Total Pageviews

Friday, 26 February 2016

‘प. बंगाल का मालदा जिला बना भारत का मिनी अङ्गगानिस्तान’ -M SHEVDE T BHARAT

‘प. बंगाल का मालदा जिला बना भारत का मिनी अङ्गगानिस्तान’ पंजाब केसरी’ या उत्तरेतील एका मोठ्या दैनिकात सौधृती भबानी यांचा ‘प. बंगाल का मालदा जिला बना भारत का मिनी अङ्गगानिस्तान’ या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी चोरट्या अङ्गूचा व्यापार तेथे कसा चालतो ते लिहिले आहे. मालदा जवळील गोलपगंज, बल्लाडांगा, मोहब्बतपूर, कालियाचक, मोथावाडी ही अशा प्रकारच्या तस्करीची केंद्रे आहेत. त्यामुळे ३ जानेवारीचा हल्ला हा पूर्वनियोजितच होता, हे आता समोर येत आहे. मालदा येथे जो उद्रेक गत महिन्यात झाला त्याची बर्यामपैकी धूळ खाली बसल्यानंतर शांतपणे त्याचा आढावा एका वृत्तवाहिनीने घेतला आणि उत्तरेकडच्या काही वृत्तपत्रांतून तत्संबंधीची वृत्तेदेखील प्रकाशित झाली. आपल्याकडच्या वृत्तवाहिन्यांवर एक-दोन दिवस चर्चेचे गुर्हातळ होते आणि मग तो विषय मागे पडतो. बहुधा यालाच शोधपत्रकारिता म्हणत असावेत. उत्तर प्रदेशातील कमलेश तिवारीच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर प. बंगालमधील मालदा येथे अडिच लाख मुसलमानांचा मोर्चा का निघावा, याचा धांडोळा घेण्याची आपल्या येथील पत्रकारांना गरज वाटली नसावी. त्या निषेध मोर्चाने नेमके पोलिसांनाच लक्ष्य का केले आणि कालियाचक येथील पोलीस ठाणे का जाळले व पोलिसांना जीवाच्या भयाने तेथून पळून का जावे लागले? हे व असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले. देशाच्या अंतर्गत रक्षणकर्त्यांवर असा हल्ला होणे म्हणजे या देशाचा कायदा आम्ही मानत नाही, असा संदेश देणे नव्हे काय? हा हल्ला म्हणजे एक प्रकारे देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान ठरत नाही काय? मग याविरुद्ध नेमकी काय कारवाई होणार आहे? कारण वाहने जाळणे, पोलीस ठाणे जाळणे, दुकाने ङ्गोडणे व लुटणे, घरे ङ्गोडणे या सर्व गोष्टी करणारे ङ्गक्त दहाच जण होते यावर विश्वा स बसतो काय? पण अटक मात्र तेवढ्या लोकांनाच झाली आहे. हे लिहून होईपर्यंत त्यातील कित्येकजण सुटतीलसुद्धा!! बनावट नोटा छापण्याचा मोठा धंदा तेथे चालत होता, असे बोलले जाते. या व्यवसायात अनेक बड्या लोकांचा हात आहे. त्यांच्या संबंधातील महत्त्वाची माहिती या पोलीस ठाण्यात जमा झाली होती. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा या सर्व गोष्टींचा तपास करणार होती. त्यामुळे हे पोलीस ठाणे जाळून टाकण्यात आले. आपोआप त्यात असलेली कागदपत्रे जळून खाक झाली. कोठडीचे कुलूप तोडून आत असलेल्या आरोपींना मुक्त करण्यात आले. हे सगळेजण बनावट नोटांच्या प्रकरणात अडकले होते. याचा अर्थ असा की, सामान्य मुसलमानाच्या भावनांचा कोणी तरी चतुरपणे वापर करून आपली मान वाचवली. तो कोण आहे हे तपासयंत्रणा शोधून काढतील, असा विश्वायस बाळगू. धर्माच्या नावाने कोणीही हाक दिली की, सर्वसामान्य माणूस अशा जाळ्यात सापडू शकतो याचे हे मोठे उदाहरण आहे. एका महिन्याने आयोजकांना जाग का आली, असा विचार मोर्चात सामील होणार्याे कोणाच्याही मनात आला नाही. ‘पंजाब केसरी’ या उत्तरेतील एका मोठ्या दैनिकात सौधृती भबानी यांचा ‘प. बंगाल का मालदा जिला बना भारत का मिनी अङ्गगानिस्तान’ या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी चोरट्या अङ्गूचा व्यापार तेथे कसा चालतो ते लिहिले आहे. मालदामधील गोलपगंज भाग हा हिरव्यागार शेतांचा दिसतो. शेतांच्या मध्ये काही ठिकाणी मच्छरदाण्या लावलेल्या दिसतात. बाहेरच्या कोणाही माणसाला तेथे प्रवेश नाही. आजूबाजूला बंदूकधार्यां चा तेथे पहारा असतो. नशिल्या पदार्थांचा व्यापार व तस्करी तेथे मोठ्या प्रमाणावर चालते. तस्करीतून मिळणार्याू पैशातून अत्याधुनिक हत्यारे खरेदी केली जातात, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या तस्करीसाठी धार्मिक संस्थांचा वापरसुद्धा करून घेतला जातो. त्या भागात असलेल्या शेकडो मदरशांच्या आडून तस्करी केली जाते. हा भाग पूर्ववर्ती सीमेपासून केवळ आठ कि. मी. इतकाच दूर आहे. येथील लहान मुलेसुद्धा कच्ची अङ्गू गोळा करण्याच्या कामावर लावली जातात. त्यातून पुढे हेरॉईनची निर्मिती होते. गोलपगंज, बल्लाडांगा, मोहब्बतपूर, कालियाचक, मोथावाडी ही अशा प्रकारच्या तस्करीची केंद्रे आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर तृणमूल कॉंग्रेसचा एक वरिष्ठ नेता म्हणाला की, ‘‘हा भाग म्हणजे जणू मिनी अङ्गगाणिस्तान बनला आहे. नोटांनी भरलेली एक कार पोलिसांनी पकडली, पण कोणाचा तरी ङ्गोन आला आणि त्यांनी ती सोडून दिली. एकूण येथील स्थिती भयानक आहे. त्यातून निवडणुका जवळ आल्या आहेत.’’ इम्तियाज नामक स्थानिक रहिवासी म्हणाला की, ‘‘सीझनमध्ये, कच्ची अङ्गू ६० ते ७० हजार रुपये किलो या दराने विकली जाते. एका रोपापासून साधारणत: ३० ग्राम कच्ची अङ्गू मिळते. त्यात १२ टक्के वेदनाशामक मोर्ङ्गिन असते. त्यावर रासायनिक प्रक्रिया केली म्हणजे हेरॉईन बनते.’’ ३ जानेवारीचा हल्ला हा पूर्वनियोजितच होता. त्यासाठी तिवारीचे वक्तव्य हे निमित्त ठरविण्यात आले. ३५ वाहने जाळणे, सरकारी संपत्तीची नासधूस करणे आणि पोलीस ठाणे जाळणे या गोष्टी पोलिसांना इशारा देण्यासाठी करण्यात आल्या. अङ्गू उत्पादकांच्या विरोधात काही कारवाई केलीत तर याद राखा, हा संदेश यामागे होता. बांगलादेशातून येथे हत्यारे आणि बनावट नोटा यांची तस्करी अगदी सहजपणे केली जाते. याविरोधात कोणी आवाज उठविण्याची हिंमत करीत नाही. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, ‘‘त्या दिवशीच्या घटनेमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. कालियाचक येथील चौरंगी भागात एकाएकी मोठ्या संख्येने लोक जमा होऊ लागले. त्यांच्या हातात रॉकेलचे डबे, धारदार हत्यारे, बंदुका आणि इस्लामी झेंडे होते. मी कुटुंबीयांना घरात ढकलून जीव मुठीत धरून लपलो.’’ ही सर्व माहिती ‘पंजाब केसरी’ने छापली आहे. आपल्याकडे पुरोगामीत्वाचा डंका पिटणार्याा महाभागांनी कधी याबद्दल कोठे निषेध नोंदवला आहे का? कोणत्या वृत्तपत्रात याबद्दल काही लिहिले आहे का? यांचे पुरोगामीत्व सिलेक्टिव्ह असल्यानेच हे होते. याला त्यांचा तरी काय इलाज आहे!! देशात जातीय अथवा धार्मिक विष पेरणारे आणि देशद्रोह करणारे, कोणत्याही धर्माचे असोत पण त्यांचा बंदोबस्त केला जावा, ही आमची भूमिका आहे. पुरोगाम्यांनीसुद्धा यावर कधी तरी विचार करायला हरकत नाही. ते तोंडाने आमचीसुद्धा तशीच भूमिका आहे, असे म्हणतात. पण लेखन अथवा चर्चेतून तसे कधी ठामपणे त्यांनी मांडलेले िनदान आम्ही तरी पाहिले नाही...!!

No comments:

Post a Comment