Total Pageviews

Friday, 19 February 2016

तृणमूल कॉंग्रेस'चे व्होट बॅंकेचे राजकारण -- श्यापमल रॉय - सकाळ न्यूज नेटवर्क -शनिवार, 20 फेब्रुवारी 2016 VOTE BANK POLITICS MAMATA BANARJI

'तृणमूल कॉंग्रेस'चे व्होट बॅंकेचे राजकारण -- श्यापमल रॉय - सकाळ न्यूज नेटवर्क -शनिवार, 20 फेब्रुवारी 2016 बांगलादेशींना नागरिकत्व देण्याची ममतांची मागणी कोलकाता - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वकभूमीवर पश्चिकम बंगालमध्ये व्होट बॅंकेचे राजकारण शिगेला पोचले असून, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच वर्षांहून अधिककाळ भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व दिले जावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. बॅनर्जी यांच्या या मागणीचा बांगलादेशीबहुल दहा जिल्ह्यांमध्ये प्रभाव पडू शकतो. 1971 मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धादरम्यान मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाल्याचे बोलले जाते. बॅनर्जी यांच्या मागणीचा उत्तर बंगालमधील राजकारणावर परिणाम होण्याची शक्यधता आहे. पश्चिजम बंगालमधील जवळपास 60 मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक समुदायाचे वर्चस्व आहे. यातील बहुसंख्य मतदारसंघ प्रामुख्याने उत्तर बंगालमध्ये आहेत. मागील लोकसभा निवडणुकीप्रसंगी या भागातून तृणमूल कॉंग्रेसला भरभरून मते मिळाली होती. विशेष म्हणजे याच भागामध्ये कॉंग्रेसची संघटनात्मक ताकद मोठी आहे. या ताकदीला सुरुंग लावण्यासाठी "तृणमूल‘ने हा डाव खेळल्याचे बोलले जाते. सध्या डाव्यांकडे राजकीय ताकद नसली तरीसुद्धा या पक्षाला मानणारा मोठा वर्ग अल्पसंख्याक समुदायामध्ये देखील आहे. ममतांना आता या दोन्ही पक्षांची व्होट बॅंक फोडायची आहे. ‘आयबी‘मुळे ममता चिंतित बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा पुढे करून भाजपने राज्यात ध्रुवीकरण घडवून आणायला सुरवात केली आहे, यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जात आहे, तसा अहवालच राज्याच्या गुप्तचर खात्याने दिल्याने ममता बॅनर्जी यांच्या चिंता वाढल्या आहेत. भाजपला रोखण्यासाठी ममतांनी जाणीवपूर्वक हा मुद्दा उकरून काढल्याचे बोलले जाते. बांगलादेशींना अभय जिल्हा न्यायदंडाधिकारी देणार प्रमाणपत्रे नागरिकत्वासाठी रेशन कार्डही दिले जाणार 1971च्या युद्धानंतर निर्वासितांनी घेतला भारतात आश्रय स्थलांतरित बांगलादेशींनाही हवे नागरिकत्व ममतांच्या "यू-टर्न‘मुळे डावे पक्ष भडकले

No comments:

Post a Comment