Total Pageviews

Monday, 22 February 2016

असे किती वीरपुत्र हुतात्मा होणार?कॅप्टन तुषार महाजन यांचे वडील देवराज यांनी 'या मुलांचं होतात्म्य व्यर्थ जाऊ देऊ नका', असं कळकळीचं आवाहन

असे किती वीरपुत्र हुतात्मा होणार? Feb 22, 2016, 06.15 PM IST अशा आणखी किती वीरपुत्रांना हौतात्म्य पत्करावं लागणार आहे? आपल्या राजकारण्यांना वास्तवाचं भान होणार की नाही? सध्याची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलणार आहोत की नाही?, अशा प्रश्नांच्या फैरी झाडत शहीद कॅप्टन तुषार महाजन यांचे वडील देवराज यांनी 'या मुलांचं होतात्म्य व्यर्थ जाऊ देऊ नका', असं कळकळीचं आवाहन आज केलं. जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन तुषार महाजन यांना रविवारी वीरमरण आलं. आज लष्कराच्या उधमपूर येथील मुख्यालयात तुषार यांचं पार्थिव आणलं असता त्यांच्या आईला दु:खावेग आवरता आला नाही. त्या अक्षरश: कोसळल्या आणि काही काळ त्यांची शुद्धच हरवली. या प्रसंगाला मोठ्या धीराने सामोरे जात तुषार यांचे वडील देवराज यांनी त्या माऊलीला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी डबडबलेल्या डोळ्यांनीच देवराज यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एकीकडे त्यांना आपला मुलगा देशसेवेसाठी गमावल्याचा सार्थ अभिमान वाटत होता तर दुसरीकडे निर्ढावलेल्या राजकारण्यांविषयी त्यांच्या डोळ्यात संतापही झळकत होता. देवराज हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. आपल्या मुलाचं हौताम्य व्यर्थ ठरू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. त्या कळकळीतूनच त्यांनी राजकारण्यांनी आता तरी धडा घ्यावा, असं आवाहन केलं आहे. देवरात म्हणतात, पाम्पोर येथील चकमकीत कॅप्टन पवन कुमार शहीद झाल्याची बातमी रविवारी सकाळी कानावर पडली आणि संपूर्ण दिवस मी अस्वस्थ होतो. अशी आणखी किती मुलं शहीद होणार आहेत?, हा एकच प्रश्न मनाशी सतावत होता. तोपर्यंत आपला मुलगा तुषार हाही त्याच ऑपरेशनमध्ये सहभागी आहे याची जराही कुणकुण आपणास नव्हती आणि नंतर तुषार शहीद झाल्याचं वृत्त थडकलं आणि पार हादरूनच गेलो. माझा लाडका मुलगा गमावल्याचं दु:ख होतंच पण स्वत:ला सावरलं. 'माझा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. हे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. माझ्या मुलाने लहानपणापासूनच लष्करात जाण्याचं स्वप्न बाळगलं होतं. तो स्वत:हून त्यासाठी धडपडत होता. देशासाठी काहीतरी करावं, ही त्याची जिद्द होती. त्यामुळे मीही त्यात कधी आडकाठी आणली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याचं एनडीएमध्ये निवड झाली होती', असेही देवराज यांनी सांगितले. दहशतवाद्यांना मारण्याचं त्याचं स्वप्नचं होतं! लष्करात जायचं आणि दहशतवाद्यांना मारायचं हे तुषारचं बालपणापासूनचं स्वप्न होतं, असं त्यांचा वर्गमित्र सुशांत याने सांगितले. तो म्हणाला, जेव्हा आम्ही खेळण्यामध्ये दंग असायचो तेव्हा तुषार मात्र लष्करात जाण्याची स्वप्नं रंगवायचा. एवढंच काय शाळेत निबंध लिहिण्यास सांगितलं तेव्हाही त्याने याच विषयावर निबंध लिहिला. लष्करात जाऊन दहशतवाद्यांना मारायचं आहे, अशी इच्छा त्याने निबंधाच्या माध्यमातून तेव्हाच व्यक्त केली होती, असे सुशांतने पुढे नमूद केले

No comments:

Post a Comment