Total Pageviews

Monday, 22 February 2016

CAPTAIN PAWAN KUMARS LAST POST-SUPPORT INDIAN ARMY DISBAND JNU - ARREST PRO TERROR LOBBY-'किसी को रिझर्व्हेशन चाहिए तो किसी को आझादी भाई, हमे कुछ नही चाहिए, बस चाहिए अपनी रजाई'...http://maharashtratimes.indiatimes.com/nation/some-want-quota-others-azadi-i-only-want-my-razai/articleshow/51089651.cms

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/some-want-quota-others-azadi-i-only-want-my-razai/articleshow/51089651.cms

'किसी को रिझर्व्हेशन चाहिए तो किसी को आझादी भाई, हमे कुछ नही चाहिए, बस चाहिए अपनी रजाई'... काळजाला हात घालणारी ही पोस्ट आहे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले हरयाणातील कॅप्टन पवन कुमार यांची. देशातील ताज्या घडामोडींवर भाष्य करणारी व स्वत:ची 'मन की बात' सांगणारी ही पोस्ट पवन कुमार यांनी शेअर केलेली अखेरची पोस्ट. 'कुणाला आरक्षण हवं आहे तर कुणाला स्वातंत्र्य, आम्हाला यातलं काहीही नको. आम्हाला पाहिजे ती फक्त रजई अर्थात एखादं ब्लँकेट. जे पांघरून आम्ही शांतपणे झोप घेऊ शकू आणि आनंदात राहू शकू... असा काहीसा आशय असलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. आरक्षणासाठी जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या आणि सरकारी पैशांवर चालणाऱ्या विद्यापीठात 'भारत तोडो'च्या घोषणा देणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या या ओळींची देशभर चर्चा आहे. अवघ्या २३ वर्षांचे असलेले कॅप्टन पवन कुमार मूळचे हरयाणातील जिंद येथील होते. ते स्वत: जाट कुटुंबातील होते. विशेष म्हणजे, सध्या देशविरोधी घोषणांचं व वादाचं केंद्र बनलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) ते माजी विद्यार्थी होते. जेएनयूतून पदवी घेऊन तीन वर्षांपूर्वी देशसेवेसाठी ते लष्करात भरती झाले होते. अत्यंत साहसी असलेल्या पवन कुमार यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्करानं हाती घेतलेल्या अनेक मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. डिसेंबर २०१३मध्ये डोग्रा रेजिमेंटमध्ये समावेश झालेल्या पवन कुमार हे गेल्या वर्षी जूनमध्ये स्वेच्छेनं विशेष निमलष्करी दलात सहभागी झाले होते. पुलवामा येथील एका चकमकीत जखमी झाल्यानंतरही आजारपणाची रजा घेण्यास त्यांनी नकार दिला होता. दोनच दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात त्यांनी फेसबुकवर वरील पोस्ट शेअर केली होती. आज अंत्यसंस्कार कॅप्टन पवन कुमार यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी हरयाणातील जिंद येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव विशेष विमानानं हरयाणा येथे आणण्यात आलं आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा

No comments:

Post a Comment