटीउडी घेत भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला पाकमध्ये येऊच दिले नाही. हा केवढा मोठा विश्वलसघात ! त्याचे पुढे काय झाले, ते समोर आले नाही; पण गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर मात्र ‘पाकने जर आमच्या यंत्रणांना प्रवेश नाकारला, तर तो भारताशी केलेला विश्वाहसघात ठरेल’, असे विधान करण्याची वेळ आली होती. यातच सर्व आले. पाकने केलेला हा अपमान आपल्या जिव्हारी कसा लागला नाही ? हा अपमान विसरून आपण पाकशी चर्चा करूच कशी शकतो ? श्रीलंकेने जसे तामिळी वाघ संपविले तसेच काश्मीर मधील फुटारतावादी संपविल्या शिवाय गत्यंत्तर नाही तोच एक मार्ग ह्यावर आहेहे असं किती दिवस चालणार? आता वेळ आली आहे ती देशातील इतर भागातील भारतीय पर्यटकांनी काश्मीरला जाणे काही महिने थांबवायची. जोपर्यंत काश्मीर मध्ये वातावरण भारतासाठी पूर्ण अनुकूल होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे येणार नाही असे ह्यांना ठणकावून सांगायचे. म्हणजे हे लोक ठिकाणावर येतील. ह्यांच्या आर्थिक नाड्या जनतेने आवळल्या कि ह्यांच्यातले दहशदवादी गळून पडतील. यांना आम्ही आमचे बंधू म्हणतो पण यांना यांचा धर्म आणि पाकिस्तानचा धर्म सारखा वाटतो .आतंकवादी मेला आणि या लोकांना पुळका सुटला ..यांची मानसिकता एव्हडी खालावलेली कशी कि यांना आपले कोण आणि परके कोण यातला फरकच कळत नाही .त्या फुटीरवाद्यांना एकदाचे एन्काऊंटर करून मारून टाका आणि सर्व देशद्रोही लोकांना पाकिस्तानात पाठवून द्या . Sudhakar Sutar Hjs

No comments:

Post a Comment